Rajnath Singh-तर ऑपरेशन सिंदूर होणार पाकिस्तानला सुनावलं?
Rajnath Singh-पी ओ के लवकरच भारताचा होणार?

- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)मरोक्को च्या दौऱ्यावर
- पाक व्याप्त कश्मीर पी ओ के वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी केले धक्कादायक विधान
- क्रिकेट,ऑपरेशन सिंदूर,पाकव्याप्त कश्मीर वर राजनाथ सिंह(Rajnath Singh)काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर नंतर अवघ्या चारच महिन्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर होईल असे भाकीत केले तसेच पाकव्याप्त कश्मीर अर्थात पीओके बाबतीत धक्केदायक विधान केले आहे तसेच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरीफ धोरणाबाबतीत सुद्धा मोठे विधान केले आहे
काल झालेल्या भारत आणिऑपरेशन सिंदूर नंतर अवघ्या चारच महिन्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर होईल असे भाकीत केले तसेच पाकव्याप्त कश्मीर अर्थात पी ओ के बाबतीत धक्केदायक विधान केले आहे तसेच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरीफ धोरणाबाबतीत सुद्धा मोठे विधान केले आहे

काल झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यांमध्ये साहेबजादा फरहान याने अर्धशकत केल्यानंतर बॅट हातामध्ये एखादी एके 47 असल्यासारखे हावभाव केले त्यामुळे एकच वाद पेटला भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावरून सध्या देशातील संपूर्ण राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे एरवी भारत आणि पाकिस्तानचा मॅच पाहण्यासाठी भारतीय लोक उत्सुक असतात पण एशिया कप मध्ये मात्र हा सामना बघण्यासाठी भारतीय फारसे इच्छुक नव्हते पहेलगाव हल्ल्यानंतर ताणले गेलेले भारत आणि पाकिस्तानचे संबंध यामध्ये क्रिकेट नको अशी भूमिका सर्वांनीच घेतली होती पण एशिया कप मध्ये भारताने दोन वेळा पाकिस्तानला नमवलं त्यामुळे पाकिस्तानी जनता चांगलीच रागात आहे
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला की जर पाकिस्तानने पुन्हा भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे प्रयत्न केला तर ऑपरेशन सिंदूर दोन व्हायला वेळ लागणार नाही ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तान मधील अनेक आतंकवादी तळांना निशाणा करत ते उध्वस्त केले होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)दोन दिवसीय मोरक्कोच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले

क्रिकेट,ऑपरेशन सिंदूर,पाकव्याप्त कश्मीर वर राजनाथ सिंह(Rajnath Singh)काय म्हणाले?
एका वृत्तवाहिनीवर एक बातमी आली की ज्यामध्ये पाकिस्तान मधील दहशतवादी हे भारतामध्ये काहीतरी मोठे करायचे असे वक्तव्य करताना दिसले आणि त्यामुळेच आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी पाकिस्तानला चांगला दम दिला राजनाथ सिंह(Rajnath Singh)म्हणाले की जर पाकिस्तानने भारतामध्ये काही करण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेशन सिंदूर दोन करायला भारत मागेपुढे पाहणार नाही आजचा भारत हा पहिले सारखा भारत राहिलेला नाही तो जशास तसे उत्तर देऊ शकतो भारताने आधीच सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला चांगलेच अडचणीत आणलेले आहेत पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही कमालीची खराब झालेली आहे
हे हि वाचा –NO SUGAR-“२१ दिवस साखर खाणे बंद करा; जाणून घ्या शरीरात होणारे अद्भुत बदल”
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मधून आलेल्या कर्जाच्या भरोशावर सध्या पाकिस्तान चालत आहे तर दुसरीकडे भारत ही सगळ्यात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येऊ पाहत आहे अशातच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरीफ धोरणाचा खूप परिणाम हा भारतावर झालेला नाही असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी सांगितले

पाक व्याप्त कश्मीर पी ओ के वर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी केले धक्कादायक विधान
पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी पाक व्याप्त काश्मीर अर्थात योग्य बाबतीत धक्केदायक विधान केले पी ओ के भारताचा अविभाज्य घटक होईल आणि विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीर भारतात येण्यासाठी सध्या स्थितीला पाकिस्तान सरकार व पीयुके मधील नागरिक यांच्यामध्ये संघर्ष वाढलेला आहे ते स्वतःच भारतामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे भारताला विशेष काही करण्याची गरज नाही लवकरच तो दिवस येईल ज्या दिवशी पी ओ के भारताचा भाग असेल भारताची प्रगती
हे हि वाचा –Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या सर्व प्रोसेस
पाहता आणि पी ओ के मधील नागरिकांवर होणारे अन्याय पाहता लवकरच पीओ के भारताचा भाग होईल भारत आणि भारताचे सैनिक हे पूर्णपणे तयार असल्याची ग्वाही देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी दिली तसेच याप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह(Rajnath Singh)म्हणाले ” जिन्ह मोही मारा, तिन्ह मोही मारा” म्हणजे पाकिस्तानने आमच्या लोकांना मारलं आणि नंतर आम्ही त्यांच्या आतंकवाद्यांना मारले आम्ही त्यांच्या निष्पाप लोकांना कधीही मारले नाही भारताच्या तिन्ही सेनाप्रमुखांनी अत्यंत चांगले काम केले पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणावर केलेले हल्ल्यांमध्ये कोणीही निष्पाप व्यक्ती मारला गेला नाही हे विशेष

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)मरोक्को च्या दौऱ्यावर
सध्या भारताचे संरक्षण मंत्री दोन दिवसीय मरक्को येथे दौऱ्यावर आहेत यामध्ये राजधानी टाटा ॲडव्हान्स सिस्टमच्या एका कार्यक्रमात उद्घाटन करताना व तेथील भारतीय लोकांशी संवाद देखील साधला याप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी भारतासाठी आमची भक्ती स्नेह आणि प्रेम स्वाभाविक आहे आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही आपण भारतीय आहोत हे आपण विसरता कामा नाही भारतीय लोक कोणाचाही विश्वास घात करत नाहीत हे भारतीय लोकांचे चरित्र आहे असेही याप्रसंगी राजनाथ सिंह(Rajnath Singh)म्हणाले
चार महिन्यापूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान कमालीचा परेशान झाला पण आजही पाकिस्तानच्या कुरापती ह्या चालूच असतात यावेळी देखील भारताला धमकी देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असला पण आता मात्र भारतीय सैन्य हे पाकिस्तानला जशाच्या तशा उत्तर देण्यासाठी तयार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh)यांनी पी ओ के बाबतीत आणि परत एकदा ऑपरेशन सिंदूर दोन बाबतीत केलेल्या विधानामुळे पाकिस्तानच्या चिंता मात्र वाढले आहेत कारण की गेल्यावेळी ऑपरेशन सिंदूर जेव्हा भारताने केले तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या होत्या पण सध्या भारत आणि अमेरिकेचे संबंध हे ताणले गेलेले आहेत







