Advertisement
"आबा दाबी"

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव केंद्रीय मंत्री होणार?

रेल्वे राज्यमंत्रीपदाची चर्चा, परभणीत राजकीय घडामोडींना वेग?

Advertisment

केंद्रीय मंत्रिमंडळात संजय उर्फ बंडु जाधव?”

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी,
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करत एकनाथ

Advertisement

शिंदे यांच्या “बाणा”च्या शिवसेनेत प्रवेश केला.
“मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याने, विरोधी

Advertisement

पक्षातून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला.”
असे समर्थन बंडु जाधव करत आहेत.

हेही वाचा-पायऱ्या चढताना गुडघे दुखतात? डॉक्टरांनी सांगितली सांध्यांच्या नुकसानीची सुरुवातीची लक्षणे

त्याचबरोबर, बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन चाललेल्या एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत आल्यामुळे, मला जास्त

समाधान होत असल्याचेही ते बोलत आहेत.
बंडू जाधव यांच्या भूमिकेचे मतदारसंघात संमिश्र स्वागत होत आहे.

हेही वाचा-गद्दार कोण, इमानदार कोण?’ सईद खान यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत नवा राजकीय वाद

एकीकडे उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन “तुडवा” ची घोषणा करत बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरा सुरू केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे या दौऱ्या दरम्यान जंगी स्वागत होत आहे.
परभणीत मात्र एकीकडे बंडू जाधव थप्पी ला लागणार! अशी

चर्चा समाज माध्यमांवर होत असताना, दुसरीकडे शिवसैनिकांकडून

बंडू जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खांदेपालट होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खांदेपालट होणार असल्याचे समजते.

“बंडखोर सहाही खासदारांना 2029 च्या निवडणुकीत पुन्हा निवडून आणू”. असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दाखविला आहे.

याच कडि मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला

भागीदारी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात

समावेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
खासदार बंडू जाधव यांनी रेल्वेमंत्री यांच्याशी वेळोवेळी भेट घेऊन

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

त्यांच्या या अभ्यासू वृत्तीची दखल घेऊन बंडु जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे

राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक समजते.

बंडू जाधव यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्यास मराठवाड्याचा तो दुसऱ्यांदा बहुमान होईल.

यापूर्वी भाजपाचे तत्कालीन खासदार रावसाहेब दानवे यांना ही संधी मिळाली होती.

मात्र रावसाहेब दानवे रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणून आपला ठसा उमटऊ शकले नाही.
खासदार बंडू जाधव यांना रेल्वे राज्यमंत्री पदाची संधी मिळाल्यास या संधीचे

जाधव यांना सोने करता येते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात.

* बंडु जाधव केंद्रीय मंत्री पदासाठी सक्षम आहेत का?

* बंडु जाधव यांची शैक्षणिक पात्रता केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यासाठी अडचणीची ठरेल का?

* मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा कार्यकाळ 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विजया करता आश्वासक ठरेल का?

* बंडू जाधव हे एकनाथ शिंदे सोबत एकनिष्ठ राहतील का ?
उद्या जर काही नवीन परिस्थिती उद्भवली तर,शिंदेंना सोडून बंडु जाधव भाजप सोबत जाऊ शकतील का?

* मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास आणि रेल्वे खाते मिळाल्यास, मराठवाड्यासाठी कोणते प्रकल्प यावेत अशी आपली अपेक्षा आहे?

याविषयी आपणास काय वाटते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आपण कॉमेंट

बॉक्समध्ये अवश्य व्यक्त व्हा आणि आपल्या भावना व भूमिका बिनधास्तपणे मांडा.

आबा शिंदे ( पत्रकार)

सामाजिक व राजकीय विश्लेषक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button