Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

“E-Aadhaar App द्वारे आधार कार्ड अपडेट करा | पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर बदलण्याची सोपी प्रक्रिया”

“UIDAI च्या E-Aadhaar App मधून आधार कार्डमध्ये पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर सहज बदलता येतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.”

Story Highlights
  • E Aadhar APP च्या साह्याने जन्मतारीख,पत्ता,मोबाईल नंबर यामध्ये बदल कसे करायचे ?
  • मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी:
  • जन्मतारीख (DOB) बदलण्यासाठी:
  • पत्ता बदलण्यासाठी (Address Update)
Advertisment

आधार कार्ड चे महत्व सध्या आपण सर्वजण जाणतो प्रत्येक सरकारी काम असो वा खाजगी आधार कार्ड ची गरज ही आपल्याला पडतेच पण बऱ्याच वेळेला आधार कार्ड मध्ये सुरुवातीला नोंदणी करताना चुकलेल्या काही गोष्टी मात्र त्रासदायक ठरतात उदाहरणार्थ नाव,पत्ता,मोबाईल नंबर जन्मतारीख यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो यासाठी आपल्याला ऑनलाईन सेंटर मध्ये जावे लागते आणि यामध्ये बराच वेळ जातो कारण एकदा गेल्यावर त्या ठिकाणी काम होईल याची कुठली शाश्वती नसते पण आता सरकार या त्रासापासून सामान्यांना मुक्ती देणार आहे आता आपण घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने आधार कार्ड मध्ये हवे ते बदल करू शकणार आहोत ते कसे ते पाहूया

aadhaar-card-update-online-eaadhaar-app.jpg
E-Aadhaar App द्वारे आधार कार्ड अपडेट

E Aadhar APP -काय आहे ?

मोबाईल वरून आपल्या आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकार E Aadhar APP आणण्याच्या तयारी मध्ये आहे या ॲपद्वारे आपण घरबसल्या आपल्या आधार कार्ड मधील काही बदल हे करू शकतो पूर्वी हेच बदल करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन सेंटरमध्ये जावे लागत होते पण आता मात्र मोबाईल वरून हे काम करता येणार आहे
E Aadhar APP हे एक डिजिटल इनिशेटिव्ह आहे जे की Android आणि IOS या दोन्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे यावरून आपण सहज आधार मध्ये काही बदल करू शकतो

Advertisement

हे एक UIDAI चा ऑफिशियल प्लॅटफॉर्म असल्यामुळे यामध्ये आपला डाटा हा सुरक्षित राहणार आहे तो डाटा लिक व्हायची कुठलीही भीती नाही
ही E Aadhar APP लॉन्च झाल्यानंतर यामध्ये आपली महत्वाची कामे जसे की जन्मतारीख मोबाईल नंबर पत्ता यासारख्या गोष्टी तसेच आणखीन काही दिवसानंतर याच ॲपद्वारे आपण आपला फोटो देखील बदलू शकणार आहोत अशी माहिती मिळत आहे

Advertisement

 

aadhaar-card-update-online-eaadhaar-app.jpg
E-Aadhaar App द्वारे आधार कार्ड अपडेट

 

तसेच भविष्यामध्ये E Aadhar APP च्या साह्याने अनेक सरकारी कामे देखील आपल्याला करता येणार आहेत जसे की ड्रायव्हिंग लायसन’ पॅन कार्ड ‘जन्म प्रमाणपत्र’सार्वजनिक वितरण प्रणाली’राशन कार्ड’मनरेगा कार्ड या सर्व गोष्टी सुद्धा ऑनलाईन आपल्याला काढता येतील व त्यामध्ये बदल देखील करता येणार आहे तसेच याच E Aadhar APP च्या साह्याने आपण भविष्यामध्ये लाईट बिल मोबाईलची बिल देखील भरता येणार आहेत विशेष म्हणजे ही ॲप केंद्र सरकारची असल्यामुळे त्यामधून डाटा लिक व्हायची भीती ही फार कमी असते

 

E Aadhar APP च्या साह्याने जन्मतारीख,पत्ता,मोबाईल नंबर यामध्ये बदल कसे करायचे ?

१) आधी काय लागेल:

स्मार्टफोनमध्ये mAadhaar App (E-Aadhaar app) इन्स्टॉल केलेले असावे.

Aadhaar शी लिंक असलेला मोबाईल नंबर (OTP साठी).

योग्य दस्तऐवजांचे स्कॅन/फोटो (पत्ता किंवा DOB बदलासाठी).

२) मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी:

1. mAadhaar App उघडा → “Update Aadhaar” निवडा.

2. “Update Mobile Number” वर क्लिक करा.

3. आपला नवा मोबाईल नंबर टाका.

4. OTP मिळाल्यानंतर तो टाका आणि Submit करा.

5. हे बदल Online Self Service Portal द्वारे थेट होत नाही; तुम्हाला Aadhaar Seva Kendra ला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी जावे लागेल.
(App फक्त बुकिंग/रिक्वेस्ट जनरेट करण्यासाठी मदत करते).

हे हि वाचा-NO SUGAR-“२१ दिवस साखर खाणे बंद करा; जाणून घ्या शरीरात होणारे अद्भुत बदल”

३) जन्मतारीख (DOB) बदलण्यासाठी:

1. App मध्ये “Update Aadhaar” → Update Demographics Data निवडा.

2. Date of Birth निवडा.

3. योग्य दस्तऐवज (जन्म दाखला, SSC प्रमाणपत्र, पासपोर्ट इ.) PDF/JPEG मध्ये अपलोड करा.

4. OTP टाकून Request Submit करा.

5. बदल UIDAI च्या व्हेरिफिकेशननंतर मंजूर होतो

४) पत्ता बदलण्यासाठी (Address Update):

हा सर्वात सोपा आहे, कारण तो Online Update होतो.

1. App मध्ये “Update Aadhaar Online” वर क्लिक करा.

2. Address Update निवडा.

3. नवा पत्ता टाका → नकाशावर लोकेशन सिलेक्ट करा.

4. योग्य दस्तऐवज (Electricity Bill, Ration Card, Bank Statement इ.) अपलोड करा.

5. OTP टाकून सबमिट करा.

6. Update Request Number (URN) मिळेल, त्याद्वारे Status Track करू शकता.

५) महत्वाची माहिती:

 

हे हि वाचा-Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या सर्व प्रोसेस

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी नेहमी Aadhaar Seva Kendra किंवा नजीकच्या CSC सेंटरला भेट द्यावी लागते.

पत्ता व DOB मात्र App द्वारे Online Update करता येतो.

अपडेट झाल्यावर E-Aadhaar Download करून नवीन तपशील तपासा.
वरील पद्धतीने आपण आपले आधार कार्ड अपडेट करू शकतो यापूर्वी ऑनलाइन सेंटरला जायचा आपला वेळ हा निश्चित वाचणार आहे आणि एका ॲप मधून खूप मोठी कामे होणार आहेत त्यामुळे निश्चित या ॲपचा फायदा हा जनसामान्यांना होणार आहे
या ॲपच्या द्वारे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button