Advertisement
राजकीय बातम्या

लोकप्रतिनिधी होण्यासाठी शिक्षणाची अट घातली पाहिजे ?

Advertisment

लोकप्रतिनिधींना शिक्षणाची अट असली पाहिजे याबाबतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे
आणि याला कारण आहे समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक्स डॉट कॉम वर एक पोस्ट शेअर केली
ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले काही मंत्री व आमदार यांचे शिक्षण किती आहे
त्याविषयी ही पोस्ट टाकण्यात आली होती आणि आता या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे
या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी घेतलेला आक्षेप ही सेवक पदासाठी जर शिक्षणाची अट असेल
तर देश आणि राज्य चालविणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी शिक्षणाची अट का नाही?
लोकप्रतिनिधींना शिक्षणाची अट असली पाहिजे अशी मागणी सामान्य जनतेमधून होत असते
अगदी माननीय न्यायालयाने सुद्धा याविषयी टिप्पणी केली आहे न्यायालयाने काय म्हटले आहे
ते आपण पाहूया एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरिंदर धिंग्रा व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार
नरबीर सिंग या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये लढत झाली या लढतीमध्ये हरिंदर धिंग्रा हे
पराभूत झाले तर नरबीर सिंह हे विजयी झाले पण यानंतर हरिंदर धिंग्रा यांनी न्यायालयामध्ये एक याचिका
दाखल केली की ज्यामध्ये नरबीर सिंग यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना शपथ पत्रामध्ये त्यांची शैक्षणिक
अहर्ता ही पदवी पूर्ण झाल्याचे दाखविले आहे पण ज्या कॉलेजमधून नरबीर सिंह हे पास झाले होते
या कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसी ची मान्यता या महाविद्यालयाला नाही
असा आरोप त्यांनी केला व यावर निर्णय देताना माननीय न्यायालयाने लोकप्रतिनिधी यांच्या शैक्षणिक पात्रते
बद्दल आपले काही निरीक्षण नोंदविले यामध्ये मुख्यतः न्यायालयाने भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांचा उल्लेख केला त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लोकप्रतिनिधी होण्यासाठी शैक्षणिक अहर्ता पाहिजे असा
कायदा नसल्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला होता जे लोक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी
अधिकारी होतात त्यांना वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट आहे पण जे लोकप्रतिनिधी विधिमंडळात
बसून कायदे तयार करतात त्यांना मात्र शिक्षणाची कुठलीच अट नाही अशा पद्धतीची अट असायला पाहिजे होती
लोकप्रतिनिधींना फक्त आपल्या भागातून मताच्या आधारे निवडून येणे एवढीच अहर्ता ही पूर्ण नसते शिक्षण सुद्धा
तेवढेच महत्वाचे आहे असे मत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केले होते त्यांच्या या वक्तव्याची दखल अजूनही
कोणीही घेतलेली नाही अशी महत्वाची टिप्पणी माननीय न्यायालयाने केली वरील कारणांमुळे परत एकदा
लोकप्रतिन्याची शैक्षणिक पात्रता किमान किती असायला पाहिजे याविषयी कायदा होणे गरजेचे आहे
असं मत जनसामान्यांचे आहे
तसेच अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्ट नंतर या पोस्टमध्ये कोणकोणत्या नेत्यांचे शिक्षण किती झाले आहे
हे त्यांनी सदरील पोस्टमध्ये लिहिलेले आहे

खासदार संदीपान भुमरे

खासदार संदीपान भुमरे
खासदार संदिपान भुमरे हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजी महाराज लोकसभा मतदार संघामधून 2024 च्या
निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहे यापूर्वी त्यांनी पैठण विधानसभा मतदार संघाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे
शिवसेना शिंदे गटाचा संदिपान भुमरे हे मोठा चेहरा आहेत महायुतीला फक्त एवढ्या एकाच जागी मराठवाड्यामध्ये
विजयी संपादित करता आला
संदिपान भुमरे हे फक्त दहावी पास आहेत

Advertisement
Ajit Dada Pawar
अजित दादा पवार

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बारामती विधानसभा मतदार संघामधून त्यांनी लोकसभा तसेच विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे
अजित दादा हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत सध्या ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत
ते बारामती विधानसभा मतदारसंघांमधून अनेक वेळा निवडून आलेले आहेत पण आपण जर अजित दादा पवार यांच्या
शिक्षणाबाबतीत जर विचार केला तर अजित दादा पवार हे फक्त दहावी पास आहेत

Advertisement
आमदार विजय वडेट्टीवार

आमदार विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत ते सध्या विरोधी पक्षनेते आहेत ते
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत व विदर्भामधील काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा म्हणून
विजय वडेट्टीवार किंवा यांच्याकडे पाहिले जाते विरोधी पक्ष नेते विजय यांचे शिक्षण हे दहावीपर्यंत झाले आहे

गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील हे विद्यमान मंत्री आहे व शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे ते प्रमुख नेते आहेत विजय पाटील
जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात व ते मंत्री सुद्धा आहेत आपण जर त्यांच्या
शिक्षणाचा विचार केला तर गुलाबराव पाटील हे बारावी पास आहेत

Girish Mahajan

मंत्री गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत ते जामनेर
विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मागील अनेक निवडणुकीमध्ये गिरीश महाजन हे विजयी झालेले आहेत
सध्या ते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत आपण त्यांच्या शिक्षणाबाबत जर विचार करायचे झाले तर
मंत्री गिरीश महाजन हे पदवीधर नाहीत त्यांनी बी कॉम मध्ये प्रवेश घेतला व द्वितीय वर्षात असताना त्यांनी शिक्षण सोडून दिले

आमदार भरत गोगावले

आमदार भरत गोगावले
आमदार भरत गोगावले हे महाड विधानसभा मतदार संघामधून 1990 पासून विजयी होत आहेत त्यांना प्रशासनिक
कामाचा मोठा अनुभव आहे शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे एक मोठे नेते म्हणून भरत भोगवले यांची ओळख आहे
एकनाथराव शिंदे यांनी जेव्हा बंड केला होता तेव्हा गुहाटीमध्ये पक्षाचे प्रतोद म्हणून भरत भोगावले
यांची निवड केली यावरून समजू शकता की भरत गोगावले हे एकनाथराव शिंदे यांच्यासाठी किती महत्त्वाचे नेते आहेत
आपण भरत भूगोल यांचा शिक्षणाचा विचार घेतला तर भरत गोगावले हे फक्त आठवी पास आहेत

धर्मराव बाबा आत्राम

धर्मराव बाबा आत्राम
धर्मराव बाबा आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी यापूर्वी देखील
आणि मंत्रीपद भूषवली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत आपण जर धर्मराव बाबा आत्राम यांच्या शिक्षणाचा
विचार केल्यास धर्मराव बाबा आत्राम हे दहावी पास आहेत

आमदार संतोष बांगर

आमदार संतोष बांगर
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमधून 2019 च्या निवडणुकीमध्ये संतोष बांगर विजय झाले
ते शिवसेना या पक्षांमध्ये कार्यरत आहेत शिवसेना पक्षाचे दोन भाग पडल्यानंतर संतोष बांगर हे एकनाथराव शिंदे गटाच्या
बाजूने राहिले अत्यंत आक्रमक शैली असलेला हा नेता हिंगोली जिल्हा तसेच परिसरामध्ये प्रसिद्ध आहे पण शिक्षणाबाबतीत
मात्र संतोष बांगर हे काहीसे पिछाडीवर असे दिसतात त्याला कारण आहे संतोष बांगर हे फक्त चौथी पास आहेत
वरील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची शैक्षणिक आहता बघितल्यानंतर आपल्याला हा विचार येतो की एवढी कमी शिकलेली
मंडळी कशा पद्धतीने आपले राज्य चालवत असतील याविषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत एरवी
साध्या शिपायाच्या नोकरीसाठी शैक्षणिक आर्थिक कमीत कमी बारावी पास ही अट आहे तर लोकप्रतिनिधी होण्यासाठी
कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही पण आपण जर वस्तुस्थिती बघितली तर शिकलेला माणूस हा
अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पण असं होताना दिसत नाहीये कारण आपल्या देशामध्ये आपल्या
संविधानाप्रमाणे जो व्यक्ती जनतेमधून विजयी होईल त्याला कुठल्याही शिक्षणाची अट नाही आपण जर विचार केला तर
आपल्याला ही गोष्ट स्पष्ट जाणवेल की जी मंडळी कायदे तयार करतात ते जास्तीत जास्त शिकलेले असले तर कामकाज
हे अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकते
अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टमुळे परत एकदा लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक आहतेबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले
सध्या स्थिती बघता अशा पद्धतीचा कायदा हा लवकर येईल असा अंदाज कमी दिसत आहे शिकलेल्या लोकांनी राजकारणात
यावं व राजकारणाची दिशा बदलावी अशी मागणी जनतेमधून सध्या होत आहे
आपण अगदी लोकप्रतिनिधींना असे म्हणू शकत नाही की ते काही काम करत नाही तरी पाहायला गेले तर एका विधानसभा मतदार
संघामधून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी मोठी कार्यकर्ते कसरत करावी लागते त्यांनी केलेला हा त्यात सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे
जास्त शिक्षण नसताना सुद्धा ही मंडळी अनेक मोठ्या पदापर्यंत गेलेली आहेत त्यामुळे मला असे वाटते शिक्षण आणि मेहनत या दोन्ही
गोष्टी एकत्रित चालल्या पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये असाध्य वाटणारी गोष्ट ही साध्य करता येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button