Advertisement
Uncategorized

Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ?

Advertisment

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) मधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) हे दोन्ही देश एकमेकांना अडचणीत कसा आणता येईल यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत यामध्ये भारताने सिंधू जल करार रद्द केला व पाकिस्तानला जाणारे नदीचे पाणी अडवले तर पाकिस्तानने देखील भारताला त्यांच्या हवाई हद्दी मधून विमान जाण्यासाठी परवानगी नाकारली. आता भारताने पाकिस्तान(Pakistan) सोबतचे सर्व व्यावसायिक संबंध देखील बंद केले आहेत त्यामुळे पाकिस्तान(Pakistan)ला मोठा आर्थिक फटका बसण्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून कोणत्या कोणत्या गोष्टी आयात करतो ते आपण पाहूया

पहलगाम मध्ये झालेल्या पाकिस्तान(Pahalgam Terror Attack) मधून आलेल्या अतिरेक्यांनी केलेला भ्याड हल्ला यामुळे भारताने पाकिस्तान(Pakistan)सोबत चे सर्व व्यापारी संबंधित तोडले आहेत आधीच पाकिस्तान(Pakistan)ची आर्थिक अवस्था ही अत्यंत बिकट आहे आय.एम.एफ कडून मिळालेल्या पैशावर पाकिस्तान(Pakistan) कसातरी तग धरून आहे आणि अशातच जर भारताने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची आर्थिक सामाजिक आणि युद्ध या तिन्ही परिस्थितीमध्ये पाकिस्तान(Pakistan) भारतासमोर टिकू शकत नाही पाकिस्तान(Pakistan)ने आधीच हवाई हद्द भारतासाठी बंद करून मोठे आर्थिक नुकसान स्वतःहून करून घेतले आहे कारण युरोपियन देशांमध्ये जाण्यासाठी भारताला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जावं लागत होतं त्यासाठी भारताच्या विमान कंपन्या ह्या

Advertisement

पाकिस्तान(Pakistan)ला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देत होते पण आता पाकिस्तान(Pakistan)नेच हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तान(Pakistan)चा खूप मोठा उत्पन्नाचा स्त्रोत्र आता बंद झाला आहे अशातच भारताने पाकिस्तान(Pakistan) सोबत ची सर्व व्यावसायिक संबंध तोडले असून पाकिस्तान(Pakistan)च्या कुठल्याही जहाजांना भारतातील बंदरावर येण्याची परवानगी देण्यात येत नाहीये तसेच भारताने आपल्या जहाजांना देखील पाकिस्तान(Pakistan)च्या बंदरावर जाण्यासाठी मनाई केली आहे यामुळे पाकिस्तान(Pakistan)ला खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे व्यापारी संबंध तोडल्यामुळे पाकिस्तान(Pakistan) मधून ज्या वस्तू भारत (India)आयात करतो त्या बंद झाल्यामुळे देखील बेरोजगारी तसेच आर्थिक संकटाचा सामना पाकिस्तान(Pakistan)ला करावा लागू शकतो

Advertisement

भारत (India)कोणत्या वस्तू पाकिस्तान(Pakistan) मधून आयात करतो(What goods does India import from Pakistan?)

 

fresh fruit
ताजी फळे

भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून मोठ्या प्रमाणामध्ये ताजी फळे आयात करतो पाकिस्तान(Pakistan)मध्ये डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळांची पिके घेतली जातात व ती भारतामध्ये निर्यात केली जातात भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) यांच्या सीमा लागून असल्यामुळे ही ताजी फळे सहज भारतामध्ये पाठवली जाऊ शकत होती भारत (India)हा पाकिस्तान(Pakistan) कडून ताजी फळे घेणारा सगळ्यात मोठा देश आहे आणि आता भारताने ही फळे आयात करण्यासाठी नकार दिल्यामुळे तेथील शेतकरी कमालीचे आर्थिक कोंडीत सापडले आहेत कारण की सर्वात मोठा आयात करणारा देशच जर वस्तू घेत नसेल तर त्या पिकवलेल्या फळांचं काय करायचं असा प्रश्न पाकिस्तान(Pakistan)मधील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे तसेच सिंधू नदीचे पाणी अडवल्यामुळे देखील तेथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा फटका हा तेथील फळ उत्पादनावर होणार आहे आणि त्यामुळेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack)तेथील फळांचे उत्पादन देखील घटण्याची शक्यता आहे

MULTANI MATI
मुलतानी माती

मुलतानी माती
पाकिस्तान(Pakistan) मधील मुलतान प्रांतामध्ये मुलतानी माती मोठ्या प्रमाणात आढळते मुलतान प्रांताच्या नावावर या मातीला मुलतानी माती देखील म्हटलं जातं मुख्यतः मुलतानी मातीचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधनां मध्ये केला जातो अगदी वैदिक काळापासून मुलतानी माती ही सौंदर्यवर्धक असल्यामुळे त्याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो भारत (India)देश हा पाकिस्तान(Pakistan) मधून मुलतानी माती आयात करणारा सर्वात मोठा देश आहे आता भारताने मुलतानी मातीचे  आयात थांबवल्यामुळे तेथील मुलतानी माती काढून विक्री करणाऱ्या मुलतान भागातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे भारताने घेतलेल्या या धोरणामुळे पाकिस्तान(Pakistan)ची आर्थिक कोंडी होत आहे

हे हि वाचा –हाडांमधील कमजोरी दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय

सैंधव मीठ
पाकिस्तान(Pakistan) संपूर्ण जगामध्ये सैंधव मीठ निर्यात करणारा मोठा देश आहे आणि येथे सुद्धा भारत (India)हा पाकिस्तान(Pakistan)कडून मोठ्या प्रमाणामध्ये सैंधव मीठ विकत घेतो मुख्यतः पाकिस्तान(Pakistan) मधील सैंधव मिठाला जगभरात मोठी मागणी आहे भारतामध्ये जेव्हा उपवास असतो तेव्हा साध्या मिठाच्या जागी सैंधव मीठ वापरले जाते आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील साध्या मिठापेक्षा सैंधव मीठ हे चांगले असते त्यामुळे देखील अलीकडच्या काळामध्ये भारत (India)देशामध्ये सैंधव मीठ मागणी वाढलेली आहे आपण भारताच्या कोणत्याही शहरात गेल्या तरी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राजस्थानी लोक हे सैंधव मीठ विकताना आपण पाहिले असतीलच पण आता पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारताने मीठ आयात बंद केल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे

DAM
DAM

सिमेंट
पाकिस्तान(Pakistan) म्हणून भारत (India)मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट देखील आयात करतो पाकिस्तान(Pakistan)मध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे तेथील सिमेंट स्वस्त आहे या कारणामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान(Pakistan) वरून सिमेंट आयात केले जाते आता संपूर्ण वस्तूंची आयात बंद असल्यामुळे पाकिस्तान(Pakistan) मधील सिमेंट यापुढे भारतात मिळणार नाही यामुळे पाकिस्तान(Pakistan)ला आर्थिक फटका तर बसेलच पण त्याचबरोबर भारतामध्ये देखील याचे परिणाम दिसतील व बांधकाम क्षेत्रामधील व्यापाऱ्यांना यांचा विशेष फटका बसेल

हे हि वाचा –Summer Food-उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे अमृतच!

कापूस
भारत (India)देश हा कृषिप्रधान देश असून देखील भारतामध्ये कापसाचे उत्पन्न हे कमी प्रमाणात घेतले जाते त्यामुळे भारताला दरवर्षी पाकिस्तान(Pakistan) मधून मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आयात करावा लागतो पाकिस्तान(Pakistan) मध्ये कापसाचे क्षेत्र मोठे आहे दरवर्षी भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून कापूस आयात करतो पण सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तान(Pakistan) मधील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार हे मात्र निश्चित आहे
तांबे स्टील ॲल्युमिनियम

भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून तांबे स्टील आणि ॲल्युमिनियम देखील आयात करतो पाकिस्तान(Pakistan)मध्ये तांब्याचे साठे हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथून तांबे हे भारतामध्ये आयात केले जाते ॲल्युमिनियम देखील मोठ्या प्रमाणामध्ये आयात केले जाते भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) आयत बंद केले आहे

वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास भारताने घेतलेल्या निर्णयाचा फार मोठा फटका हा पाकिस्तानला आर्थिक रूपात बसणार आहे भारत आणि पाकिस्तान मध्ये सुरू झालेला हा संघर्ष पाकिस्तानला पूर्ण बरबाद करेल असे रक्षा तज्ञांचे मत आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हे अत्यंत खालावलेली असताना देखील पाकिस्तान भारतासमोर तग धरू शकत नाही हे माहिती असताना देखील पाकिस्तानच्या खुरापती सीमेवर चालूच आहेत भारत देश देखील पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणार हे मात्र निश्चित आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानवर हे युद्ध म्हणजे हिंदीत एक म्हण आहे गरीबी मे आटा गीला ही अवस्था सध्या पाकिस्तानची झालेली आहे एकीकडे सिंधू नदीचे पाणी बंद आहे दुसरीकडे व्यापार बंद आहे आणि तिसरीकडे लष्करी कारवाईची भीती देखील पाकिस्तानच्या मनामध्ये आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button