Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

WhatsApp वापरताना ‘या’ 4 चुका करू नका; नाहीतर क्षणात अकाउंट होऊ शकते बॅन!

व्हॉट्सॲपचे नियम मोडल्यास तुमचे अकाउंट तात्पुरते किंवा कायमचे बंद होऊ शकते. जाणून घ्या कोणत्या 4 सवयी टाळणे आवश्यक आहे

Advertisment

WhatsApp Account Ban

WhatsApp Account Ban
या चार कारणांमुळे तुमची व्हाट्सअप अकाउंट बॅन होऊ शकते

व्हॉट्सॲप आपण रोज वापरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन देखील होऊ शकते?

Advertisement

अशा कोणत्या चार सवयी आहेत, ज्या आपल्यात असतील तर आपलेही व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते?

Advertisement

 

एकमेकांना संदेश पाठविण्यासाठी संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे ॲप कुठले असेल, तर ते आहे

व्हॉट्सॲप. या ॲपमध्ये मुख्यतः चॅटिंग करणे, डॉक्युमेंट पाठवणे, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल,

फाइल पाठविणे अशी कामे आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करतो.

https://web.whatsapp.com/mobile/

व्यवसाय वाढीसाठी देखील व्हॉट्सॲपचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.

 

पण व्हॉट्सॲप वापरण्याचे काही नियम आहेत, जे आपल्याला माहिती पाहिजेत.

नाहीतर आपले व्हॉट्सॲप अकाउंट कधीही बॅन होऊ शकते.(WhatsApp Account Ban)

 

थर्ड पार्टी ॲप्स वापरू नका

 

अनेक वापरकर्ते अधिक वैशिष्ट्ये मिळवण्यासाठी जीबी व्हॉट्सॲप, व्हॉट्सॲप

प्लस किंवा इतर सुधारित ॲप्स वापरतात. हे ॲप्स व्हॉट्सॲपची अधिकृत आवृत्ती नाही

हे ही वाचा-११ कोटींची लॉटरी लागली, पण तिकीट कचऱ्यात फेकलं! ६ टन कचऱ्यातून अखेर सापडलं विजेतं तिकीट

आणि कंपनी त्यांना वापरण्याची परवानगी देत नाही. असे ॲप्स वापरल्यामुळे व्हॉट्सॲपवर

तात्पुरती बंदी येऊ शकते किंवा गंभीर प्रकरणांमध्ये कायमची बंदी घातली जाऊ शकते.

याव्यतिरिक्त, या अनधिकृत ॲप्समुळे गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो.

हे ही वाचा –स्ट्रोकचा धोका कमी करायचा आहे? मेंदूचे संरक्षण करणाऱ्या या ६ सवयी आजपासूनच अंगीकारा

त्यामुळे, नेहमी गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड केलेले अधिकृत व्हॉट्सॲप ॲप वापरणेच उत्तम.

 

खूप जास्त लोकांना संदेश पाठविणे

 

आपल्याला सवय असते की, एखादा संदेश आपल्याला आवडल्यास आपण तो खूप जास्त लोकांना पाठवतो.

असे महिन्यातून अनेक वेळा घडते. पण तुमची ही सवय देखील तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन करू शकते.(WhatsApp Account Ban)

व्हॉट्सॲप त्याला स्पॅम कृती मानू शकते, विशेषतः जर अनेक वापरकर्त्यांनी तुमचा नंबर रिपोर्ट केला

किंवा ब्लॉक केला असेल. अशा प्रकारची कृती सतत सुरू राहिल्यास

कंपनी तुमच्या खात्याची चौकशी करून कारवाई करू शकते.

 

मोठ्या प्रमाणात संदेश पाठवणे, अनोळखी लोकांना वारंवार संदेश

पाठवणे किंवा परवानगीशिवाय जाहिरातीचे संदेश पाठवणे टाळावे.

 

चुकीची माहिती किंवा खोट्या बातम्या पसरविणे

 

व्हॉट्सॲपवर आपण बऱ्याच वेळा पाहतो की, चुकीची माहिती तसेच खोट्या बातम्या देखील

मोठ्या प्रमाणात पसरवल्या जातात. हे देखील व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन आहे.

जर वापरकर्त्यांनी तक्रार केली, तर व्हॉट्सॲप कारवाई देखील करू शकते.

 

कोणताही संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे महत्त्वाचे आहे,

विशेषतः ज्या संदेशांमध्ये भीती पसरवणारे घटक, खोटे दावे किंवा संशयास्पद लिंक्स असतात.

त्यामुळे पुढे कधीही मेसेज करताना नीट विचार करूनच तो फॉरवर्ड करा.

 

आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्री शेअर करणे

 

व्हॉट्सॲपवर हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी सामग्री, द्वेषपूर्ण संदेश, बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित सामग्री किंवा इतर

प्रतिबंधित सामग्री शेअर करणे नियमांच्या विरुद्ध आहे. अशा प्रकरणांमध्ये व्हॉट्सॲप तात्काळ खाते बंद करू शकते.

याव्यतिरिक्त, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे, कोणतीही

संवेदनशील किंवा आक्षेपार्ह सामग्री शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी.

 

वर दिलेल्या चार चुका आपण व्हॉट्सॲप वापरताना करू नयेत, याची काळजी घ्यावी.

तसेच व्हॉट्सॲप हे सकारात्मक गोष्टी, एखादा आनंदाचा क्षण किंवा दुःखाचा क्षण

एकमेकांमध्ये शेअर करण्यासाठी आहे; खोट्या बातम्या पसरविणे किंवा

एखादी अफवा पसरविण्यासाठी नाही, याची काळजी आपण नक्की घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button