११ कोटींची लॉटरी लागली, पण तिकीट कचऱ्यात फेकलं! ६ टन कचऱ्यातून अखेर सापडलं विजेतं तिकीट
'Non Payable' चा अर्थ न समजल्याने इटलीतील महिलेची मोठी चूक; सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वाचले ११ कोटी रुपयांचे बक्षीस

११ कोटींची लॉटरी लागली तिकीट कचऱ्यात फेकले
इटलीमधील एका घटनेची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये जोरात चालू आहे.
आणि याला कारण आहे एक लॉटरी तिकीट. इटलीमधील एका महिलेला अकरा कोटी रुपयांची लॉटरी लागली,
पण लॉटरीचा निकाल पाहण्याआधीच या महिलेने ते तिकीट कचऱ्यामध्ये फेकून दिले.
जेव्हा तिच्या लक्षात आले की आपण ११ कोटी रुपयांचे तिकीट फेकून दिले आहे,
तेव्हा तिने शोधाशोध सुरू केली. पुढे काय घडलं ते पाहूया.
हिंदीमध्ये एक म्हण आहे, “भगवान जब देता है तो छप्पर फाडके देता है”, पण आपण घ्यायलाही तयार पाहिजे.
हे ही वाचा-स्ट्रोकचा धोका कमी करायचा आहे? मेंदूचे संरक्षण करणाऱ्या या ६ सवयी आजपासूनच अंगीकारा
इटलीमधील एका महिलेला ११ कोटी रुपयांची लॉटरी लागली, पण निकाल
पाहण्याआधीच त्या महिलेने ते तिकीट कचऱ्यात फेकून दिले. नंतर मजेशीर पद्धतीने ते तिकीट तिला परत मिळाले.
अकरा कोटी रुपयांची लॉटरी लागली
ही घटना इटलीतील बारी (Bari) परिसरातील आहे. एका सामान्य कुटुंबातील महिलेने एक लॉटरीचे तिकीट घेतले. ती
हेही वाचा-महाराष्ट्रात नकली पनीरवर बंदी! FDA ची मोठी कारवाई; आता हॉटेल्स-रेस्टॉरंट्समध्येही वापरास मनाई
अशा पद्धतीची तिकिटे नेहमी घेत असे. कधीतरी नशीब उजळेल या संकल्पनेतून ती दर महिन्याला तिकीट घेत असे आणि एक
दिवस तिला खरोखरच लॉटरी लागली. त्या महिलेने लॉटरी तिकीट दुकानातील सेल्फ-चेक मशीनवर तिकीट तपासले.
मशीनवर “Non Payable” (नॉन पेयेबल) असा संदेश दिसला. त्या महिलेने याचा अर्थ तिकीट जिंकले नाही असा समज करून
ते कचऱ्यात टाकले. प्रत्यक्षात “Non Payable” म्हणजे दुकानदाराकडून
इतकी मोठी रक्कम देता येणार नाही; ती अधिकृत लॉटरी कार्यालयातून घ्यावी लागेल, असा अर्थ होता.
त्या महिलेने अकरा कोटी रुपयांचे तिकीट फेकून दिले
“Non Payable” म्हणजे दुकानदाराकडून इतकी मोठी रक्कम देता येणार नाही;
ती अधिकृत लॉटरी कार्यालयातून घ्यावी लागेल, असा अर्थ होता.
पण त्या महिलेला वाटले की आपण तिकीट जिंकले नाही. वास्तव तिच्यासमोर येण्या
आधीच तिने ते तिकीट कचऱ्यात फेकून दिले. नंतर या महिलेने त्या तिकिटाचा शोध सुरू केला.
घरामध्ये ते तिकीट सापडले नाही. तिने कचरा पाहिला, तर कचरा नेमका टाकून दिला होता.
घरी गेल्यानंतर नातेवाईकांनी तिला तिकीट विजेते असल्याचे सांगितले. तोपर्यंत कचरा गोळा करणारी गाडी निघून गेली होती.
महिलेच्या विनंतीनंतर स्थानिक कचरा व्यवस्थापन संस्थेने विशेष शोधमोहीम सुरू केली.
कर्मचाऱ्यांनी सुमारे ६ टन कचरा तपासून अखेर विजेते तिकीट शोधून काढले.
तिकीट सुरक्षित मिळाल्यानंतर महिला भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
या घटनेतील विशेष बाब
कचरा व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही घटना “चमत्कारापेक्षा कमी नाही” असे म्हटले.
शोधमोहीम यशस्वी झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मजेत स्वतःसाठीही
लॉटरीचे स्क्रॅच कार्ड घेतले आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याला ५० युरोचे बक्षीसही लागले.
या घटनेतून काय शिकायला मिळते?
लॉटरी तिकीट तपासताना स्क्रीनवरील संदेशाचा योग्य अर्थ समजून घ्यावा.
मोठे बक्षीस लागल्यास तिकीट लगेच फेकू नये. अधिकृत लॉटरी केंद्राकडून किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरून तिकीटाची खात्री करून घ्यावी.






