तारक मेहता का उल्टा चश्मा कलाकारांचे मानधन: कोण घेतो सर्वाधिक पैसे?
जेठालालपासून बबीताजी, भिडे आणि पोपटलालपर्यंत; ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या कलाकारांना प्रति एपिसोड किती मानधन मिळते? जाणून घ्या.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Salary
हिंदी टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये अनेक टीव्ही सिरीयल्सनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यामध्ये रामायण, महाभारत, कृषिदर्शन, हम लोग, सुरभी तसेच नव्या पिढीमध्ये
तारा, कौन बनेगा करोडपती, सीआयडी यांचा समावेश आहे. यामध्येच एक सर्वात
गाजलेले नाव म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या सिरीयलमधील प्रत्येक
व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली. या सिरीयलमध्ये काम करणारे सर्व
कलाकार किती मानधन घेतात, तुम्हाला माहिती आहे काय? तर चला जाणून घेऊया.

तारक मेहता का उल्टा चश्मा
सोनी सब या वाहिनीवर सर्वात जास्त गाजलेली सिरीयल म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा.
या सिरीयलची सुरुवात 28 जुलै 2008 रोजी सोनी टीव्हीवर झाली.
गुजराती भाषेमधील एका कथेवर ही सिरीयल आधारित आहे. तारक मेहता
यांच्या Duniya Ne Undha Chashmah या प्रसिद्ध विनोदी स्तंभातून मालिकेला प्रेरणा मिळाली.
या मालिकेने 4,000 भागांचा टप्पाही गाठला आहे, जो भारतीय टीव्हीवरील
विनोदी मालिकेसाठी मोठा टप्पा मानला जातो. या मालिकेतील पात्रे खालीलप्रमाणे आहेत.
जेठालाल —
दया गडा
चंपकलाल गडा (बापूजी)
टप्पू
तारक मेहता
अंजली मेहता
बबीता जी
अय्यर
आत्माराम भिडे
माधवी भाभी
पोस्टमन पोपटलाल
सोडी
डॉ. हंसराज हाथी

जेठालाल गडा
तारक मेहता मधील सर्वात महत्त्वाचे व विनोदी पात्र म्हणजे जेठालाल गडा.
ही भूमिका दिलीप जोशी साकारतात. एका मीडिया रिपोर्टनुसार दिलीप जोशी यांना दीड ते दोन लाख रुपये प्रति एपिसोड मानधन मिळते.
हेही वाचा-Gen Z ची नाराजी दूर करण्यासाठी विशेष टीम मैदानात
चंपकलाल गडा
चंपकलाल गडा हे पात्र अमित भट्ट साकारतात. हे पात्र जेठालाल गडा यांच्या वडिलांचे आहे.
अमित भट्ट हे प्रति एपिसोड मीडिया रिपोर्टनुसार 70 ते 75 हजार रुपये मानधन घेतात.
बबीताजी
मुनमुन दत्ता शोमध्ये बबीता जीचे पात्र साकारतात. रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता एका एपिसोडसाठी सुमारे 75 ते 80
हजार रुपये मानधन घेतात. आपल्या स्टाइल आणि चुलबुल्या अंदाजामुळे त्या दीर्घकाळापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
अय्यर
अय्यर हे पात्र तनुज महाशब्दे साकारतात. जेठालाल व अय्यर यांच्यामधील संवाद प्रेक्षकांना हसवतात.
तनुज महाशब्दे हे प्रति एपिसोड 40 ते 45 हजार रुपये मानधन घेतात, असे काही मीडिया रिपोर्ट प्रकाशित झाले आहेत.

आत्माराम भिडे
तारक मेहता का उल्टा चश्मा या सिरीयलमधील गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी
आणि शिक्षकाची भूमिका मंदार चांदवडकर यांनी साकारली आहे.
मंदार प्रति एपिसोड 80 हजार रुपये मानधन घेतात, अशी चर्चा आहे.
माधवी भिडे
आत्माराम भिडे यांच्या पत्नीचे हे पात्र आहे. हे पात्र सोनालिका जोशी या साकारतात.
सोनालिका जोशी या प्रति एपिसोड 40 ते 50 हजार रुपये मानधन घेतात, असे मीडिया रिपोर्ट प्रकाशित झाले आहेत.
पत्रकार पोपटलाल
पत्रकार पोपटलाल हे एक मजेशीर पात्र आहे. विवाह न झाल्यामुळे विवाहासाठी उत्सुक असतो,
पण त्याचे लग्न जमत नाही, असे हे पात्र आहे. हे पात्र श्याम पाठक यांनी साकारले आहे.
श्याम पाठक एका एपिसोडसाठी, मिळालेल्या माहितीनुसार व मीडिया रिपोर्टनुसार, 40 ते 50 हजार रुपये मानधन घेतात.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही भारतीय टीव्ही सिरीयलच्या इतिहासामधील
सर्वात प्रसिद्ध अशी टीव्ही सिरीयल आहे. यामधील कलाकार किती मानधन घेतात, हे आपण पाहिले आहे.
नोट – सदरील माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून मीडिया रिपोर्टमधून गोळा केलेली आहे.
हे कलाकार एवढेच मानधन घेतात, असा दावा कुठेही संकल्प टुडे करत नाही. कमी किंवा जास्त मानधन हे कलाकार घेत असतील.







