Advertisement
मनोरंजन

शोले पुन्हा थिएटरमध्ये! 4K वर्जनसह नवा शेवट प्रेक्षकांसमोर

शोलेचा नवा शेवट उलगडणार! 50 वर्षांनंतर क्लासिक चित्रपट पुन्हा प्रदर्शित

Advertisment

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित चित्रपटाचे नाव घ्यायचे तर शोले हे नाव आपल्या नजरेसमोर येईल. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे आज पन्नास वर्षांनंतरही प्रत्येक भारतीयाच्या आठवणीत आहे.(Sholay Final Cut)

Sholay Final Cut
4 K मध्ये शोले परत री रिलीज होणार

आता पन्नास वर्षांनंतर हा चित्रपट परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. यामध्ये आपण न पाहिलेला चित्रपटाचा भाग देखील पाहता येणार आहे.

Advertisement

 

Advertisement

शोले

15 ऑगस्ट 1975 रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि हिट चित्रपट शोले प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेले नाहीत. मुंबईमधील एका चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट तब्बल तीस वर्षे चालला.

हे ही वाचा-सीजन बदलताच सर्दी-खोकला, ताप का वाढतो?

हेही वाचा-अंकुरित बटाटे खाणं धोकादायक का असतं?

रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या काळची बरीच मोठी स्टार कास्ट घेऊन हा चित्रपट बनविण्यात आला होता. यामध्ये मुख्य भूमिकेत धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी, अमजद खान

 

यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट एवढा सुंदर बनविला गेला होता की यामधील प्रत्येक पात्र व त्याचे सर्व संवाद हे आजदेखील सर्वांना पाठ आहेत.

 

सर्वात जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये चालण्याचा विक्रम याच चित्रपटाच्या नावे आहे. या चित्रपटाची शूटिंग ही मुख्यतः कर्नाटक मधील रामगड येथे करण्यात आली होती. या चित्रपटातील पात्र तर लक्षात होतेच, त्याचबरोबर या चित्रपटातल्या घोडीचे नाव देखील आजही लोकांच्या लक्षात आहे.

 

शोले परत आपल्या भेटीला

Sholay Final Cut

 

15 ऑगस्ट 1975 ला प्रदर्शित झालेला चित्रपट आता 12 डिसेंबर 2025 रोजी रिस्टोअर वर्जनमध्ये परत एकदा आपल्या भेटीला येणार आहे. पण या चित्रपटामध्ये पहिल्या चित्रपटाचा जो शेवट आहे तो नसेल, तर दुसराच एक शेवट असेल.

 

पहिल्या चित्रपटाचा शेवट हा डाकू गब्बर सिंह याला पोलीस अटक करून घेऊन जातात असा दाखविण्यात आला होता. हा शेवट 12 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात नसणार, वेगळा शेवट असणार अशी माहिती सध्या मिळत आहे. तसेच हा चित्रपट आता 4K मध्ये असणार आहे;

 

त्याचाही अनुभव आपल्याला घेता येणार आहे. या चित्रपटाला आता शोले – द फायनल कट असे नाव देण्यात आले आहे. भारतामधील 1500 चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

 

फिल्म हेरिटेज फाउंडेशनने या चित्रपटाबाबत माहिती सोशल मीडियावर दिली

https://x.com/FHF_Official/status/1989676759047090431?t=SyaCCNGBAYklH_LQccFwVw&s=19

तब्बल पन्नास वर्षांनंतर नव्या शेवटासह हा चित्रपट परत एकदा भेटीला येत आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. नव्या पिढीलाही हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची नामी संधी आली आहे. 4K चित्रपट

 

असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी आणखीच मजा येईल. या चित्रपटातील काही प्रमुख पात्र म्हणजे जय–वीरूची जोडी, हेमा मालिनी यांनी साकारलेली बसंती टांगेवाली, अमजद खान यांनी साकारलेली गब्बर सिंहची भूमिका, विजू खोटे यांनी साकारलेली कालियाची भूमिका, मॅक मोहन यांनी साकारलेली सांभाची भूमिका, संजीव कुमार यांनी

 

 

साकारलेली ठाकूरची भूमिका, जगदीप यांनी साकारलेली सुरमा भोपालीची भूमिका, आणि असरानी यांनी ‘आंग्रेजों के ज़माने के जेलर’ ही भूमिका—ही सर्व पात्रे परत एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यासाठी आपल्याला 12 डिसेंबर 2025 ची वाट पहावी लागणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button