एका महिन्यात १३ वेळा पेनकिलर घेतल्याने दोन्ही किडन्या खराब?
डोकेदुखी, अंगदुखी किंवा सांधेदुखीसाठी मनाने पेनकिलर घेणे ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या वेदनाशामक औषधांचे किडनीवर होणारे गंभीर परिणाम.

Painkillers Side Effect
एका महिन्यात १३ वेळा वेदनाशामक गोळ्या घेतल्याने दोन्ही मूत्रपिंडांना इजा झाली,
ज्यामुळे प्रत्यारोपणाची गरज भासली. तुम्हीही ही चूक करत आहात का?
अंगदुखी किंवा डोकेदुखी असेल तर आपण सर्रास पेनकिलर घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का?
एका महिन्यात १३ वेळा पेनकिलर (वेदनाशामक गोळ्या) घेतल्यामुळे किडनीला इजा झाली आणि
त्यामुळे त्या रुग्णाला प्रत्यारोपणाची गरज भासली. नेमके प्रकरण काय, ते पाहूया.

पेनकिलर, वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम
वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घेत असलेली वेदनाशामक औषधे आराम
देणारी म्हणून ओळखली जात असली तरी, चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ती आयुष्यभराच्या वेदनांना
कारणीभूत ठरू शकतात. अलीकडेच वेदनाशामक औषधे घेतल्यामुळे एका तरुणाच्या
मूत्रपिंडांना इजा झाली. जर तुम्हीही वारंवार वेदनाशामक औषधे घेत असाल, तर त्यांचे दुष्परिणाम जाणून घ्या.
नियमित पेनकिलर घेतल्याचे दुष्परिणाम
सांधेदुखी असो, डोकेदुखी असो, पाठदुखी असो किंवा ताप असो, आपण सहसा डॉक्टरांकडे जाण्याआधी स्वतःहून एखादी
पेनकिलर घेतो. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वतःच औषध घेणे लोक पसंत करतात आणि यामधूनच वेदनाशामक गोळ्या मनमानीने घेतल्या जातात.
मनाने/मनमानीने पेनकिलर घेण्याचे दुष्परिणाम
डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी किंवा सांधेदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर घेणे धोकादायक ठरू शकते.
पोटावर परिणाम: ॲसिडिटी, पोटदुखी, अल्सर किंवा पोटातून रक्तस्राव होऊ शकतो.
हेही वाचा-तारक मेहता का उल्टा चश्मा कलाकारांचे मानधन: कोण घेतो सर्वाधिक पैसे?
किडनीचे नुकसान: काही वेदनाशामक औषधांचा जास्त वापर किडनीवर गंभीर परिणाम करू शकतो.
लिव्हरचे नुकसान: पॅरासिटामॉलचे प्रमाण जास्त झाल्यास यकृताला गंभीर इजा होऊ शकते.
हृदय आणि रक्तदाब: काही पेनकिलरमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
वेदनांचे मूळ कारण लपते: पेनकिलरमुळे वेदना तात्पुरत्या कमी होतात, पण आजाराचे निदान उशिरा होऊ शकते.
औषधांचा अतिवापर: काही लोकांमध्ये डोकेदुखीच्या गोळ्यांच्या अतिवापरामुळे उलट वारंवार डोकेदुखी होऊ शकते.
महत्त्वाचे: डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त औषध घेऊ नका. विशेषतः पॅरासिटामॉल किंवा वेगवेगळ्या नावांच्या
एकाच घटक असलेल्या औषधांचे मिश्रण नकळत जास्त प्रमाणात घेतले जाऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेऊ नका
एका रुग्णाच्या किडन्या फेल झाल्या?
प्रसार माध्यमांमधील दिलेल्या बातमीनुसार, इंदूरमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय नंदाराम यांची दोन्हीही मूत्रपिंडे खराब झाली असून
त्यांना प्रत्यारोपणाची गरज आहे. या रुग्णाने महिन्यात १३ दिवस पेनकिलर घेतल्या आणि त्यानंतर त्यांच्या किडन्या फेल झाल्या.
बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता वेदनाशामक गोळ्या घेतात. ही सवय सामान्य वाटू शकते,
परंतु वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर किंवा अयोग्य वापर गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो.
बहुतेक लोकांना हे माहीत नसते की वेदनाशामक गोळ्या वेदनेपासून तात्पुरता आराम देतात.
परंतु त्यांच्या वारंवार सेवनाने महत्त्वाच्या अवयवांवर, विशेषतः मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होऊ शकतो.
पेनकिलर (वेदनाशामक) औषधे कशी काम करतात?
वेदनाशामक औषधे थेट वेदना “बरी” करत नाहीत, तर वेदनेचे संकेत कमी करून किंवा रोखून आराम देतात.
उदाहरणार्थ, जेव्हा तुमच्या शरीरात कुठेही दुखापत किंवा सूज येते,
तेव्हा तुमचे शरीर काही विशिष्ट रसायने तयार करते, ज्यांना प्रोस्टाग्लँडिन्स म्हणतात.
ही रसायने मेंदूला शरीराच्या त्या भागात वेदना असल्याचा संदेश पाठवतात.
वेदनाशामक औषधे या रसायनांचे उत्पादन कमी करतात. जेव्हा या रसायनांचे उत्पादन कमी होते,
तेव्हा वेदना कमी जाणवते, सूज कमी होऊ शकते आणि तापही उतरू लागतो.
पेनकिलर (वेदनाशामक औषधे) कशी हानी पोहोचवतात?
काही पेनकिलर मूत्रपिंडाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम करतात. पेनकिलर जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळ घेतल्यास
मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. ज्या रुग्णांना आधीपासून
बीपी, शुगर अशा समस्या असतात, त्यांना हा धोका अधिक असू शकतो.
वेदनाशामक औषधे घेण्यापूर्वी ही खबरदारी घ्या
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे कधीही घेऊ नका.
औषधाच्या पाकिटावर दिलेल्या मात्रेनुसार किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या मात्रेनुसार औषध घ्या.
मूत्रपिंडे निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण राखणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला किडनीचा आजार, यकृताचा आजार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल, तर औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की सांगा.
वेदनाशामक औषधे घेतल्यानंतर लघवीत बदल, शरीरावर सूज, तीव्र थकवा, मळमळ किंवा अशक्तपणा जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे घातक ठरू शकते.
त्यामुळे कोणतेही औषध घेताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
नोट: सदरील माहिती ही केवळ आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी असून वैद्यकीय उपचारासाठी नाही. ही माहिती
इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली आहे. आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.







