Advertisement
राजकीय बातम्या

दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार? तटकरे-पटेल यांची जोरदार मोर्चेबांधणी; सुनेत्रा-पार्थ पवारांचा विरोध!

१० नोव्हेंबरनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता? शरद पवारांच्या भेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चेला वेग; सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचीही चर्चा!

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण

दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे होणार विलीनीकरण?

Advertisement

तटकरे-पटेल यांची मोर्चेबांधणी : सुनेत्रा पार्थ यांचा विरोध?

Advertisement

१० तारखेनंतर राज्यात कोणती राजकीय मोठी घडामोड घडणार

मुंबई-प्रफुल्ल पटेल यांनी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात घेतलेली शरद पवार यांची भेट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या

विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

हेही वाचा-अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवा, सरकार देणार २५ हजार रुपये; नितीन गडकरींची महत्त्वाची माहिती

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात,

यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील

एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशी भाजपचीही इच्छा असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध आहे,

त्यामुळे ते काय भूमिका घेताहेत, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा-मेक्सिकोमध्ये ‘अलौकिक’ जीव कॅमेऱ्यात कैद? सहा फूट उंच रहस्यमय आकृतीमुळे खळबळ

शरद पवार व प्रफुल पटेल यांची भेट

प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलीनीकरणासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासाठी दिलेल्या

निरोपाबाबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस होती की पडद्यामागे राजकीय जुळवाजुळव

सुरू आहे, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे. १० नोव्हेंबरनंतर राज्यात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.

 

भाजपाचा फायदा कसा?

 

दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होऊन एकत्रित पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्यास भाजपला महाराष्ट्रातील राजकीय ताकद वाढवता येईल.

 

पवार गटाचे लोकसभेतील आठ खासदार केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या

बाजूने आल्यास संसदेतील संख्याबळालाही बळ मिळू शकते.

 

सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळणार?

दुसरीकडे, विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाला केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सहभागाची संधी मिळू शकते.

सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे

तसेच राज्यातील एका बड्या नेत्याला देखील मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी ही सध्या चर्चा जोरात आहे

मात्र, या संभाव्य पदांबाबत कोणतेही अधिकृत आश्वासन समोर आलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची अमित शहा यांच्या सोबत भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अमित शहा यांची भेट

 

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते.

यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे यांचा समावेश

असल्याचे सांगितले जाते.यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेलनीकरणाबाबतीत देखील

चर्चा झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार

उपस्थित नसल्याने पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा अधिक तीव्र झाली.

 

सुनील तटकरे काय म्हणाले?

 

अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले दिसले असते,

असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

अजित यांच्या निधनामुळे विलिनीकरणाची चर्चा मागे पडली. मी त्यांच्या जवळचा सहकारी असल्याने दादांनी मला

विलिनीकरणाबाबत सांगितले होते. ते असते तर विलिनीकरण पाहता आले असते, असे तटकरे म्हणाले.

मात्र, १२ फेब्रुवारीच्या बैठकीत विलीनीकरणाबाबत काहीच चर्चा झाली नाही असे तटकरे वारंवार सांगत होते.

मात्र, आता त्यांनी वेगळी भूमिका का घेतली? असा सवाल शरद पवार यांच्या

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तटकरे यांना केला आहे.

 

विलीनीकरण झाल्यास पक्षाचे नेतृत्व कोणाकडे राहणार आणि सत्तेतील वाटा कसा ठरणार, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व कायम राहणार की शरद पवार पुन्हा पक्षात निर्णायक भूमिका बजावणार, याची उत्सुकता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button