Advertisement
राजकीय बातम्या

“राजकीय निवृत्तीचे संकेत? नितीन गडकरींच्या वक्तव्यानंतर देशभर चर्चेला उधाण”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले निवृत्तीबाबत संकेत; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग

Advertisment
Nitin Gadkari Retirement- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी स्वतःच्या कार्याचा ठसा संपूर्ण देशावर त्यांनी उमटविला मागील अनेक वर्ष सक्रिय राजकारणात नितीनजी गडकरी आहेत व त्यांची राजकीय विरोधक देखील जास्त नाहीत पण नितीन गडकरी यांनी आता निवृत्ती चे संकेत दिले आहेत

 

नागपूर येथील एका कार्यक्रमांमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पिढी राजकारणामध्ये चांगले काम करत आहेत त्यामुळे आता जुन्या पिढीने राजकारणांमधून रिटायरमेंट घेतली पाहिजे असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले त्यामुळे संपूर्ण राज्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे नितीनजी गडकरी राजकारणामधून निवृत्ती घेणार का ?(Nitin Gadkari Retirement)

Advertisement

 

Advertisement

नितीनजी गडकरी यांची कारकीर्द

केंद्रीय मंत्री नितीन जयराम गडकरी हे आधुनिक भारतातील पायाभूत सुविधा विकासाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. त्यांचा जन्म 27 मे 1957 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. साध्या, शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम कुटुंबात त्यांचे बालपण गेले. नागपूरमध्येच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी तसेच कायद्याचे शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश झाला.

हे हि वाचा-चांदीचे दर का वाढत आहेत? वाढीमागची 5 मोठी कारणेहे हि वाचा-

हे हि वाचा-महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरसेवकांना किती मानधन मिळते?

1995 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी राज्यात रस्ते, पूल आणि महामार्ग बांधणीत नवे प्रयोग राबवले. ‘बांधा–वापरा–हस्तांतर’ (BOT) तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणी करून त्यांनी कार्यक्षम प्रशासनाची ओळख निर्माण केली. 2009 पासून ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विस्तारले, एक्सप्रेसवे, फ्लायओव्हर, सेतू बांधणीला वेग दिला. तसेच जैवइंधन, इथेनॉल मिश्रण, हरित हायड्रोजन यांसारख्या पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन दिले. स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि विकासकेंद्री दृष्टिकोनामुळे नितीन गडकरी हे देशातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.आज संपूर्ण देशामध्ये हायवे चे काम झालेले आहेत ते सर्व नितीनजी गडकरी यांच्या कल्पनेतून झालेले आहेत फास्ट टॅग ची

 

यशस्वीरित्या अंमलबजावणी करणे असेल किंवा एकदम सुंदर अशी रोड बनविणे असेल हे सर्व काही नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे तसेच नितीन गडकरी यांचे शेती आणि शेतकऱ्यांकडे हे विशेष लक्ष असते वेळोवेळी ते विविध योजनांबद्दल माहिती शेतकऱ्यांना देत असतात नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पद देखील भूषविले आहे

https://www.facebook.com/share/v/1CGRNHEu9a/

नितीन गडकरी यांनी निवृत्तीचे संकेत का दिले?

नितीन गडकरी यांनी निवृत्तीचे संकेत(Nitin Gadkari Retirement) दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीमध्ये 75 वर्षानंतर रिटायरमेंट घेतली पाहिजे असे म्हणणे आहे तसेच नवीन पिढी सक्रिय राजकारणात असल्यामुळे आणि चांगले काम करत असल्यामुळे त्यांनाही काम करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे असे देखील नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या मागील काही दिवसातील निर्णय यावरून नितीन गडकरी नाराज असल्याच्याही चर्चा सध्या सर्वत्र चालू आहेत

 

तसेच राजकीय विश्लेषकांचे म्हणणे देखील हेच आहे एकंदरीत काही असले तरी दिन गडकरी यांनी आत्ताच राजकारणातून निवृत्ती घेऊ नये असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे कारण की उच्च प्रतीचे रस्ते आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची त्यांची जिद्द पाहता त्यांनी आणखीन काही वर्ष तरी जनतेची सेवा केली पाहिजे असेल शेतकऱ्यांचे तसेच व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button