सोने-चांदीचे वाढते दर राज्यसभेत गाजले; सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी
306% चांदी दरवाढ, 111% सोन्याची महागाई; काँग्रेस खासदारांचा सरकारवर गंभीर आरोप

सोने-चांदीचे वाढते दर : मुद्दा राज्यसभेत गाजला
राज्यसभा सोने चांदी मुद्दा
आज राज्यसभेमध्ये काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नीरज डांगी हे राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,

सोने व चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य नागरिकांना तसेच विशेषतः महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांनी केलेली बचत आणि सध्याचे सोन्याचे दर यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे.
मागील तेरा महिन्यांमध्ये, म्हणजे डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत, चांदीच्या दरामध्ये तब्बल 306 टक्के वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरामध्ये 111 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा-शुगर पेशंट ने दर सहा महिन्याला कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे?
हेही वाचा-षट्कर्म म्हणजे काय? नेतीसह षट्कर्मांचे प्रकार, फायदे व योग्य पद्धत
डिसेंबर 2024 मध्ये सोन्याचे दर सुमारे 7,000 रुपये प्रति ग्रॅम होते, तेच दर जानेवारी 2026 मध्ये 15,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तसेच डिसेंबर 2024 मध्ये एका किलो चांदीचे दर 90,000 रुपये होते, तेच दर जानेवारी 2026 मध्ये चार लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
ज्या देशात सोने आणि चांदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तिथे हा सामान्य नागरिकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. मात्र सध्या दिसणारी बेलगाम दरवाढ ही सरकारच्या अपयशाचे प्रतीक असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये आजही सोने-चांदी ही केवळ दागिने नसून, आर्थिक अडचणीच्या काळात उपयोगी पडणारी एक महत्त्वाची गुंतवणूक मानली जाते.
आज परिस्थिती अशी आहे की सामान्य नागरिक आपल्या मुलीच्या लग्नासाठी दागिनेही घेऊ शकत नाहीत. अनेक घरांमध्ये मुलींचे विवाह मागील एक वर्षापूर्वी ठरलेले असतानाही वाढत्या दरांमुळे विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागत आहेत. एकीकडे सरकार महागाई कमी करण्याचा दावा करत आहे
आणि महिला सशक्तीकरणाच्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे या वाढत्या दरांमुळे महिलाच मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे खासदारांनी नमूद केले.
सोने-चांदीचे दर वाढण्यामागची कारणे?
यावेळी बोलताना खासदार निलेश डांगी यांनी सोने-चांदीचे दर वाढण्यामागची कारणेही स्पष्ट केली. यामध्ये प्रामुख्याने उच्च आयात शुल्क, जास्त जीएसटी आणि काही व्यापाऱ्यांकडून नफा मिळवण्यासाठी सोने-चांदीची साठवणूक (जमाखोरी) केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे सामान्य नागरिकांना या वाढत्या दरांचा मोठा फटका बसत असताना, दुसरीकडे साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होत आहे. त्यांना सरकारकडून अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोपही खासदार निलेश डांगी यांनी केला.
तसेच या दरवाढीचा फटका केवळ ग्राहकांनाच नाही, तर सोने-चांदीच्या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि दागिने तयार करणारे कारागीर यांनाही बसत आहे. अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने तातडीने या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे, आयात शुल्क कमी करावे, जीएसटी कमी करावी आणि जमाखोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
काँग्रेसचे खासदार निलेश डांगी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सरकार कितपत गंभीरपणे विचार करते, हे पाहावे लागेल. सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, याच दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन सामान्य नागरिकांना काही दिलासा देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरंच पाहिल्यास, सोने आणि चांदी हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यावर ठोस उपाययोजना दिसत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्र सरकार सोने-चांदीच्या दरांबाबत कोणता मोठा निर्णय घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







