
आता तुम्हाला फक्त सोन्यावरच नाही तर चांदीवरही कर्ज मिळू शकते; तुम्ही किती कर्ज घेऊ शकता ते जाणून घ्या?(RBI silver loan)
रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमाप्रमाणे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण पूर्वी सरकारी व खाजगी बँका फक्त सोन्यावरच कर्ज देत होत्या, परंतु आता आरबीआयच्या नवीन गाईडलाईन्सनुसार चांदीवर देखील कर्ज मिळणार आहे. त्या विषयाची संपूर्ण माहिती पाहूया.

जर तुम्ही आतापर्यंत फक्त सोन्याच्या कर्जाबद्दल ऐकले असेल, तर तयार राहा, कारण आता चांदीवर कर्ज घेण्याचे दार उघडले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी एक नवीन परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये सोन्यासह चांदीवर कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जर तुमच्याकडे चांदीचे दागिने किंवा नाणी असतील, तर ती आता फक्त सजावटीच्या वस्तू राहिलेली नाहीत; गरज पडल्यास त्या तुमच्या खिशात रोख रक्कम आणू शकतात.
पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘सोने आणि चांदीच्या तारणावर कर्ज देणे’ निर्देश २०२५ जारी केले आहेत, ज्या अंतर्गत आता चांदीवर कर्ज घेणे शक्य होईल. हे नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील.
आता चांदीवरही कर्ज मिळू शकते(RBI silver loan)
आतापर्यंत बँका फक्त सोने दागिने किंवा नाण्यांवर कर्ज देत होत्या. परंतु आरबीआयने नियमांमध्ये सुधारणा करून चांदीचाही समावेश केला आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत, व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, एनबीएफसी आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या आता सोन्यासह चांदीचे दागिने आणि नाण्यांवर कर्ज देऊ शकतील.
हेही वाचा-हिवाळ्यात गुळ खाण्याचे 10 जबरदस्त फायदे! जाणून घ्या गुळचे हेल्थ बेनिफिट्स
हेही वाचा-महागड्या उपचारांचा खर्च आता शून्य! राज्य सरकार देतंय आरोग्य कवच,
कोणत्या गोष्टींवर कर्ज मिळणार नाही?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की सोन्या किंवा चांदीच्या विटांवर (बुलियन) कर्ज उपलब्ध होणार नाही. तसेच सोन्या किंवा चांदीशी संबंधित गुंतवणुकीवर (उदा. ETF किंवा म्युच्युअल फंड) कर्ज दिले जाणार नाही.
रिझर्व बँक ऑफ इंडिया चा अधिकृत गाईडलाईन्स
https://www.rbi.org.in/commonperson/English/scripts/Notification.aspx?Id=900
किती तारण ठेवता येईल?
जास्तीत जास्त १ किलो सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज मिळेल
जास्तीत जास्त १० किलो चांदीच्या दागिन्यांवर कर्ज मिळेल
५० ग्रॅमपर्यंत सोन्याचे नाणे
५०० ग्रॅमपर्यंत चांदीचे नाणे गहाण ठेवून कर्ज मिळू शकते
कर्ज-ते-मूल्य (LTV) गुणोत्तर
२.५ लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावर ८५% पर्यंत LTV
२.५ ते ५ लाख कर्जावर ८०% पर्यंत LTV
५ लाखांपेक्षा जास्त कर्जावर ७५% पर्यंत LTV
कर्ज फेडल्यानंतर दागिने परत मिळणार
कर्ज पूर्ण फेडल्यानंतर, बँक किंवा संस्था सात कामकाजाच्या दिवसांत दागिने/चांदी परत करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास बँकेने कर्जदाराला प्रतिदिन ₹५,००० नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
कर्ज न फेडल्यास काय होईल?
कर्ज फेडण्यात चूक झाल्यास बँक किंवा एनबीएफसी सोनं किंवा चांदीचा लिलाव करू शकतात. परंतु लिलावापूर्वी कर्जदाराला सूचना देणे आवश्यक आहे. लिलावात राखीव किंमत किमान ९०% ठेवावी लागेल.







