15 जानेवारीपासून WhatsApp वर मोठा बदल
करोडो यूजर्ससाठी थर्ड पार्टी AI चॅटबॉट सर्व्हिस बंद

15 जानेवारीपासून WhatsApp वर मोठा बदल! करोडो यूजर्ससाठी थर्ड पार्टी AI चॅटबॉट सर्व्हिस बंद
WhatsApp AI Chatbot Ban
WhatsApp च्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. Meta ने WhatsApp Business API नियमांमध्ये केलेल्या मोठ्या बदलांमुळे आता 15 जानेवारी 2026 पासून थर्ड पार्टी AI चॅटबॉट्स वापरण्यावर मोठी मर्यादा लागू होणार आहे.

https://www.whatsapp.com/security/advisories/2025?lang=en_US
याचा थेट परिणाम ChatGPT सारख्या लोकप्रिय AI सर्व्हिसवर होणार आहे. जगभरातील 5 कोटीपेक्षा जास्त WhatsApp यूजर्स ChatGPT WhatsApp इंटिग्रेशनद्वारे नियमीतपणे AI चॅट्सचा वापर करत होते. पण Meta च्या नव्या पॉलिसीनुसार ही सुविधा उपलब्ध राहणार नाही.
Meta ची नवी पॉलिसी कोणती?
Meta ने नुकतीच WhatsApp Business API पॉलिसीमध्ये बदल जाहीर केले. यात WhatsApp प्लॅटफॉर्मवर सामान्य प्रकारचे जनरल AI बॉट्स वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. यानंतर WhatsApp वर अधिकृत API वापरून फक्त ‘अधिकृत, व्हेरिफाइड आणि
Meta स्टँडर्ड कम्प्लायंट’ AI सिस्टम्सच चालू शकतील. यामध्ये मोठ्या टेक कंपन्या आणि ऑथोराइज्ड AI पार्टनर्सना प्राधान्य दिले जाईल. ChatGPT, Perplexity AI, Claude सारख्या थर्ड पार्टी AI बॉट्सना WhatsApp वर थेट वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
OpenAI नेही आपल्या ब्लॉगमध्ये यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने सांगितलं की ते WhatsApp वर सर्व्हिस देत राहू इच्छितात, मात्र Meta च्या पॉलिसीमुळे त्यांना ट्रान्झिशन करावं लागणार आहे.
यूजर्सची जुनी ChatGPT WhatsApp चॅट्स सेव्ह कशी करायची?
कंपनीच्या माहितीनुसार, 15 जानेवारी 2026 नंतरही यूजर्स त्यांच्या WhatsApp – ChatGPT AI चॅट्स हरवणार नाहीत. यूजर्सने फक्त ChatGPT अकाउंट अॅप किंवा वेबवर लॉगिन करून WhatsApp नंबर लिंक करावा लागेल.
लिंक झाल्यानंतर आधीपासून WhatsApp मधील ChatGPT इतिहास ChatGPT च्या मुख्य अॅपवर दिसेल. WhatsApp मात्र AI बॉट्स चॅट्स एक्सपोर्ट देत नाही, परंतु ChatGPT internally ते इतिहास सुरक्षित राखू शकते.
भारतातील Tech Market वर परिणाम
भारत व्हॉट्सॲपचा सर्वात मोठा देश बाजार आहे. AI आधारित कंटेंट, चॅट सपोर्ट, ऑटो न्यूज अपडेट्स, बिझनेस कस्टमर केअर हे मोठ्या प्रमाणात WhatsApp AI वर आधारित झाले होते. या बदलामुळे Digital India मध्ये AI-आधारित Conversational सर्व्हिसेसच्या Eco-system मध्ये मोठा शिफ्ट अपेक्षित आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र व 4 राज्यत डाळी तेलबिया खरेदी योजना 15095 किती रुपये मंजूर
ही वाचा-लहान मुलांना औषध देताना कोणत्या आठ काळजी घ्याव्यात|मुलांना औषध देताना या ८ चुका टाळा;
पुढे काय?
Meta कडून पुढच्या महिन्यात अधिक क्लिअर गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे. मात्र 15 जानेवारी 2026 हा AI बॉट्स बंदीचा डेट निश्चित आहे.
आता बिझनेस सेक्टरला WhatsApp वर AI Automations हवे असल्यास Meta Certified AI APIs किंवा Official Partner Solutions वापरावे लागतील.
हा बदल Tech World साठी Turning Point मानला जातो कारण WhatsApp हा थेट 2 अब्ज यूजर्स असलेला जगातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.







