Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

Delhi Railway Station Stampede: ‘रेल्वेची ती एक सूचना आणि चेंगराचेंगरी झाली

अपघाता नंतर तयार झालेले काही प्रश्न ?

Advertisment

Delhi Railway Station Stampede: ‘रेल्वेची ती एक सूचना आणि चेंगराचेंगरी झाली

नवी दिल्ली -नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये आतापर्यंत अठरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे हि चेंगराचेंगरी कशी झाली व एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना ही गर्दी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना केल्या होत्या तरी ही घटना का घडली

NEW DELHI RAILWAY STATION
नवी दिल्ली रेल्वे स्थानका

तारीख होती 15 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अनेक रेल्वे गाड्या या तुडुंब भरून प्रयागराच्या दिशेने जात होत्या आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे ही गर्दी आणखीनच वाढली होती आणि अचानक एक सूचना माइक मधून देण्यात आली व एकच धावपळ सुरू झाली आणि त्यामध्ये ही चेंगराचींगरी झाली
नेमकी घटना कशी घडली

Advertisement

नवी दिल्ली स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर 12,13 आणि 14 या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस व भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस या नियोजित वेळेपेक्षा उशिरा चालत होत्या त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे नवी दिल्ली प्लॅटफॉर्म वरून प्रत्येक तासाला जवळपास 1500 जनरल तिकीट हे तिकीट काउंटरवरून दिले जात होते

Advertisement

 

आणि यामुळे प्लॅटफॉर्म नंबर 14 वर प्रयागराज जाण्यासाठी मोठी गर्दी झाली ही गर्दी एवढी मोठी होती की या प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला देखील जागा राहिली नव्हती प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी तयार केलेल्या पायऱ्यांवर देखील भाविक हे येणाऱ्या ट्रेनची वाट बघत बसलेले होते

अपघात झाला कसा ?

या सर्व गोष्टी पाहून नवी दिल्ली रेल्वे प्रशासनाने नवी दिल्ली ते प्रयागराज एक विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीची घोषणा ही नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केली गेली की

 

नवी दिल्लीवरून प्रयागराज ला जाणारी विशेष ट्रेन ही प्लॅटफॉर्म नंबर 16 वर येत आहे ही घोषणा होताच भाविकांनी 16 नंबर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एकच गडबड केली आणि आपल्याला प्रयागराज ला जायला मिळावं या उद्देशातून हजारोची संख्येने हे भाविक प्लॅटफॉर्म क्रमांक 16 कडे जायला लागले आणि याच दरम्यान चेंगराचेंगरीला सुरुवात झाली या ठिकाणी रेल्वेच्या वतीने आर पी एफ च्या जवानांना ड्युटीवर पाठवलेले होते

 

पण त्यांना देखील ही गर्दी थांबवता आली नाही याच दरम्यान प्लॅटफॉर्म नंबर 14 वर पटनाला जाणारी ट्रेन मगध एक्सप्रेस आणि प्लॅटफॉर्म नंबर पंधरा वर जम्मूला जाणारी संपर्क क्रांती एक्सप्रेस उभी होती याच दरम्यान रेल्वेच्या फुलावर चढण्यासाठी पायऱ्यांवर जे भाविक गेले त्यातल्या काही जणांचा पाय घसरला व ही घटना घडली यामध्ये 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे

 

तर अन्य दहा भाविक हे जखमी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे ही दुखद घटना घडल्यानंतर लगेच दिल्ली अग्निशामन सेवा यांना सुद्धा बोलविले गेले तेथील प्रमुख अतुल गर्ग यांनी घटनास्थळावर येऊन जखमींना इस्पितळात दाखल केले सर्व जखमींना लोकनायक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे

 

या घटनेची उच्चस्तरीय चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे व लवकरच ही समिती आपला अहवाल हा रेल्वे प्रशासनाला देईल अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे तसेच प्रत्येक मृत व्यक्तीच्या परिवाराला दहा लाख रुपये तर जखमी झालेल्यांना अडीच लाख रुपये मदत देखील जाहीर करण्यात आली आहे

loknaya hospital
लोक नायक हॉस्पिटल

अपघाता नंतर तयार झालेले काही प्रश्न ?

या अपघातानंतर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत प्रत्येक तासाला 1500 एवढे जनरल तिकीट ही काढली जात होती आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती ही वाढती गर्दी ही रेल्वे प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही ?

एखाद्या रेल्वेमध्ये रेल्वेच्या डब्यात नेमकी किती प्रवासी प्रवास करू शकतात याची माहिती रेल्वे प्रशासनाला पूर्ण होती मग त्या हिशोबाने जनरल तिकीट का दिले गेले नाही ?

 

 

जेव्हा एकाच प्लॅटफॉर्मवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी वाढत होती तेव्हा ती गर्दी रोखण्यासाठी त्याच वेळेला उपाययोजना प्रशासनाने का केल्या नाही ?

जेव्हा एक विशेष गाडी प्रयागराज सोडण्याचा निर्णय झाला तेव्हा आर पी एफ चे जवान त्या ठिकाणी का तैनात केले गेले नाही? गर्दीचा अंदाजा हा मागील दोन वर्षापासून लावला जात आहे

हे हि वाचा-गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे वारंवार सांगत आहेत की 50 कोटीच्या वर भक्त हे प्रयागराज मध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येणार आहेत मग त्या हिशोबाने देशातील अन्य राज्याने उपाययोजना का केल्या नाही? रेल्वे प्रशासनाला माहिती होतं की रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी ही वाढणारच आहे मग त्या हिशोबाने अतिरिक्त रेल्वेची व्यवस्था का केली गेली नाही?

मदत जाहीर झाली

प्लॅटफॉर्म हे पूर्ण गर्दीने भरले असताना देखील नव्या लोकांना प्लॅटफॉर्मवर का सोडले गेले ?अशा बऱ्याच गोष्टींचे उत्तर आता रेल्वे प्रशासनाला शोधावे लागतील पण एकंदरीत रेल्वे विभागाचा ढिसाळ कारभार हाच या घटनेसाठी जबाबदार असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहेत

 

तसेच रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही देखील मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत मृतांचा आकडा हा आणखी जास्त असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे

 

 

हे हि वाचा –Shingnapur temple Decision । आता फक्त ब्रॅण्डेड तेलाभिषेक, शिंगणापूर देवस्थानाचा निर्णय

मौनी अमावस्येच्या दिवशी देखील प्रयागराज मध्ये अशाच पद्धतीची चेंगराचेंगरी झाली होती त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये प्रशासनाने खबरदारी घ्यायला पाहिजे होती पण तरीसुद्धा मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे होती पण तसं झाल्याचं दिसत नाही

 

 

आज आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधक आरोप करताना रेल्वेमंत्र्याच्या राजीनामाची मागणी करता येत तर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हे राजकारण करत असल्याचा आरोप देखील करत आहेत पण ज्या लोकांनी आपला जीव गमावलेला आहे त्या लोकांचं काय? ही चूक नेमकी कोणाची याविषयी कोणीही बोलताना दिसत नाहीये या गोष्टीसाठी जबाबदार असलेल्यांना खरोखर शिक्षा होईल का हा चौकशी अहवाल कधी येणार व त्या अहवालानंतर दोषींवर काय कारवाई होणार यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे

 

 

पण एकंदरीत झालेली ही दुःखद घटना यावरून आता महा कुंभासाठी उरलेले दिवस यासाठी खबरदारी घेणे आता महत्त्वाचे आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा प्रयागराच्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी लाखो भाविक हे प्रयागराज कडे जाण्यासाठी निघणार आहेत आता तरी प्रशासनाने प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनला खबरदारी घेणे गरजेचे आहे व अशा पद्धतीचा अपघात परत होणार नाही याची काळजी घ्यायला हवी
या चेगराचींगरीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button