Advertisement
लाइफ स्टाइल

नांदेड सायकलिस्ट ग्रुपचा प्रभाव; सायकलिंगची वाढती क्रेझ, विक्रीतही मोठी वाढ

हिमालयातील 600 किमी सायकल मोहिमेनंतर सायकलिंगबाबत जनजागृती; आरोग्यदायी जीवनशैलीकडे नागरिकांचा वाढता कल

Advertisment

सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे अनेक प्रकारचे आजारही होत आहेत. त्यामुळे परत एकदा आपल्या

Advertisement

जुन्या सवयींकडे वळण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. पूर्वी सर्वाधिक

Advertisement

वापरले जाणारे वाहन म्हणजे सायकल. मध्यंतरीच्या काळात सायकल कालबाह्य

झाली की काय, असे वाटत होते. मात्र आता नांदेड सायकलिस्ट ग्रुप(Nanded Cyclist Group) नव्या पिढीने पुन्हा एकदा सायकल

वापरण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे सायकलची

विक्रीही जोरात आहे आणि रोज सायकलिंग केल्यामुळे आरोग्यही सुधारत आहे.

Nanded Cyclist Group
Nanded Cyclist Group

नांदेड शहरातील नांदेड सायकलिस्ट ग्रुप(Nanded Cyclist Group) हा एक नावाजलेला ग्रुप आहे.

या ग्रुपमधील प्रत्येक सदस्य दररोज किती सायकल चालवली, याची

माहिती ग्रुपमध्ये शेअर करतो. या ग्रुपचा आदर्श घेऊन अनेकांनी रोज सायकल चालविण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच, शिवाय वाढते प्रदूषण कमी होण्यासही मदत होते.

प्रत्येकाने आदर्श घ्यावा असा हा नांदेड सायकलिस्ट ग्रुपचा यशस्वी प्रवास आहे.

हेही वाचा-1 जुलै 2026 पासून बदलणार हे 7 मोठे नियम.

हिमालयाच्या कुशीत नांदेडच्या 14 जणांचा सायकलप्रवास; 10 दिवसांत 600 किमी अंतर पूर्ण

हिमालयाच्या उंच पर्वतरांगा, खडतर रस्ते आणि भीतीदायक वळणे पार करणे हेच मोठे

साहस मानले जाते. अशा दुर्गम मार्गावर सायकलने प्रवास करणे ही अत्यंत धाडसी बाब आहे.

नांदेडच्या 14 जणांनी हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारत मनाली ते खारदुंगला

मार्गे सुमारे 600 किलोमीटरचा सायकलप्रवास अवघ्या 10 दिवसांत पूर्ण केला.(Nanded Cyclist Group)

 

समुद्रसपाटीपासून सुमारे 18 हजार फूट उंचीवरील खारदुंगला हा जगातील सर्वाधिक उंच

वाहनमार्गांपैकी एक मानला जातो. या संपूर्ण प्रवासात अत्यल्प लोकवस्ती, मर्यादित सुविधा,

कधी ऊन, कधी पाऊस तर रात्री कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीचा

सामना करत या पथकाने (Nanded Cyclist Group) सायकलिंगचा थरार अनुभवला.

 

या मोहिमेत डॉ. सुशीला राठी, डॉ. प्रल्हाद पालीवाल, डॉ. आनंद भगत, डॉ. श्याम शिरसम,

डॉ. सचिन राचेवाड, डॉ. राम कुरेमे, डॉ. मंगेश नरवडकर, डॉ. शैलेश कुलकर्णी,

डॉ. रोमित माळवतकर, अजीम पंजवानी, निक्की फलोर, विनायक गुडेवार,

श्रीकांत भुटाडा आणि राघवेंद्र कट्टी यांचा समावेश होता. या पथकात डॉक्टरांसह व्यापाऱ्यांचाही समावेश होता.

 

या साहसी मोहिमेची तयारी म्हणून सर्व सदस्यांनी नांदेडमध्ये सलग चार महिने

दररोज 60 ते 70 किलोमीटर सायकल चालवून नियमित सराव केला होता. त्यांच्या

या उल्लेखनीय यशाबद्दल नांदेडमध्ये परतल्यानंतर विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Nanded Cyclist Group
Nanded Cyclist Group

यामध्ये प्राथमिक शिक्षक असलेले संतोष गुंडरे हे देखील रोज सायकल चालवितात.

विशेष म्हणजे त्यांचे मूळ गाव लोहा आहे. तेथेही त्यांचा आदर्श घेऊन

अनेकांनी सायकल खरेदी करून सायकलवरच फिरणे पसंत केले आहे.

हेही वाचा-पायऱ्या चढताना गुडघे दुखतात? डॉक्टरांनी सांगितली सांध्यांच्या नुकसानीची सुरुवातीची लक्षणे

रोज सायकल चालवल्याने कोणते फायदे होतात?

 

रोज सायकल चालवणे हा सर्वांगिण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम मानला जातो.

दररोज 30 ते 45 मिनिटे सायकल चालवल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुधारते,

हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच शरीराची सहनशक्ती अधिक मजबूत होते.

सायकलिंगमुळे पाय, मांड्या, कंबर आणि पोटाचे स्नायू बळकट होतात,

अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते.

 

नियमित सायकल चालवल्याने उच्च रक्तदाब, टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि

वाढलेले कोलेस्टेरॉल यांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच सांध्यांवर कमी

ताण येत असल्याने हा व्यायाम अनेकांसाठी चालण्यापेक्षा अधिक सोयीचा ठरू शकतो. सायकलिंगमुळे ताण-तणाव कमी होतो, मानसिक

आरोग्य सुधारते, झोपेची गुणवत्ता वाढते आणि शरीरात उत्साह कायम राहतो.

 

याशिवाय, नियमित सायकल चालवणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सु

धारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास हातभार लागू शकतो.

मात्र, सायकल चालवल्याने कोणताही आजार पूर्णपणे होत नाही, असे म्हणता येत नाही.

संतुलित आहार, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यांसह सायकलिंग केल्यास

त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. त्यामुळे दररोज सायकल चालवण्याची

सवय ही निरोगी, तंदुरुस्त आणि सक्रिय जीवनासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

 

सायकलची विक्री जोरात

 

नांदेड सायकलिस्ट ग्रुपचा (Nanded Cyclist Group)आदर्श घेऊन नांदेड शहरामध्ये अनेकांनी रोज सायकल

चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरामध्ये सायकलची विक्रीही जोरात

असल्याची माहिती पावडेवाडी मंगल कार्यालयाजवळील श्री बालाजी लक्ष्मी एंटरप्राइजेस चे संचालक विशाल चक्करवार यांनी दिली.

 

विशेष म्हणजे, विशाल चक्करवार यांनी ज्या ग्राहकांनी नांदेड सायकलिस्ट ग्रुपमधील

कोणत्याही सदस्याचे नाव सांगितले, त्यांना सायकल खरेदीवर 10 टक्के सवलत (डिस्काउंट) देण्याची घोषणाही केली आहे.

 

मागील काही दिवसांपासून नांदेड शहरात सायकलिंगबाबत झालेल्या जनजागृतीमुळे

सायकलची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही विशाल चक्करवार यांनी संकल्प टुडेशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button