सायकल ची विक्री टॉप गेयर मध्ये
संपूर्ण जगभरामध्ये करोणाचे संकट आले संपूर्ण जग बंद पडले होते पण या दोन वर्षाच्या
दरम्यान लोकांमध्ये आरोग्य विषयक मोठी जागृती आली विशेष म्हणजे ऍलोपॅथीच्या नादाला न लागता
लोक आयुर्वेद व व्यायाम योगासने वेगळ्या प्रकारचे काढे पीत होते
याच दरम्यान व्यायामा बाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता आली योगासने करू लागली
अशातच एका व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेपण खऱ्या अर्थाने या व्यवसायाने टॉप गेएर गाठला मुळात आपण जर जपानचा विचार केला तर
आपल्याला असे लक्षात येईल कि तेथे व पश्चिमयात देशां मध्ये सायकल
वापरणायचे प्रमाण जास्त आहे तया मानाने आपण भारतीय सायकल वापरणे हे गरिबीचे लक्षण मानतो पण जपान व
बाकी देश हे आपल्या पेक्षा तंत्रज्ञान बाबतीत अधिक सरस असून देखील ते आपल्या शरीराला जास्त महत्व देतात सायकल
मुले शरीराचा चांगला व्यायाम होतो डॉकटर देखील सायकल चालविण्याचा सल्ला देतात
तो व्यवसाय होता सायकल विक्रीचा कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या लक्षात आले
कार्बन उत्सर्जन मानवी शरीरासाठी किती घातक आहे
व तसेच मानवी आरोग्यासाठी सायकलिंग सारखा दुसरा व्यायाम नाही हे लोकांच्या लक्षात आले
व सायकलची विक्री जोमाने वाढली करोणानंतर सुद्धा सायकलच्या विक्रीमध्ये मोठी वाढ बघण्यास मिळाली
लहाना पासून ते मोठ्यांपर्यंत सायकल घेण्यासाठी पुढे येऊ लागले
नांदेड येथील वामनराव पावडे मंगल कार्यालया जवळील श्री बालाजी लक्ष्मीएंटरप्राइजेस (सायकलचे दुकान)
प्रोप्रायटर विशाल चक्करवार यांनी संकल्प टुडे शी बोलताना सांगितले की
करोना नंतर यामुळे तर विक्री वाढलीच पण हल्ली लोकांमध्ये आरोग्य विषयी जागरूकता आली आहे
व वाढते वजन ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे तसेच हृदयरोग मधुमेह यासारखे
भयंकर रोग पण सायकलिंग केल्यामुळे कमी होतात असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे
सायकल विक्रीमध्ये मोठी वाढ पहावयास मिळत आहे
शासन स्तरावर देखील मुलींना मुलांना शाळेत येण्यासाठी काही योजनेमध्ये सायकल वाटप केली जाते यामुळे सुद्धा विक्री वाढत आहे
तरी जास्तीत जास्त लोकांनी शहरात फिरण्यासाठी सायकलचा वापर करावा व आपल्या येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आपण द्यावी
असे आव्हान विशाल चक्करवार यांनी केले
आयुर्वेद योगासने सायकलिंग पोहणे धावणे असे जुन्या काळातील व्यायामाचे प्रकार परत एकदा चलणात येत आहेत
ही चांगली गोष्ट आहे
सायकलिंग केल्यामुळे बीपी शुगर हृदयरोग भयंकर रोग कमी होतात
तसेच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना तर सायकल वरदानच ठरते







