Advertisement
खेळ

Ind Vs Pak CT 2025 : टीम इंडियाचा पाकिस्तानवर धमाकेदार विजय! थेट गाठली सेमीफायनल विराट कोहलीने ठोकले शतक

Advertisment
  1. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारताने आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहा विकेट ने हरवले या सामन्यांमध्ये सामनावीर ठरला तो विराट कोहली विराट कोहलीने नाबाद शतक देखील केले

दुबई मधील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला गेला या सामन्यांमध्ये भारताने ऐतिहासीक विजय मिळवत सेमी फायनल मध्ये आपली दावेदारी आणखीन मजबूत केली आहे

  • Virat Kohli
    विराट कोहली

    विराट कोहली ची विराट खेळी
    भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याने 111 चेंडू मध्ये नाबाद 100 धावा काढल्या ज्यामध्ये सात चौकार देखील होते भारताला 242 रन चे टारगेट मिळाले होते हे टार्गेट भारताने 42.3 ओव्हर मध्येच पूर्ण केले रोहित शर्मा अवघ्या वीस धावावर बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि नाबाद 100 धावा देखील काढल्या विराट कोहली आज जेव्हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा 14000 रन चा टप्पा गाठण्या साठी त्याला अवघ्या काही धावांची गरज होती

त्या दावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला
जागतिक क्रमवारी मध्ये विराट कोहली सर्वाधिक गतिमान 14 हजार रणांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू झाला आहे
आतापर्यंत एक दिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने 51 शतक ठोकले आहेत
तब्बल 15 महिन्यानंतर विराट कोहलीने शतक लगावले आहे
विराट कोहलीने आज केलेले शतक हे अत्यंत महत्त्वाचे आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन काढणाऱ्या मध्ये विराट कोहली आता तीन नंबर वर आला आहे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग यालाही मागे टाकले आहे

Advertisement

ही वाचा —IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन काढणारे फलंदाज (Most run-scoring batsmen in international cricket)
1) सचिन तेंडुलकर 34357
2) कुमार संगकारा 28016
3) विराट कोहली 27503
4) रिकी पॉंटिंग 27483

तसेच विराट कोहलीने आज जे शतक पूर्ण केले ते विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 82 शतक आहे सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांचे रेकॉर्ड तोडण्यासाठी आता विराट कोहलीला फक्त 18 शतक बाकी आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक लगावणारे फलंदाज(Batsmen with the most centuries in international cricket)
1) सचिन तेंडुलकर 100
2)विराट कोहली 82
3) रिकी पॉंटिंग 71
4) कुमार संगकारा 63
5) जॅक केलीस 62
6) हाशिम आमला 55
7) महेला जयवर्धने 54

पाकिस्तानची सुरुवात ?
नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानचे कर्णधार मोहम्मद रिजवान यांनी घेतला पण त्यांचा हा निर्णय योग्य ठरला नाही पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम केवळ 23 धावांवर बाद झाला यानंतर इमाम उल हकने केवळ दहा रन काढले त्यानंतर सौद शकील आणि मोहम्मद रिजवान यांनी शतकीय भागीदारी केली यामध्ये शकीलने 62 धावा तर मोहम्मद रफी 46 धावा काढल्या सलमान आगा 19 धावा तय्यब ताहीर चार धावा खुशदील शाहा 38 धावा शाहीन आफ्रिदी शून्य धावांवर बाद झाला नसिम शाहा 14 धावा व हारीस राऊफ आठ धावांवर बाद झाला पाकिस्तानने 49.4 ओव्हर मध्ये 241 धावा काढल्या व भारताला 242 धावांचे आव्हान मिळाले

पाकिस्तानचे खेळाडू– बाबर आजम,साऊद शकील,मोहम्मद रिजवान (कप्तान),इमाम उल हक,सलमान अली आगा, तय्यब ताहीर,खुशदिल शाहा,अबरार अहमद,हारीस राऊफ,नसीम शाहा,शाहीन आफरीदि

Rohit Sharma
रोहित शर्मा

भारतीय संघाची कामगिरी ?
भारताच्या डावाची सुरुवात ही चांगली झाली रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांने चांगली सुरुवात केली पण रोहित शर्मा केवळ वीस धावांवर बाद झाले यानंतर शुभमन गिल 46 धावांवर बाद झाला यानंतर विराट कोहली व श्रेयस अय्यर या दोघांनी शतकीय भागीदारी केली श्रेयस अय्यर 56 भावांवर बाद झाला यानंतर हार्दिक पांड्या अवघ्या आठ धावांवर बाद झाला विराट कोहली नाबाद 100 धावा तर अक्षर पटेल यांनी नाबाद तीन धावा काढल्या भारताने 42.3 ओव्हर मध्ये 242 धावांचे टारगेट पूर्ण केले

भारताच्या टीम मधील खेळाडू–रोहित शर्मा (कप्तान),शुभमन गिल (उपकप्तान),विराट कोहली,श्रेयस अय्यर,के.एल.राहुल (विकेटकीपर),हर्दिक पांड्या,अक्षर पटेल,रवींद्र जडेजा,कुलदीप यादव,हर्षित राणा,मोहम्मद शमी

एक दिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान
एकूण सामने 135
भारत विजयी 57
पाकिस्तान विजयी 73
टाई 0
अनिर्णायक 5
चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत पाकिस्तान
एकूण सामने 5
भारत विजयी 2
पाकिस्तान विजयी 3
टाई 0
अनिर्णायक 0

आता पाकिस्तानच्या नजरा न्यूझीलंड बांगलादेश सामन्यावर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतात सोबत सामना हरल्यानंतर पाकिस्तानला सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी दोन मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणारा न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश या सामन्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे जर न्यूझीलंडची टीम बांगलादेश कडून पराभूत झाली तर पाकिस्तान चे सेमी फायनल ला जायचे स्वप्न पूर्णपणे धुळीस मिळेल जर न्यूझीलंड हा सामना जिंकला तर न्यूझीलंडचे चार अंक होतील आणि यानंतर पाकिस्तानने आपला शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे फक्त दोन गुण होतील आणि पाकिस्तान पहिल्या साखळी सामन्यांमध्ये स्पर्धेच्या बाहेर होईल विशेष म्हणजे यंदाचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान मध्ये खेळवली जात आहे

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चे पॉइंट टेबल(ICC Champions Trophy Points Table)
ग्रुप ए मध्ये
भारत–सामने 2 विजयी 2 पराभूत 0 नेट रणरेट 0.647 पॉईंट 4
न्यूझीलंड –सामने 1 विजय 1 पराभूत 0 नेट रन रेट 1.200 पॉईंट 2
बांगलादेश–सामने 1 विजयी 0 पराभूत 1 नेट रन रेट -0.408 पॉईंट 0
पाकिस्तान–सामने 2 विजयी 0 पराभूत 2 नेट रन रेट -1.087

ग्रुप बी मध्ये
साऊथ आफ्रिका– सामने 1 विजयी 1 पराभूत 0 नेट रन रेट 2.140 पॉईंट 2
ऑस्ट्रेलिया — सामने 1 विजयी 1 पराभूत 0 नेट रन रेट 0.475 पॉईंट 2
इंग्लंड– सामने 1 विजयी 0 पराभूत 1 नेट रन रेट -0.475 पॉईंट 0
अफगाणिस्तान– सामने 1 विजयी 0 पराभूत 1 नेट रन रेट -2.140 पॉईंट 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button