Advertisement
लाइफ स्टाइल

डेंग्यूवर मोठी बातमी! ‘क्यूडेंगा’ लस लवकरच भारतात येणार?

CDSCO मंजुरीनंतर लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता

Advertisment

Dengue vaccine India

 

भारतासाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. डेंग्यू या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच प्रभावी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ‘Qdenga’ नावाची ही लस भारतात येण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

Advertisement
Dengue vaccine India
ए आय इमेज

 

Advertisement

ही लस जपानमधील प्रसिद्ध औषध कंपनी Takeda Pharmaceutical Company यांनी विकसित केली असून भारतात तिचे उत्पादन आणि वितरण Biological E या कंपनीच्या भागीदारीतून होऊ शकते.

https://www.who.int/news-room/questions-and-answers/item/dengue-vaccines

 

विशेष म्हणजे, या लसीला युरोप, ब्रिटन, ब्राझील आणि इंडोनेशिया यांसारख्या ४० हून अधिक देशांनी आधीच मान्यता दिली आहे. तसेच World Health Organization कडूनही पूर्व-पात्रता मिळाल्यामुळे तिची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे.

 

हेही वाचा-शरीर देत आहे छुपे संकेत! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

हेही वाचा-रात्री झोप कमी घेतल्याचे गंभीर परिणाम

 

डेंग्यूमुळे दरवर्षी मृत्यू होतात

भारतात दरवर्षी हजारो लोकांना Dengue Fever होतो आणि काही वेळा यामुळे मृत्यूदेखील होतात. आतापर्यंत या आजारावर ठोस लस उपलब्ध नव्हती. मात्र ‘क्यूडेंगा’मुळे डेंग्यू होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करणे शक्य होईल.

 

 

या लसीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या व्यक्तींना आधी डेंग्यू झाला आहे त्यांनाही ही लस प्रभावी ठरू शकते. ही लस दोन डोसांमध्ये दिली जाणार असून त्या दरम्यान काही कालावधी ठेवला जाईल.

 

CDSO च्या मंजुरीची प्रतीक्षा आहे

तथापि, भारतात ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी Central Drugs Standard Control Organization ची मंजुरी आवश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू असून मंजुरीनंतरच लसीकरण मोहीम सुरू होईल.

 

जर ही लस लवकरच उपलब्ध झाली, तर देशातील डेंग्यू रुग्णसंख्या आणि मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, लस आली तरीही डासांपासून बचाव आणि स्वच्छता राखणे तितकेच आवश्यक राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button