उष्माघातापासून वाचण्यासाठी खिशात कांदा ठेवा? सिंधिया यांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

summer health tips Marathi
सध्या उन्हाचा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 47 अंशांवर पोहोचलेला आहे. सर्वत्र प्रचंड ऊन आहे आणि यामुळेच उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पण केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी मात्र दावा केल्यामुळे सर्वत्र चांगली चर्चा रंगत आहे. नेमका त्यांनी कुठला दावा केला आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊया.

उष्माघातापासून वाचण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांचा अवलंब केला पाहिजे, असे वेळोवेळी प्रशासन देखील आपल्याला सांगत असते. जसे की दुपारच्या वेळेला घराबाहेर जाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुपारी घराबाहेर पडायचे असल्यास कानाला कापड बांधा. अशा पद्धतीचे अनेक उपाय सुचविले जातात.
श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया नेमकं काय म्हणाले?
एका कार्यक्रमामध्ये बोलताना श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी आपल्या खिशात नेहमी एक कांदा ठेवा. कांदा आपल्याजवळ असल्यास 51 डिग्री तापमानापर्यंत देखील
आपल्याला काहीही होत नाही, असे म्हणत सिंधिया यांनी आपल्या खिशातून एक कांदा देखील काढून दाखविला. त्यामुळेच खरोखरच सिंधिया म्हणाल्याप्रमाणे कांदा उष्माघातापासून वाचवतो का, ही चर्चा सुरू झाली.
हे ही वाचा-उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
हेही वाचा-केमिकलने पिकवलेले आंबे धोकादायक? आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम जाणून घ्या
खरंच कांदा उष्माघातापासून वाचवतो का?
श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी तर हा दावा केलेला आहे. तरीपण आपण देखील लहानपणापासून आपल्या घरच्यांकडून हीच गोष्ट ऐकलेली आहे की कांदा उष्माघातापासून बचाव करतो. अगदी आजीबाईंच्या बटव्यात देखील याचा उल्लेख आढळतो.
पण आपण जर वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले, तर कांदा उष्माघातापासून संरक्षण करतो याविषयी कुठलाही ठोस पुरावा नाही. आम्ही यासंदर्भात आयुर्वेदिक तज्ञांशी देखील सल्ला केला. ते नेमकं काय म्हणाले, ते पाहूया.
आयुर्वेदिक तज्ञांचे म्हणणे काय आहे?
उन्हाळ्यात कांदा खाणे ही केवळ परंपरा नाही, तर त्यामागे मजबूत वैज्ञानिक कारणे आहेत. गरमीच्या दिवसांत शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उष्माघात (लू) टाळण्यासाठी कांदा अत्यंत उपयुक्त ठरतो.
कांदा उन्हाळ्यात का खावा?
शरीर थंड ठेवतो
कांद्यामध्ये नैसर्गिक कूलिंग प्रॉपर्टीज असतात. तो शरीराचे तापमान कमी ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.
उष्माघातापासून संरक्षण
कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. ग्रामीण भागात अजूनही लोक उन्हात बाहेर पडताना खिशात कांदा ठेवतात – हे उष्णतेपासून बचावासाठी पारंपरिक उपाय आहे.
पाणी टिकवून ठेवतो (Hydration)
कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर डिहायड्रेशनपासून वाचते.
पचन सुधारतो
उन्हाळ्यात पचनशक्ती कमी होते. कांद्यामुळे पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.
रक्तदाब नियंत्रित ठेवतो
कांद्यातील पोटॅशियम आणि सल्फर कंपाउंड्स रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.
त्वचेसाठी फायदेशीर
कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
कसा खावा?
कच्चा कांदा (सॅलडमध्ये)
लिंबू आणि मीठ घालून
ताक किंवा भाजीसोबत
कोणाला काळजी घ्यावी?
ज्यांना अॅसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी कमी प्रमाणात खावा.
जास्त प्रमाणात खाल्ल्यास दुर्गंधी व गॅस होऊ शकतो.
उन्हाळ्यामध्ये कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण कांदा हा उष्माघातापासून आपले संरक्षण करतो याविषयीचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही.
पण आपण जुन्या परंपरेप्रमाणे एखादा कांदा खिशात ठेवायला हरकत नाही आणि कांदा देखील उन्हाळ्यामध्ये भरपूर खायला पाहिजे. उष्माघातापासून वाचण्यासाठी बाकी सुचविलेल्या गोष्टी करायला मात्र विसरू नका.
नोट: सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली आहे. वैद्यकीय उपचारासाठी नाही. वैद्यकीय बाबतीत कुठलीही गोष्ट करताना आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.







