महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? आजच्या महायुती बैठकीत ठरणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची दिशा!
मुंबईत आज महायुतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत होणार चर्चा?
Maharashtra Politics

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आजची रात्र खूप महत्त्वाची रात्र आहे
कारण की आज मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे, ज्या बैठकीमध्ये भविष्यातील
महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
नेमकं या बैठकीमध्ये काय घडणार आहे की बैठक कोठे होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महायुतीच्या
समन्वय समितीची पहिली बैठक आज होणार आहे. या बैठकीमध्ये
हेही वाचा-Gen Z ची नाराजी दूर करण्यासाठी विशेष टीम मैदानात
दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक
मागील अडीच ते तीन वर्षांपासून महायुती राज्यात सत्तेत आहे, पण आत्तापर्यंत महायुती समन्वय समितीची एकही बैठक झाली
नव्हती. पण आज या समन्वय समितीची पहिली बैठक पार पडणार आहे.
यामध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा-पाकिटावरील FSSAI नंबरचा खरा अर्थ काय? १४ अंकांमध्ये दडलेली आहे महत्त्वाची माहिती, असा करा नंबर चेक
यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची
देखील चर्चा यामध्ये होणार आहे. चर्चा आहे या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण?
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांच्या
विलीनीकरणाची चर्चा सध्या जोर धरत आहे आणि याला कारण देखील आहे.
मागील काही दिवसांमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट
तसेच सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहामध्ये नरेंद्र मोदी यांनी लावलेली उपस्थिती
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भारतीय जनता पार्टी यामध्ये काही बैठका देखील झाल्याची चर्चा आहे.
आणि यावरूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस परत एकत्र येणार, विलीनीकरण होणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवार व जयंत पाटील यांची भेट
शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची काल एक बैठक झाली आहे.
या बैठकीमध्ये देखील विलीनीकरणा बाबतीतच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावरून आज होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतीत चर्चा होईल
तसेच या विलीनीकरणाची पुढील दिशा देखील ठरवण्यात येईल, अशी माहिती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आहे.
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर आज होणाऱ्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी
काँग्रेस एकत्र येण्याबाबतीत सकारात्मक चर्चा होतील व त्यानंतर लवकरच हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार,
याविषयी सध्या चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रामध्ये देखील महिला विधेयक पास करून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला
व एनडीएला शरद पवार यांच्या पक्षाच्या आठ खासदारांची गरज आहे. त्यामुळेच या विलीनीकरणाबाबतीत चर्चा सुरू झाल्या आहेत.
तसेच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व भारतीय
जनता पार्टी यांच्या नेत्यांमध्येही बैठका होत असल्याची माहिती वेळोवेळी प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे.
त्यावरून आजची बैठक ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप आणणार की काय, हे आता पाहावे लागेल.







