Advertisement
BREAKING NEWS

LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! सरकार आणणार 10 किलोचा हलका गॅस सिलेंडर; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

केंद्र सरकार आणि तेल कंपन्या 10 किलोच्या हलक्या कंपोझिट एलपीजी सिलेंडरची तयारी करत आहेत. विद्यार्थी, भाडेकरू, छोटे व्यावसायिक आणि स्थलांतरित कामगारांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे

Story Highlights
  • एलपीजी नवीन नियम
  • गॅस सिलेंडर
  • LPG Cylinder New Rules
  • Composite LPG Cylinder
Advertisment

10 Kg LPG Composite Cylinder

एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. केंद्र सरकार आता

Advertisement

तुमचा गॅस सिलेंडर खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

याचा परिणाम नेमका ग्राहकांवर काय होईल आणि हा बदल कोणत्या प्रकारचा आहे,

याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तसेच या लेखाच्या शेवटी तुमच्या या

विषयासंदर्भातील प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला मिळून जातील.

10 Kg LPG Composite Cylinder
10 Kg LPG Composite Cylinder     a.i. image

आपण बऱ्याच वेळा पाहतो की, समजा एखादा विद्यार्थी शिक्षणासाठी शहरामध्ये जाण्याचा निर्णय घेतो किंवा आपण

आपले शहर बदलून दुसऱ्या शहरात नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी जातो. तसेच रोजंदारीचे काम करणारे कामगार

असतील, या सर्वांना शहर बदलल्यानंतर मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गॅस सिलेंडरचा.

यावर आता सरकार तसेच गॅस कंपन्या उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत. इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम

 

https://iocl.com/xtralite-cylinder

(BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही ग्राहकांसाठी १०

किलो वजनाचे हलके कंपोझिट एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत.

यामुळे गॅस मिळणे सोपे होईल. यासाठी सरकार काही सकारात्मक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा-नवीन मतदार नोंदणीचे नियम बदलले! ऑनलाइन फॉर्म-6 भरताना आता पालकांची ही माहिती देणे बंधनकारक

जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर ज्या लाखो लोकांना १९ किलो वजनाचा जड

व्यावसायिक सिलेंडर उचलण्यात आणि वाहून नेण्यात अडचण येते, त्यांना मोठा दिलासा मिळेल.

 

नवीन सिलेंडर १० किलोचे असणार?

 

सध्या घरगुती वापराचे सिलेंडर १४.२ किलोचे, तर व्यावसायिक वापराचे एलपीजी सिलेंडर १९ किलोचे आहे.

त्याचप्रमाणे काही सिलेंडर ५ किलो आणि २ किलो वजनाचे देखील आहेत.

हे ही वाचा-धोंडी माय परंपरा: दुष्काळात पावसासाठी का केली जाते? इतिहास, महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

पण हे सिलेंडर उचलून नेणे फार अवघड असते. या सिलेंडरचा आकार व वजन कमी

करण्याची मागणी ग्राहकांकडून मागील अनेक वर्षांपासून होत आहे. यामुळे सरकार १० किलोचे

सिलेंडर आणण्याचा विचार करत आहे. याचा प्रामुख्याने फायदा ग्राहकांना होईलच,

त्याचबरोबर लहान हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या, रस्त्यावर विक्री करणारे,

विद्यार्थी आणि कामगार या सर्वांनाच या सिलेंडरचा निश्चित फायदा होईल.

तसेच हे सिलेंडर हलके असल्यामुळे त्याची वाहतूक करणे देखील सोपे जाईल.

भाड्याने राहणारे रहिवासी बऱ्याच काळापासून हलक्या आणि अधिक सोयीस्कर सिलेंडरची मागणी करत आहेत.

 

एचडीपीई तंत्रज्ञानाने बनवलेले

 

हा नवीन सिलेंडर उच्च-घनता पॉलीथिलीन (HDPE) वर आधारित प्रगत संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला आहे.

याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो पारंपरिक स्टीलच्या सिलेंडरपेक्षा सुमारे ५०% हलका आहे.

या हलक्या वजनाच्या सिलेंडरमुळे तो पायऱ्यांवरून वर नेणे, लहान दुकानांमध्ये ठेवणे

आणि दैनंदिन वापरासाठी सोपा होतो. शिवाय, त्याच्या अर्धपारदर्शक बाह्य

आवरणामुळे अतिरिक्त गेजशिवाय शिल्लक गॅस सहज पाहता येतो.

यामुळे ग्राहकांना वेळेवर रिफिल करणे देखील सोपे होईल.

 

हे सिलेंडर कोणाला मिळणार?

 

सध्या हे सिलेंडर फक्त घरगुती ग्राहकांना देण्याच्या विचारात सरकार आहे. १० किलो वजनाचे कंपोझिट सिलेंडर एचपीसीएल

‘एचपी गॅस ओजस’, इंडियनऑइल ‘इंडेन एक्स्ट्रालाइट’ आणि बीपीसीएल ‘भारतगॅस लाइट’ या नावाने विकते. तेल कंपन्या

आता हे तंत्रज्ञान व्यावसायिक ग्राहकांपर्यंतही विस्तारण्याची योजना आखत आहेत. अहवालानुसार, हे सिलेंडर गॅस एजन्सी

आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर व्यावसायिक एलपीजीच्या समान दरात विकले जाऊ शकतात.

 

१० किलो सिलेंडरची किंमत किती?

किमतींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये सध्या १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ₹९४२

आहे, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२,९३० आहे. ५ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹८०८.५०

आहे. १० किलोच्या व्यावसायिक कंपोझिट सिलेंडरची किंमत अद्याप निश्चित झालेली नसली,

तरी ती ५ किलो आणि १९ किलोच्या सिलेंडरच्या किमतीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

 

या योजनेचा फायदा कोणाला होईल?

अजून तरी ही योजना प्रस्तावित आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली,

तर याचा निश्चित फायदा मोठ्या व्यावसायिकांना, भाडेकरूंना, नोकरदार

वर्गाला, विद्यार्थ्यांना आणि स्थलांतरित मजुरांना होईल.

 

एलपीजी वितरण प्रणाली अधिक सोयीस्कर, आधुनिक आणि वापरकर्त्यासाठी

सुलभ बनवण्यात हे पाऊल मोठे परिवर्तन घडवून आणू शकते. सरकार आणि

तेल कंपन्यांनी याला मंजुरी दिल्यास, भविष्यात लाखो लहान व्यवसायांना आणि सामान्य ग्राहकांना याचा थेट फायदा होऊ शकतो.

 

अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा व्यवस्थित होईल की नाही,

याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण अशातच ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

कारण हे सिलेंडर उपलब्ध झाले, तर जड सिलेंडर वाहून नेण्याच्या त्रासापासून ग्राहकांची निश्चितच मुक्ती होईल.

 

सतत विचारले जाणारे प्रश्न

FAQ 1: सरकार 10 किलोचा नवीन एलपीजी सिलेंडर का आणत आहे?

 

उत्तर: 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर उचलणे अनेक ग्राहकांसाठी अवघड जाते.

ही अडचण दूर करण्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या 10 किलोचा हलका कंपोझिट एलपीजी सिलेंडर आणण्याच्या

तयारीत आहेत. यामुळे वाहतूक आणि वापर अधिक सोपा होईल.

 

FAQ 2: 10 किलोच्या कंपोझिट एलपीजी सिलेंडरचा फायदा कोणाला होणार?

 

उत्तर: या सिलेंडरचा सर्वाधिक फायदा छोटे व्यावसायिक, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेते, विद्यार्थी, भाडेकरू,

स्थलांतरित कामगार तसेच हलका सिलेंडर वापरण्याची गरज असलेल्या ग्राहकांना होण्याची शक्यता आहे.

 

FAQ 3: 10 किलोच्या नवीन एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल?

 

उत्तर: 10 किलोच्या कंपोझिट एलपीजी सिलेंडरची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, ती 5 किलो आणि 19

 

किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

FAQ 4: हा नवीन एलपीजी सिलेंडर कधीपासून उपलब्ध होईल?

 

उत्तर: सध्या हा प्रस्ताव विचाराधीन असून सरकार आणि तेल कंपन्यांची अंतिम

मंजुरी मिळाल्यानंतरच हा 10 किलोचा कंपोझिट एलपीजी सिलेंडर बाजारात उपलब्ध होईल.

 

FAQ 5: कंपोझिट एलपीजी सिलेंडरची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत?

उत्तर: हा सिलेंडर HDPE आधारित कंपोझिट तंत्रज्ञानाने बनवण्यात आला आहे.

तो पारंपरिक स्टीलच्या सिलेंडरपेक्षा सुमारे 50% हलका आहे. तसेच त्याचे

अर्धपारदर्शक आवरण असल्यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे सहज पाहता येते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button