Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

पतंजलीची विमा क्षेत्रात एंट्री! बाबा रामदेव यांच्या कंपनीने ४,५०० कोटींच्या करारातून मॅग्मा जनरल इन्शुरन्सचे अधिग्रहण केले

IRDAI कडून अधिग्रहणाला मंजुरी; पतंजलीचा वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात पहिलाच प्रवेश, ग्रामीण बाजारपेठेवर राहणार विशेष लक्ष

Advertisment

पतंजली विमा क्षेत्रात

योगगुरू व आयुर्वेदिक उत्पादने तयार करणारी कंपनी उभी करणारे

Advertisement

बाबा रामदेव यांची कंपनी लवकरच विमा क्षेत्रातदेखील उतरणार आहे.

Advertisement

IRDAI ने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि रजनीगंधा पान मसाला बनवणाऱ्या धर्मपाल सत्यपाल (DS)

ग्रुपला मॅग्मा जनरल इन्शुरन्सचे ४,५०० कोटी रुपयांना अधिग्रहण करण्यास मंजुरी दिली आहे.

या करारामुळे पतंजलीने वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात प्रथमच प्रवेश केला आहे.

या करारानुसार, पतंजली ७३.६% हिस्सा, तर DS ग्रुप २४.५% हिस्सा मिळवेल.

पतंजली आता विमा क्षेत्रात

योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीने विमा क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

विमा नियामक IRDAI ने पतंजली आयुर्वेद आणि DS ग्रुप (रजनीगंधाचे निर्माते) यांच्याद्वारे

मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. सुमारे ४,५०० कोटी

पतंजलीची अधिकृत वेबसाईट लिंक खाली आहे

https://www.patanjaliayurved.net/

रुपयांच्या या करारामुळे बाबा रामदेव यांच्या कंपनीने पहिल्यांदाच

वित्तीय सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. चला, याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.

या करारानुसार, पतंजली आयुर्वेद ७३.६% हिस्सा, तर DS ग्रुप २४.५% हिस्सा मिळवेल.

यापूर्वी सनोटी प्रॉपर्टीज (आदर पूनावाला ग्रुप) ही कंपनीची सर्वात मोठी भागधारक होती.

IRDAI च्या मंजुरीनंतर पतंजली मॅग्मा जनरल इन्शुरन्सची प्रवर्तक

कंपनी बनेल आणि कंपनीचा विस्तार व भांडवल उभारणीसाठीही काम करेल.

 

सर्वसाधारण विमा उद्योगाची सरासरी वाढ ११%

मॅग्मा जनरल इन्शुरन्सने गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ केली आहे.

सर्वसाधारण विमा उद्योगाच्या सुमारे १०% सरासरी वाढीच्या तुलनेत

हेही वाचा-जगातील सर्वात महागडे इंजेक्शन! Hemgenix ची किंमत तब्बल 30 कोटी रुपये; कोणत्या आजारावर होते उपयोग?

कंपनीचा एकूण थेट प्रीमियम आर्थिक वर्ष २०२१ ते २०२८ दरम्यान २३% च्या चक्रवाढ

वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढून ₹३,३३४ कोटींवर पोहोचला. शिवाय, आर्थिक वर्ष २०२८ मध्ये

कंपनी तोट्यातून बाहेर पडून ₹१ कोटींचा नफा कमावला. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या

हेही वाचा-रात्री 10 नंतर रेल्वेत लागू होतात हे 5 महत्त्वाचे नियम! जाणून घ्या तुमचे हक्क

नऊ महिन्यांत कंपनीने ₹२७ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. कंपनीचे सॉल्व्हन्सी मार्जिन १.८१ पट आहे, जे १.५० पटीच्या

नियामक किमान मर्यादेपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत मानली जाते.

मॅग्मा जनरल इन्शुरन्सचे प्रॉडक्ट कोणते आहेत?

मॅग्मा जनरल इन्शुरन्सचे सध्या जवळपास ७० प्रॉडक्ट आहेत. जनरल इन्शुरन्समध्ये यांची विक्री केली जाते.

यामध्ये मुख्यतः हेल्थ, प्रॉपर्टी आणि मोटार इन्शुरन्सचा समावेश आहे.

आता पतंजली कंपनीने या कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे पतंजलीचे नेटवर्क शहरी भागात तसेच ग्रामीण भागात मोठ्या

प्रमाणात आहे. याचाच फायदा मॅग्मा जनरल इन्शुरन्सला ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय

वाढविण्यासाठी होणार आहे. पतंजलीची बाजारात असलेली ओळख याचाही फायदा

निश्चितच मॅग्मा जनरल इन्शुरन्सला होणार आहे. सध्या पतंजली कंपनीकडे २५० पेक्षा अधिक

मेगा स्टोअर्स आहेत, तर देशभरामध्ये २ लाखांपेक्षा जास्त विक्री केंद्रे आहेत.

त्यामुळे हा व्यवसाय वाढविण्यासाठी चांगलीच मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे.

पहिले फक्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट व FMCG प्रॉडक्ट विकणारी पतंजली कंपनी आता

विमा क्षेत्रात उतरल्यावर त्याचाही फायदा कंपनीला होणार आहे. बाबा रामदेव यांचे असलेले चांगले नाव,

पतंजली प्रॉडक्टवर असलेला लोकांचा विश्वास यानंतर विमा क्षेत्रामध्ये कंपनी खरोखरच यशस्वी होईल का, हे पाहावे लागेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button