Advertisement
लाइफ स्टाइल

देशभरात औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह — ११२ औषध नमुने फेल

सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या औषध नमुन्यांपैकी ११२ नमुने गुणवत्ता तपासणीत नापास.

Advertisment

औषध गुणवत्ता तपासणी

देशभरात औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह — सप्टेंबर महिन्यात ११२ औषध नमुने गुणवत्तेत नापास

नवी दिल्ली :
देशातील रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
औषध गुणवत्ता तपासणी
औषधे

आरोग्य मंत्रालयाच्या तपासणीत उघड झाले आहे की, सप्टेंबर २०२५ मध्ये देशभरातून औषध गुणवत्ता  तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांपैकी तब्बल ११२ नमुने मानक गुणवत्तेत अपयशी (NSQ) ठरले आहेत.

Advertisement

सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या औषध नमुन्यांपैकी ११२ नमुने गुणवत्ता तपासणीत नापास.

 

औषधांचे हे नमुने विविध राज्ये आणि औषध उत्पादक कंपन्यांकडून घेतले गेले होते. या तपासणीतून असे स्पष्ट झाले आहे की, काही औषधे जी रुग्णांना आजारातून मुक्त करण्यासाठी वापरली जातात,

 

तीच औषधे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.? औषधाच्या गुणवत्तेत दोष आढळल्यास ते रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात, अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

https://cdsco.gov.in/opencms/opencms/en/About-us/Laboratories/

NSQ म्हणजे औषध गुणवत्ता मापदंडात अयशस्वी ठरलेले नमुने.

या ११२ अपयशी ठरलेल्या औषधांपैकी ५२ नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळांमध्ये (Central Drug Laboratories) तपासले गेले, तर ६० नमुने राज्य औषध प्रयोगशाळांनी (State Drug Laboratories) तपासले. दोन्ही स्तरांवरील तपासणीत या औषधांची गुणवत्ता निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे आढळले.

 

 

औषध तपासणीतील ‘NSQ’ म्हणजे “Not of Standard Quality” — म्हणजेच अशा औषधांनी गुणवत्ता मापदंडांपैकी एक किंवा अधिक चाचण्यांमध्ये अपयश मिळवले आहे.

हेही वाचा-आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रणाचे उपाय

ही वाचा-२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका – सरकारचा इशारा

याचा अर्थ असा की, या औषधांमधील घटकद्रव्यांचे प्रमाण, शुद्धता, स्थिरता किंवा प्रभाव या पैकी कुठल्याही घटकात दोष आढळला आहे.

छत्तीसगडमध्ये एका औषधाचा नमुना बनावट असल्याचे निष्पन्न.

 

याशिवाय, छत्तीसगड राज्यात एका औषधाचा नमुना बनावट (Fake Drug) असल्याचेही आढळले आहे. बनावट औषधांच्या उत्पादनामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात, म्हणूनच या प्रकरणाला आरोग्य मंत्रालयाने अत्यंत गंभीरतेने घेतले आहे.

 

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित औषध कंपन्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 

औषध निर्मिती प्रक्रियेवर अधिक कडक देखरेख ठेवण्यात येणार असून, बाजारातील औषधांचे नियमित सॅम्पलिंग आणि तपासणी अधिक गतीने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा औषध सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, औषध निर्मितीपासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि

 

कठोर गुणवत्ता परीक्षण आवश्यक आहे, अन्यथा अशा घटनांमुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो.

अशी औषधे कशी टाळायची?

 

प्रिस्क्रिप्शन तपासा: औषध खरेदी करण्यापूर्वी, त्याचा बॅच नंबर आणि उत्पादन तारीख तपासा. तुम्ही CDSCO वेबसाइटवर NSQ औषधांची यादी पाहू शकता.

 

परवानाधारक दुकानातून औषधे खरेदी करा: नेहमी विश्वासार्ह आणि परवानाधारक मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला कोणत्याही औषधाची आवश्यकता असेल तर

 

जर तुम्हाला गुणवत्तेबद्दल काही शंका असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

नोट-वर दिलेली माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली आहे ही माहिती केवळ आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे वैद्यकीय उपचारासाठी नाही आरोग्य विषय कोणतीही गोष्ट करत असताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button