Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

₹60 हजारांच्या स्कूटरवर ₹10 लाखांचा दंड! ट्रॅफिक पोलिसांनाही बसला धक्का

गुरुग्राममध्ये ट्रॅफिक तपासणीदरम्यान उघडकीस आले धक्कादायक प्रकरण; एका स्कूटरवर 96 प्रलंबित चालान, वाहन जप्त

Advertisment

60 हजारांची स्कूटर 10 लाखांचा दंड 

ट्रॅफिकचे नियम मोडल्यास सध्या दंड मोठ्या प्रमाणात आहेत. दंडाची रक्कम एवढी आहे.

Advertisement

की सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अशीच एक घटना घडली आहे,

Advertisement

ज्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एक स्कूटर थांबवली व तिच्यावरील बाकी

असलेल्या दंडाची रक्कम पाहिली, तर त्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला.

कारण त्या स्कूटरची किंमत होती साठ हजार रुपये आणि त्या स्कूटरवर बाकी असलेला दंड होता दहा लाख रुपये. ही

स्कूटर ट्रॅफिक पोलिसांनी जप्त केली आहे. नेमके प्रकरण काय, ते पाहूया.

60 हजारांची स्कूटर 10 लाखांचा दंड 
60 हजारांची स्कूटर 10 लाखांचा दंड

नवी दिल्लीपासून तीस किलोमीटर अंतरावरील गुरुग्राम येथे ट्रॅफिक पोलीस

रोजच्यासारखे गाड्या तपासत होते. त्यांनी एका स्कूटरला हात दाखवून थांबवले.

स्कूटरचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. नंतर त्या स्कूटरवरील दंडाची रक्कम

पाहिली आणि ट्रॅफिक पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या स्कूटरची

किंमत ६० हजार रुपये होती, तर त्या स्कूटरवर एकूण दंड बाकी होता तो दहा लाख रुपयांचा. आतापर्यंत या स्कूटरचालकाला ९७ वेळा दंड लागला आहे.

 

६० हजारांची स्कूटर, दहा लाख रुपये दंड

 

हरियाणातील गुरुग्राम येथे ट्रॅफिक पोलिसांनी एक स्कूटर जप्त केली आहे,

हेही वाचा-महाराष्ट्रात नकली पनीरवर बंदी! FDA ची मोठी कारवाई; आता हॉटेल्स-रेस्टॉरंट्समध्येही वापरास मनाई

ज्या स्कूटरवर एक-दोन नव्हे तर तब्बल दहा लाख रुपये एवढा दंड बाकी आहे.

आणि या स्कूटरची किंमत केवळ ६० हजार रुपये आहे. या वाहनचालकाला आतापर्यंत ९७ वेळा दंड लागला आहे.

वाहनचालकाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले आणि त्याच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली.

हेही वाचा-विमा नसेल तर पेट्रोलही नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशांमुळे वाहनधारकांमध्ये खळबळ

यातील एकाही कागदपत्राची पूर्तता तो व्यक्ती करू शकला नाही. त्यानंतर ट्रॅफिक

पोलिसांनी त्याच्या स्कूटरवरील दंड किती आहे, ते पाहिले आणि तो दंड होता दहा लाख रुपये.

 

एकूण ९६ चालान बाकी होते?

 

त्याच्यावर मोटार वाहन कायदा, १९८८ च्या विविध कलमांखाली ९६ प्रलंबित चालान आहेत.

यापैकी एक चालान ई-चालान मशीनद्वारे, तर उर्वरित चालान कॅमेऱ्यांच्या साहाय्याने जारी करण्यात आले.

सर्व चालानांचा एकूण दंड अंदाजे १० लाख रुपये आहे.

 

कोणत्या नियमांचे उल्लंघन केले गेले होते?

 

या स्कूटरवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालवणे,

वैध इन्शुरन्स पॉलिसी नसणे, प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नसणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, ट्रॅफिकच्या

नियमांचे पालन न करणे अशा विविध कलमांखाली हा दंड लावण्यात आला आहे.

पोलिसांनी ही स्कूटर जप्त केली आहे. तसेच नागरिकांनादेखील वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

 

दहा लाख रुपये दंड होईपर्यंत या स्कूटरवर कारवाई का केली गेली नाही,

असाही सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. दंड आकारण्याची वेळ येते

तेव्हा शंभर-दोनशे रुपये लाच घेऊन पोलीस कर्मचारी वाहनधारकांना का सोडून देतात, अशीही चर्चा सध्या आहे.

त्यामुळेदेखील ही दंडाची रक्कम वाढत गेली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

आता नेमकं ट्रॅफिक पोलीस या वाहनधारकावर कोणती कारवाई करतात, ते पाहावं लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button