Advertisement
राजकीय बातम्या

ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, पुढे काय होणार?

भाजपला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्तांतरावर प्रश्नचिन्ह; राज्यघटना काय सांगते?

Advertisment

Mamata Banerjee

पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाले. भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, पण त्यानंतर एक पेच निर्माण झाला आहे.

 

Advertisement

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही तर पुढे काय होऊ शकते, याविषयी आपण चर्चा करूया.

Advertisement

Mamata Banerjee

मागील पंधरा वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत मात्र पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना नाकारले आणि भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्तेची चावी दिली.

हे ही वाचा-तामिळनाडूत बहुमताचा थरार! विजयच्या TVK ला 108 जागा, सरकार स्थापनेसाठी कोणाचा हात?

हेही वाचा-धावत्या ट्रेनमधून मोबाईल पडला? घाबरू नका, ‘या’ सोप्या स्टेप्सने मिळवा परत

भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत 207 जागा मिळाल्या आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला, तृणमूल काँग्रेसला, फक्त 80 जागा मिळाल्या. भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय संपादन केला आहे. तरीही ममता बॅनर्जी आता राजीनामा देणार नाहीत, अशी त्यांनी घोषणा केली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे.

 

 

ममता बॅनर्जी नेमके काय म्हणाल्या?

काल ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले की निवडणूक आयोग, सीआरपीएफ आणि केंद्र सरकार तसेच मीडियाने देखील जाणूनबुजून मला पराभूत केले आहे. मी पराभूत झालेली नाही

 

आणि त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देणार नाही. या वेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विजय जल्लोष देखील साजरा केला. पश्चिम बंगालमधील 293 जागांपैकी 70% म्हणजेच 207 जागा भारतीय जनता पार्टीला, तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला फक्त 27% म्हणजे 80 जागा मिळाल्या.

 

 

आपण पाहिले तर हे अंतर खूप मोठे आहे — 207 आणि 80. तरीही ममता बॅनर्जी स्वतःचा पराभव स्वीकारायला तयार नाहीत. पश्चिम बंगालमधील सहा कोटी छत्तीस लाख मतदारांपैकी तीन कोटी 77 लाख मतदारांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला नाकारले आहे. ममता बॅनर्जी यांनी मीडियावरही टीका केली.

 

आधीच माझ्याविरुद्ध एक्झिट पोल देऊन वातावरण निर्मिती केल्याचा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला. तरीही ममता बॅनर्जी पराभव मान्य करत नाहीत.

 

भारतीय जनता पार्टीने केले स्पष्ट

ममता बॅनर्जी आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत, अशी घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे खासदार संदीप पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जी यांचा समाचार घेतला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे.

 

कारण जेव्हा एखादा पक्ष निवडणुकीत पराभूत होतो, तेव्हा त्या राज्याचा मुख्यमंत्री राजीनामा देऊन सत्ता हस्तांतरण करतो. पण ममता बॅनर्जी सध्या असे करताना दिसत नाहीत. केंद्रीय यंत्रणांवर ममता बॅनर्जी यांचा विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही — असे म्हणून कसे चालेल, असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

 

घटना काय सांगते? राजीनामा न दिल्यास पुढे काय?

मुख्यमंत्र्याकडे त्या राज्याच्या विधानसभेचे बहुमत असणे आवश्यक आहे. जर निवडणुकीनंतर विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर त्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो, असे अपेक्षित आहे.

 

 

जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर राज्यपालांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 164(1) नुसार मंत्रिमंडळ राज्यपालांच्या इच्छेनुसार पदावर राहते. जर मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले,

 

 

तर राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला पदावरून हटवू शकतात. त्यानंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करून बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते.

 

 

पश्चिम बंगालमध्ये जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही, तर राज्यपाल भारतीय राज्यघटनेतील कलम 164(1) नुसार आपली इच्छा मागे घेऊन मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात.

 

यामुळे ममता बॅनर्जी यांनी जरी राजीनामा दिला नाही, तरीही भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

 

नोट – सदरील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button