Advertisement
BREAKING NEWS

E-20 पेट्रोलमुळे कार खराब झाली? ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय; कार कंपनीला नवी गाडी देण्याचे आदेश

रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; E-20 पेट्रोलमुळे इंजिन खराब झाल्याचा दावा मान्य, कार कंपनीला नुकसानभरपाईसह नवी कार देण्याचे निर्देश.

Advertisment

E-20 पेट्रोल

सध्या सर्वत्र E-20 पेट्रोलची चर्चा आहे. या पेट्रोलचे फायदे काय आहेत,

Advertisement

हे सरकार समजावून सांगत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबाबतही चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

E-20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होणे, गाड्या बिघडणे, मायलेज कमी होणे

अशा पद्धतीच्या तक्रारी जनतेकडून येत आहेत. पण तरीदेखील सरकार मात्र हे सर्व अफवा असल्याचे मानत आहे.

मात्र, ग्राहक न्यायालयाने हे मान्य केले आहे की, E-20 पेट्रोलमुळे एका गाडीचे नुकसान झाले

असून त्या गाडीच्या मालकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेशही

न्यायालयाने दिले आहेत. पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे.

E-20पेट्रोल
E-20 पेट्रोल

E-20 पेट्रोलमुळे सध्या चांगलाच वाद सुरू आहे. एका बाजूला या पेट्रोलचे समर्थन करणाऱ्या कंपन्या आहेत,

तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांच्या मनात अजूनही या पेट्रोलबाबत अनेक शंका आहेत.

अशातच छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयाने

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/business/news/e20-petrol-engine-damage-case-marathi-raipur-consumer-commission-verdict-legal-rights-tracking-rap-91-6022686/lite/

E-20 पेट्रोल वापरल्यामुळे कार खराब झाल्याच्या प्रकरणात कार मालकाच्या बाजूने निकाल दिला.

 

नेमके काय झाले?

 

छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील एका ग्राहकाने त्याच्या कारमध्ये E-20 पेट्रोल टाकले.

पण या इंधनामुळे त्या व्यक्तीच्या कारचे मोठे नुकसान झाले, असा दावा त्या व्यक्तीने केला.

हेही वाचा-‘3 इडियट्स’मधील फुन्सुख वांगडू सोनम वांगचुक नव्हते; आमिर खानचा मोठा खुलासा

वारंवार गाडी दुरुस्त करूनदेखील त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.

उलट त्याचा गाडी दुरुस्तीचा खर्च मात्र वाढत गेला. त्रस्त होऊन त्या इसमाने जिल्हा ग्राहक तक्रार मंचामध्ये तक्रार दाखल केली.

हेही वाचा –‘3 इडियट्स’मधील फुन्सुख वांगडू सोनम वांगचुक नव्हते; आमिर खानचा मोठा खुलासा

E-20 पेट्रोल वापरल्यानंतर त्याच्या कारच्या इंजिनमध्ये समस्या येऊ लागल्या.

इंजिनची कार्यक्षमता खालावली, मिसफायरिंग होऊ लागले आणि मायलेजही कमी झाले.

दुरुस्तीसाठी वारंवार कार सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊनही या समस्या कायम राहिल्या, ज्यामुळे ग्राहकाला मोठा खर्च आला.

 

न्यायालय कार विक्रेत्याच्या दाव्याने समाधानी नव्हते

 

या प्रकरणाचा मुख्य मुद्दा हा होता की, E-20 पेट्रोलमुळे वाहनात बिघाड होत होता का.

कार उत्पादक आणि डीलरने दावा केला की, वाहनाचे मॉडेल E-20 इंधनावर सुरळीतपणे चालू शकते.

डीलरने असाही दावा केला की, वाहनातील समस्या मालकाच्या चुकीमुळे होत्या आणि खराब देखभाल व सामान्य झीज

झाल्यामुळे वाहनात बिघाड झाला होता. तथापि, तक्रारदाराने सांगितले

की, २०२४ मध्ये खरेदी केलेले वाहन आतापर्यंत उत्तम चालत होते, परंतु E-20 पेट्रोल वापरल्यानंतर त्यात समस्या येऊ लागल्या.

 

ग्राहकाला मिळणार नवीन कार

 

कार मालकाने कार कंपनीच्या विरुद्ध हा खटला दाखल केला.

सुनावणीनंतर न्यायालयाने कंपनीला तक्रारदाराला ४५ दिवसांच्या आत

त्याच मॉडेलची कार परत करण्याचे निर्देश दिले. ही कार E-20 इंधनावरच चालली पाहिजे.

जर कंपनी असे करण्यात अयशस्वी ठरली, तर मालकाला कारची

संपूर्ण किंमत, जी ₹२०.५० लाख आहे, परत करावी लागेल.

 

एवढेच नाही, तर न्यायालयाने तक्रारदाराला झालेल्या मानसिक छळाबद्दल १ लाख

रुपयांची नुकसानभरपाई आणि खटल्याच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.

 

इंजिनमध्ये E-20 पेट्रोल गोठलेले आढळले!

 

तक्रारदाराने न्यायालयाला सर्व पुरावे दिले, ज्यामध्ये पेट्रोल गोठलेले आढळल्याचे नमूद करण्यात आले.

तक्रारदाराने ग्राहक न्यायालयात पुरावा सादर केला की, त्याच्या गाडीच्या इंजिनमध्ये E-20 इंधन साचले होते.

एका वर्कशॉपमध्ये दुरुस्ती करण्यात आली, परंतु काही दिवसांनंतर पेट्रोलच्या टाकीत एक पांढरा,

चिकट द्रव आढळून आला. इंजिनचे नुकसान सतत वाढतच गेले.

ग्राहक न्यायालयाने यासाठी कार कंपनीला जबाबदार धरले.

 

केंद्र सरकार कितीही दावे करत असले, तरीदेखील E-20 पेट्रोलबाबत अनेक तक्रारी येत आहेत.

सध्या पावसाळा चालू असल्यामुळे कार्ब्युरेटरमध्ये पाणी येत असल्याच्या तक्रारीदेखील ऐकायला मिळत आहेत.

E-20 पेट्रोलमुळे वाहन खराब होत नाही, हा दावा कितपत खरा आहे, यावर या निकालामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button