Close Menu
Sankalp Today
    Recent News

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, August 7
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी
    2 Comments

    Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी

    Union Budget 2025 | बजेटमध्ये 10 महत्त्वाच्या घोषणा
    Sankalp TodayBy Sankalp TodayFebruary 2, 2025
    Announcement in the Union Budget
    केंद्रीय बजेट मधील घोषणा

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प (BUDGET) जाहीर केला आणि या अर्थसंकल्पामधून नेमकं देशवासियांना काय मिळाले आहे आणि याचा फायदा किती होणार आहे नवी कर प्रणाली काय आहे शेतकऱ्यांना काय मिळाले

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)जेव्हा संसदेमध्ये देशाचे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (BUDGET) सादर करत होत्या तेव्हा देशातील उद्योजकांचे,जनसामान्यांचे,शेतकऱ्यांचे,मजूरदारांचे सर्वांचेच लक्ष हे अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पाच्या भाषणावर होते कारण पुढील एक वर्षासाठी नेमकी देशाची आर्थिक परिस्थिती कशी असेल व त्याचा फायदा किंवा तोटा हा जन माणसाला कसा होईल या सर्व अपेक्षा भारतीयांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांच्याकडे होते यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी अनेकांना आश्चर्याची धक्के देखील दिले नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय विशेष होतं या बाबी आपण पाहूया

    Union Finance Minister Nirmala Sitharaman
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन

    बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त (Income tax free up to twelve lakhs)
    नवीन कर प्रणाली जाहीर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी जनतेच्या अपेक्षेच्या बरच पुढे जाऊन बारा लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त केले व हे उत्पन्न करमुक्त कसे असेल हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले वेगळी भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर देण्याची गरज नाही. नवीन कराच्या पद्धतीनुसार जर एखाद्या करदात्याचे उत्पन्न हे जर 12 लाखापर्यंतचे असेल तर त्याला कर देण्याची गरज नाही पण जर त्याकरदात्याची उत्पन्न हे बारा लाख 80 हजार असेल तर मात्र त्या करदात्याला ठरवल्याप्रमाणे पाच किंवा दहा किंवा पंधरा अशा स्तरानुसार कर लागू होईल आता याला आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया पण समजा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे 12 लाख 80 हजार च्या वर 1000 जरी असेल तर त्याला संपूर्ण उत्पन्नावर आयकर भरावा लागेल

    हे हि वाचा-agriculture news budget 2025 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ?

    नवीन कर प्रणालीमुळे संभ्रम कशामुळे(Why the new tax system is causing confusion)
    बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करणारा असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले असले तरी पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी असे सांगितले की चार ते आठ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आणि आठ ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती दहा टक्के कर या घोषणेमुळेच करदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पण याचा अर्थ असा होतो की बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची असलेल्या करदात्यांना 75 हजार रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन लागू केले जाणार आहे ? त्यामुळे चार लाख ते बारा लाखापर्यंतच्या स्लॅब मधील करदात्यांना पाच ते दहा टक्के हा कर आकारला जाणार आहे तो कर आता स्टॅंडर्ड डिडक्शन मधून निल केला जाणार आहे त्यामुळेच जरी सरकारने पाच दहा व पंधरा टक्के कर जाहीर केला असला तरी कर भरण्याची गरज नाही

    NIRMALA SITARAMAN
    NIRMALA SITARAMN

    नवीन कर प्रणालीमुळे सरकारी तिजोरीवर तब्बल एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे असा अंदाजा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे या गोष्टीला याही पद्धतीने पाहता येईल की तिजोरीवर पडणारा हा बोजा एक लाख कोटी रुपयांचा तो आता करदात्यांच्या खिशात जाणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये अतिरिक्त मागणी तयार होईल त्या रूपात परत सरकारला कर मिळेल ?

     

    गंभीर आजारांचे औषधे स्वस्त होणार(Medicines for serious diseases will be cheaper)
    कॅन्सर किंवा इतर गंभीर स्वरूपांच्या आजारांवर रुग्णांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात कारण की या औषधांवरील या आजारांवर मोठ्या प्रमाणात कस्टम ड्युटी लावली जाते पण या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN) यांनी 36 जीवन आवश्यक औषधांवरील कस्टम ड्युटीला पूर्णपणे सूट दिली आहे तर इतर सहा जीवन आवश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून ती सहा टक्क्यावर आणली आहे याचा फायदा हा सामान्य रुग्णांना होणार आहे

    हे हि वाचा-Union Budget 2025 News केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी आणि त्यांचे काम

    सरकारी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ब्रॉडबँड ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेताना याचा फायदा निश्चित होणार आहे

    या अर्थसंकल्पामध्ये अंदाजे उत्पन्न हे 34.93 लाख कोटी एवढे असेल तर कर अंदाजे उत्पन्न हे 28.87 लाख कोटी तर वित्तीय तूट ही अंदाजे जीडीपी च्या 4.4 टक्के एवढी असेल ?

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी आज घोषित केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प(Budge) विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा केली आहे यामध्ये प्राईम मिनिस्टर फेलोशिप या योजने अंतर्गत आय.आय.टी.व आय.आय.एम.मधील विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजिकल रिचर्स साठी दहा हजार पीएम फेलोशिप दिल्या जाणार आहेत

    तसेच वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक आनंदाची घोषणा केली आहे यामध्ये देशातील मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा अधिक दिल्या जाणार असल्याची घोषणा केलेली आहे यामुळे आता पुढच्या पाच वर्षांमध्ये 75 हजार विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न यामुळे पूर्णत्वाकडे जाईल
    गीग वर्कर्स साठी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे ते ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून त्यांना एक आयकार्ड दिले जाणार आहे यासोबतच गीग वर्कर्स यांना प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा होणार आहे सुमारे देशभरामध्ये एक कोटी पेक्षाही जास्त गीग वर्कर्स आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी सांगितले

    एस.सी.व एस.टी.वर्गातील महिला उद्योजकांसाठी नवीन योजना(New scheme for SC and ST category women entrepreneurs)
    देशातील एस.सी.आणि एस.टी.वर्गातील महिला की ज्या नव्याने आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना भरीव अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये पाच लाख महिला उद्योजकांना दोन कोटी रुपयांचे टर्म लोन दिले जाणार आहे
    तर उद्योग पोर्टलवर नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांना पाच लाखा कर्ज देणारे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे तर लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे तर स्टार्टअप योजनेचे क्रेडिट लिमिट हे आता वीस कोटी रुपये पर्यंत करण्यात आलेले आहे याचा फायदा देशातील उद्योजकांना निश्चित होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी संसदेत सांगितले

    Nirmala Sitaraman
    अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि बजेट तयार करणारी त्यांची टीम

    ज्ञान भारतम मिशन
    ज्ञान भारतम मिशन ही एक नाविन्यपूर्ण योजना सरकार चालू करत आहे ज्या योजनेच्या माध्यमातून भारतातील जुने सरकारी दस्ताऐवज तसेच ऐतिहासिक हस्तलिखिते यांचा शोध घेऊन नंतर त्यांचे जतन केले जाईल व त्याचे डॉक्युमेंटेशन केले जाईल यामुळे आपल्या पुरातन आणि सरकारी दस्तावेजांचे एका नवीन रूपामध्ये पुढच्या पिढीला वाचन करता येईल

    हिल इन इंडिया(Hill in India)
    हिल इन इंडिया या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी केली या योजनेद्वारे भारतातील मेडिकल टुरिझम ला प्रोत्साहन देण्यात येईल म्हणजेच एखाद्या रोगाचा इलाज करण्यासाठी जे रुग्ण भारतात येऊन इच्छिता त्यांच्यासाठी ही योजना असेल यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या रुग्णांना विजा प्रक्रिया ही अधिक सुलभ केली जाणार आहे

    हे हि वाचा-GSB DISEASE UPDATE पुणेकरांनो सावधान,GSB आजराचा धोका वाढला

    तसेच अनेक घोषणा करण्यात आल्यात यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक महत्त्वाची घोषणाही इ व्ही व्हेईकल साठी केलेली आहे यामध्ये लिथियम आयन बॅटरी व सेमी कण्डक्टर आणि अक्षय ऊर्जा योजनेसाठी वरील तीनही उद्योगांना लागणाऱ्या मशिनरीच्या निर्मितीसाठी गरज असलेले कोबाल्ट लिथियम,आयन बॅटरी स्क्रॅप,लेड झिंक व इतर अशा प्रकारच्या बारा खनिजांसाठी आयात करण्यासाठी लागणारी बेसिक कस्टम ड्युटी ही पूर्णपणे कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये ईव्ही वेहिकल्स व संगणक यासारख्या गोष्टी आता स्वस्त होतील

    अशा काही महत्वपूर्ण घोषणा या अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी आज आपल्या अर्थसंकल्पीय (Budget) भाषणाच्या वेळेला केल्या एकंदरीत अर्थतज्ज्ञांच्या मते सदरील अर्थसंकल्प (Budget) हा समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे तरीपण आणखीन काही गोष्टी या चांगल्या करता येऊ शकल्या असत्या असेही म्हणणं काही अर्थतज्ज्ञांचे आहे यामध्ये विशेषता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली गेली नाही याही गोष्टीचा आश्चर्य हे सगळ्यांना वाटलं

    Post Views: 423
    Announcement in the Union Budget Union Budget Union Finance Minister Nirmala Sitaram
    View 2 Comments

    2 Comments

    1. Kumar on February 2, 2025 10:09 am

      Nice👍

      Reply
    2. Pingback: Budget 2025-बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा - Sankalp Today

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024686 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    148641
    Views Today : 692
    Who's Online : 6
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.