आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये संपर्क करण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत पण जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा संपर्क करणे किंवा एखादा संदेश पाठवणे यासाठी पाहिले गोष्टींचा उपयोग केला जायचा त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्र आणि ही पत्र एका गावातून दुसऱ्या गावात पाठविण्यासाठी देशांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा डाक घरची सुरुवात सरकारने केली आजही अत्याधुनिक संपर्कांच्या यंत्रणा असून देखील डाकघर नवीन रूपामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे
जुन्या काळामध्ये एक चित्रपट आला होता त्याचे नाव होते पलको की छाव मे हिंदी चित्रपटातील एक गाणं होतं डाकिया डाक लाया डाक लाया काही खुशी का पयाम कही कही दर्दनाक हे गाणं त्या काळात खूप गाजलं होतं सर्वसामान्य माणसाला सुखदुःखाची बातमी कळण्यासाठी पत्राचा उपयोग होत होता कालांतराने असे वाटत होते की संपर्काची साधने उपलब्ध झाल्यानंतर डाक सेवा ही बंद पडती काय पण आज देखील जी मजा पत्र वाचण्यामध्ये होती ती मजा व्हाट्सअप मेसेज किंवा एसएमएस वाचण्यात नाही
डाक विभागामध्ये सध्या मोठे बदल होत आहेत जलद व उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड आर.एम.एस.(RMS)ची एक नवीन ओळख झाली आहे यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना अति जलद व ग्राहकांनी पाठवलेली पत्रे वेळेवर तत्पर पोहोचण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड आर.एम.एस.(RMS) ची हायटेक सेवा उपलब्ध झाली आहे

एम जी पाटोळे यांनी केला आर.एम.एस.(RMS) विभागात मोठा बदल
मराठवाडातील नांदेड आर.एम.एस.(RMS) येथे एम.जी पाटोळे यांची बदली नाशिक इथून झाली एम.जी पाटोळे यांची ओळख आर.एम.एस.(RMS) विभागांमध्ये शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे त्यांची नियुक्ती जिल्ह्याच्या एम.आर.ओ. पदी झाली रुजू होताच एम.जी पाटोळे यांनी त्या विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अगदी पहिल्या दिवशी पासूनच शिस्तीचे धडे लावले ग्राहकांना तत्पर सेवा देणे याचे महत्त्व एम.जी.पाटोळे यांनी अधिकाऱ्यांना समजून सांगितलेआर.एम.एस.(RMS) याचा अर्थ होतो रेल्वे मेल सर्विस सगळ्यात हाय स्पीडने या विभागाअंतर्गत हाय स्पीड हाय टेक जलद स्पीड पोस्ट पार्सल रजिस्टर तसेच टपाल या सेवा पुरविल्या जातात एम.जी पाटोळे यांनी नांदेड विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर यामध्ये आणखीन तत्परता आणण्याचे काम केले.
नांदेड जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण खेडेगाव वाडी तांडे यांच्यापर्यंत आर.एम.एस.(RMS) बद्दल जनजागृती झाल्यामुळेआर.एम.एस.(RMS)च्या कामकाजाचा वाढला आणि सर्वसामान्य जनतेमधून याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली वेळेत पोहोचलेल्या पत्रांमुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागले तसेच एम.जी पाटोळे यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये शिस्त लागावी म्हणून स्वतःच ऑफिसच्या स्वच्छतेचे मोहीम राबवून ऑफिस व ऑफिसचा परिसर हा चकाचक करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा देखील चालू केला यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल बैठकीची व्यवस्था असेल व आलेल्या ग्राहकांचे हसून स्वागत करणे असेल अशा पद्धतीचे बदल करून एम.जी पाटोळे यांनी चांगली सेवा द्यायला सुरुवात केली यामुळे या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केले खाजगी कंपन्यांच्या पार्सल सेवेनेच जर पार्सल पाठवले तरच ते वेळेत पोहोचते असा गैरसमज समाजामध्ये होता पण एम.जी पाटोळे यांनी जो ग्राहकआर.एम.एस.(RMS) च्या सेवेपासून दूर गेला होता त्यांना परत एकदा आर.एम.एस.(RMS) कार्यालयापर्यंत आणण्याचे काम हे एम. जी पाटोळे यांनी केले

एम.जी पाटोळे यांनी फक्त अधिकाऱ्यांना शिस्त नाही लावली तर त्या परिसरात वृक्षारोपण देखील केले आणि त्यांनी तिथे पाण्याचा जो प्रश्न होता तो अधिकाऱ्यांना भेटून तो मार्गी लावला व त्या ठिकाणी ऑफिसच्या परिसरामध्ये सर्वत्र हिरवळ हिरवळ सध्या दिसून येत आहे विविध प्रकारची फुलांची झाडे लावल्यामुळे आलेला प्रत्येक ग्राहक हा काही वेळ का होईना या ठिकाणी थांबून हिरवळीवर बसून व उंच झाडांच्या सावलीत बसून मनमोहक कुंडीतील फुलांची झाडे पाहून त्यांचे मन प्रफुल्लित होते
हे हि वाचा–जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही
शिस्तप्रिय अधिकारी एखादा विभागाला मिळाला की त्या विभागाचा कायापालट हा होतोच आणि मनात इच्छा असेल तर सरकारी नोकरी करत असताना देखील आपण आपल्या कामाने जनमानसाच्या मनावर छाप सोडू शकतो याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे एम.जी पाटोळे यांनी केलेल्या कार्याचा करावा तेवढा गौरव कमीच आहे तरी हे ऑफिस आणि ऑफिसचा परिसर हेच माझ्यासाठी देवघर आहे तर येणारा प्रत्येक ग्राहक हा आमच्यासाठी दैवत आहे अशा पद्धतीची विचारसरणी ठेवून देशातील सर्वात मोठे दळणवळणाचे साधन म्हणून आपण पाहतो ते आहे रेल्वे इतकी तत्परता तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही विभागात पाहायला मिळत नाही त्यामुळे अति जलद पद्धतीने रेल्वे मेल सर्विस ने आपण आपले पार्सल किंवा पत्र कमीत कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो त्यांच्या विभागाकडे असलेली शक्ती ओळखूनच एम.जी.पाटोळे यांनी नांदेड आर.एम.एस.(RMS) विभागाला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचारी वर्ग देखील अत्यंत माहिती आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याचे एल.एस.जी. एस.आर.ओ. एम.जी पाटोळे सर तसेच त्यांचे सहकारी के.टी.कांबळे मॅडम,जी.बी कदम सर,हरिभाऊ ठोंबरे,एम.एस ताटे व डी.जे जाधव,व्ही.डी मुरकुटे,एफ.एन पठाण ,एस.गंगावार,यु.एन गायकवाड,कवटकर या कर्मचाऱ्यांचेही योगदान यामध्ये मोठे आहे त्यांच्या या कार्याला संकल्प टुडेचा सलाम

सुभाष भंडारे (सामाजिक कार्यकर्ते)
नांदेड आर.एम.एस.(RMS) कार्यालयात पूर्वी जायचं म्हटलं की कपाळाला आट्या पडत होत्या कारण गेल्यानंतर तासन तास लाईन असायची व कुठलीही सुविधा तिथे मिळत नसायची पण मागील काही महिन्यांपासून तेथे कायापालट झाल्याचे दिसून येत आहे अतिशय नम्र असे कर्मचारी वर्ग तसेच ऑफिसच्या बाहेरील किरवळ पाहून खरोखरच मन प्रफुल्लित होतं व पूर्वीपेक्षा आर.एम.एस.(RMS)विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये मोठी गती आल्याचे पाहायला मिळत आहे त्याबद्दल तेथील आर.एम.ओ एम.जी पाटोळे यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो त्यांनी या दिलेल्या सेवेबद्दल
हे हि वाचा–Soyabean kharedi-शासनाची खरेदीची मुदत संपली,उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे काय होणार ?
पंचशील कांबळे ( मा .नगरसेवक लोहा )
साधारण दोन महिन्यापूर्वी मला एक पार्सल अर्जंट मुंबईला पाठवायचे होते आणि त्यामुळे मी नांदेडला येऊन ते पार्सल आर.एम.एस.(RMS) ने पाठवायचे ठरविले पण ग्रामीण भागामधून शहरी व भागांमध्ये येण्यासाठी लागणारा वेळ मला यायला थोडासा उशीर झाला आणि मी जेव्हा पोचलो तेव्हा त्यातील काउंटर बंद झाले होते म्हणून मी व्यक्तिशः एम.जी पाटोळे यांची भेट घेतली व त्यांना हे पार्सल मुंबईला तातडीने पाठवायचे आहे अशी विनंती देखील केली एम.जी पाटोळे यांनी कुठलाही विलंब न करता ते पार्सल घेऊन अगदी वेळेत ते मुंबईला पाठविले त्यांचा मनमिळावू स्वभाव व एखाद्या ग्राहकाची अडचण समजून घ्यायची वृत्ती यामुळे खरोखरच आनंद झाला त्यांनी या विभागाची केलेली काया पालटणी ही खरोखरच दखल घेण्यासारखी आहे एक अधिकारी काय करू शकतो व किती मोठ्या प्रमाणात एखाद्या विभागांमध्ये बदल करू शकतो हेच आपल्याला पाहिजे असेल तर आर.एम.एस.(RMS) कार्यालयाची कार्य तत्परता हा पाहण्यासारखी आहे
2 Comments
ejJW WKBdhgQ NRruPmz
VrGpC oxjHFJG KjCDu