आपण जर पाहिले असेल तर आपल्या आजी आजोबांची तब्येत ही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते ते निरोगी असतात या मग काय कारण आहे याचा आपण शोध घेतला तर आपल्याला कळेल की त्यांच्या काळामध्ये ते जास्तीत जास्त प्रमाणात भरडधान्य(millets)सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे प्रचलित असलेले बाजरी,ज्वारी हे खात असत या भरडधान्यांचं(millets)आपल्या आहारात काय महत्त्व आहे याविषयी चर्चा करूया
आपल्या देशामध्ये वाढणारी लोकसंख्या व घटनारी शेती करण्यासाठी योग्य असलेली जमीन हे दोन चिंतेचे विषय आहेत शेती योग्य जमीन वरचेवर घटत आहे आणि त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचे आव्हान हे शेतकऱ्यांसमोर आहे पूर्वी आपण जास्त प्रमाणामध्ये भरडधान्याचा(millets)उपयोग हे आपल्या खाण्यामध्ये करत होतो पण हरितक्रांतीच्या नंतर भारत देशामध्ये मोठ्या
प्रमाणामध्ये गहू आणि तांदळाचे उत्पन्न वाढले याला कारण होतं की हरितक्रांती मध्ये जास्त उत्पन्न देणारे गहू आणि तांदूळ या दोघांच्या नवीन जाती देशात आल्या आणि कुठेतरी याचा आर्थिक फायदा हा आपल्याला होईल म्हणून शेतकरी या दोन पिकांकडे वळाला पण जे परंपरागत पीक होती जवारी,बाजरी यांना मात्र शेतकऱ्यांनी पसंती देणे बंद केले
भरड धान्य म्हणजे काय
आपण भरडधान्य(millets) म्हणा किंवा तृणधान्य म्हणा किंवा NUTRI-CEREALSम्हणा ही तिनी एकच नाव आहे मुख्यतः तृणधान्यांमध्ये निसर्गचक्राला लागणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये आहे याचे सोपे उदाहरण पाहिजे तर जवारी चे वरचे कणीस व त्यामधील दाणे हे मानव खातो तर जवारीच्या मुळा या जमिनीसाठी असतात म्हणजे यामुळे नैसर्गिक कर्बचे प्रमाण हे वाढते आणि जमीन अधिक सुपीक होते व मधला भाग हा जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जाऊ शकतो यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते आणि या
भरडधान्यांचा(millets)दुसरा उपयोग म्हणजे की या पिकांवर येणारी रोगराई ही अत्यंत कमी असते व कमी पाण्यामध्ये सुद्धा ही पिके तग धरून राहतात पण हरितक्रांतीच्या नंतर कोठे ना कोठे या तृणधान्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली व गहू आणि तांदूळ या दोन पिकांना महत्त्व द्यायला सुरू केले पण या भरडधान्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च हैदराबाद अर्थात IIMRही संस्था प्रयत्नशील आहे
भरड धान्यामध्ये बाजरी,नाचणी,जव,कोदे,सामा,सोया,कांगणी,कुटकी,ब्राऊनटॉप,भादली,बर्टी,हरिक,राजगिरा,कुट्टू कोड,सनवाकोदा,कांग,घिणी,वरळीराळ कांग व ज्वारी यामध्ये देखील ज्वारीचे देखील प्रकार आहेत लाह्याची ज्वारी,कार ज्वारी,सुलतान शाळू ज्वारी,मालदंडी शाळू इत्यादी धान्यांचा समावेश होतो भरड धान्यामध्ये(millets)पौष्टिकतेचे प्रमाण जास्त असते तसेच हे धान्य आपल्याला आरोग्य सुरक्षा अन्नसुरक्षा व शेतकऱ्यांचा सर्व बाजूने फायदा यामुळे पूर्वी शेतकरी या पिकांना पसंती देत होता
लहानपणा पासून मुलांना जर भरड धान्य योग्य प्रमाणात मिळाले असेल तर त्यांची वाढ ही झपाट्याने होते व त्यांच्या अंगामध्ये रोग प्रतिकार शक्ती ही इतर मुलांपेक्षा जास्त असते
तृणधान्याचा प्रचार व्यवस्थित व्हावा यासाठी सरकारने 26 जून 2022 रोजी तृणधान्य दिन साजरा केला तसेच 2018 हे वर्ष मिलेट्स अर्थात तृणधान्य(millets) भरडधान्य वर्ष म्हणून साजरी केले या मागचा प्रमुख उद्देश हा होता की शेतातून आणि खाण्याच्या पात्रातून भरडधान्य(millets)जे गायब झाले आहे ते परत एकदा शेतात आणि पात्रात दोन्हीकडेही आणले जावे याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्राने देखील 2023 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स(INTERNATIONAL MILLETS YEAR) म्हणून साजरे केले जेणेकरून या धान्याचा प्रचार हा जगभरात व्हावा तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीला मोठे अन्न अर्थात भरडधान्याचे(millets)महत्त्व समजावे व शेतकऱ्यांना देखील आर्थिक फायदा कसा होईल हे समजून सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेल
बाजरी,ज्वारी यापासून बनलेल्या भाकरी रोज खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याची भीती ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होती तसेच यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकामुळे हृदयरोग तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजारामध्ये सुद्धा चांगला फायदा होतो गव्हाच्या चपाती पेक्षा ज्वारी,बाजरी यापासून तयार झालेली भाकर ही अधिक पौष्टिक असते या भाकरी मध्ये फायबरचे प्रमाण हे खूप जास्त असते ज्वारी आणि बाजरी मध्ये प्रोटीनची मात्रा ही खूप जास्त प्रमाणात असते तसेच भाकरी मध्ये मोठ्या प्रमाणात आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणात असते तसेच विटामिन बी 6 फॉलिक ऍसिड यांचेही प्रमाण जास्त असते
त्यामुळे ही जास्त पोषक असते तसेच ज्वारी आणि बाजरी या दोन्हीमध्येही कॅलरीज कमी असतात त्यामुळे हे खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही व मुबलक प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे अन्नपचन होण्यासाठी मदत होते अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात यामुळे कॅन्सर सारख्या आजारामध्ये फायदा होतो
ज्वारी आणि बाजरी मध्ये ग्लुटेन नसल्यामुळे त्याचाही शरीराला फायदा होतो ज्यांचे वजन हे वाढलेले आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी देखील भाकर उपयोगी ठरतील कारण यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचायला सोपी आणि भाकर खाल्ल्यानंतर भरपूर वेळ भूक लागत नाही त्यामुळे देखील वजन नियंत्रित करण्यासाठी भाकर फायदेशीर ठरते तसेच हृदयरोगामध्ये बाजरी आणि ज्वारी मध्ये असलेल्या अल्फा-लिनोलेनिक एसिड व विटामिन ई या दोन घटकांमुळे हृदयरोग होण्याचे प्रमाण कमी होते
आपल्या देशामध्ये दहा कोटी लोक यांना मधुमेह आहे आणि लाखो रुग्ण हे हृदय विकारामुळे त्रस्त आहेत तसेच आपल्या देशामध्ये कुपोषणाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे आपल्या देशातील कुपोषित मुलांची संख्या ही कोटीच्या घरात जाते
आपल्या देशातील 21 राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तृणधान्य भरडधान्य ही पीकवली जातात
तेथील परंपरेनुसार त्या त्या पद्धतीचे तृणधान्य खाण्याची पद्धत आहे मागील काही वर्षापासून या पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मधुमेह हृदयविकार कॅन्सर यासारखे मोठमोठे आजार पाहायला लागलेले आहेत करोणा लाटेमध्ये सुद्धा डॉक्टर प्रत्येकाला बाजरीची किंवा ज्वारीची,भाकर खाण्याचा सल्ला देत होते यामुळे मानवी शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढते हे अण्णा पचायला सोपे असल्यामुळे देखील डॉक्टर हे खाण्याचा सल्ला देतात
आता शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये तृणधान्य भरडधान्या(millets)कडे वळताना दिसत आहे कारण याचे बरेच फायदे आहेत ते भरडधान्य(millets) लावल्यामुळे यापासून तयार होणाऱ्या चाऱ्यामुळे जनावरांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच लोकांमध्ये देखील भरडधान्य(millets)विषयी आलेली जागरूकता यामुळे देखील भरडधान्याची(millets)मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे
याचा कुठे ना कुठे फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे तसेच हे भरडधान्य(millets)हे अत्यंत कमी पाण्यात तसेच जास्त उष्णतेमध्ये सुद्धा तिचे तग धरू शकतात त्यामुळे देखील या पिकांना शेतकरी पसंती देत आहेत जास्त रोगराई या पिकांवर येत नसल्यामुळे यावर औषधाची फवारणी करण्याची तिसरी गरज नसते त्यामुळे याला आपण सेंद्रिय पद्धतीने सुद्धा पीकवता येतात तसेच नव्या पिढीला देखील बाजरी पासून तयार झालेले स्नॅक ब्रेड टोस्ट यांकडे खाण्याचा कल वाढला आहे
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये तृणधान्य अर्थात भरडधान्याचा(millets)समावेश जरूर करावा आणि रोगराईला दूर ठेवावे बाजरी उत्पादनामध्ये आपला देश हा नंबर एक वर आहे मोठ्या प्रमाणात आपण बाजरी निर्यात देखील करतोत तसेच भारतामध्ये देखील मागील काही वर्षापासून बाजरी आणि ज्वारीची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरीच तसेच बाकी तृणधान्यची(millets) मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे आरोग्य बाबतीत आलेली जागरूकता ही सुद्धा यामागचे मोठे कारण आहे अनेक डॉक्टर सुद्धा तृणधान्य भरडधान्य(millets)हे आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे असा सल्ला देखील देत आहेत
टीप वरील सर्व माहिती ही प्रसार माध्यमांमधून व पुस्तकांमधून गोळा केलेली आहे ही फक्त माहिती आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे