मुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी(vidhan parishad election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते विधान परिषदेच्या(vidhan parishad election) पाच रिक्त जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती यामध्ये पाच जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले पण एका उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदकाची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद झाला आहे? ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे?
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे(vidhan parishad election)पाच आमदार हे विधानसभेवर निवडून गेले यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या या विधान परिषदेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली पाच जागांसाठी 17 मार्च 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अर्ज वापस घ्यायची तारीख ही 20 मार्च ही आहे आणि निवडणुकी 27 मार्च 2025 रोजी होणार आहे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जागांसाठी फक्त सहा उमेदवारनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व एका उमेदवाराच्या आर्ज वर सूचक व अनुमोदका ची सही नसल्यामुळे तो बाद झाला आहे ? व आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे?
या पाच जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने एक अर्ज दाखल करण्यात आला पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक बिनविरोध होणार असाच अंदाज होता कारण की विधान परिषदेमध्ये निवडून येण्यासाठी जो मतदानाचा कोटा आहे तेवढे बहुमत विरोधी पक्षाकडे नाही त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते
हेही वाचा-vidhan parishad election-विधानपरिषदे साठी कोणाच्या नावाची चर्चा ?
भारतीय जनता पार्टीचे तीन विधान परिषदेचे आमदार हे विधानसभेवर निवडून गेले यामध्ये लातूरचे रमेश कराड हे लातूर ग्रामीण मधून विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले तर गोपीचंद पडळकर ही विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार हे जत विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभेवर निवडून गेले तर प्रवीण दटके हे नागपूर मध्य या विधानसभा मतदार संघामधून ते विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले प्रवीण दटके हे विधान परिषदेचे आमदार होते
हेही वाचा-agriculture news budget 2025 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाची विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर हे परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले ते यापूर्वी विधानपरिषदेचे सदस्य होते
शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले ते पूर्वी विधान परिषद सदस्य होते वरील रिक्त जागांमध्ये
भारतीय जनता पार्टीने आपली तीन उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये

संजय केनेकर(Sanjay Kenekar)
संजय केनेकर(Sanjay Kenekar) हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तसेच मराठवाड्यामध्ये बूथ लेवल पासून काम करण्याचा त्यांचा अनुभव नगरसेवक उपमहापौर अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पार पाडले आहेत विद्यार्थी दशेपासूनच संजय केनेकर(Sanjay Kenekar)हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत सध्या ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आहेत

संदीप जोशी(sandip joshi)
संदीप जोशी(sandip joshi) हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते तसेच ते नागपूर चे महापौर देखील होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते बालपणीचे मित्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढू इच्छित होते पण त्यांना त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही भारतीय जनता पार्टीची असलेली एक निष्ठता व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असलेली मैत्री यामुळे संदीप जोशी(sandip joshi)यांना परिषदेची(vidhan parishad election) उमेदवारी मिळाली आहे

दादाराव केचे(Dadarao Keche)
दादाराव केचे(Dadarao Keche)हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दादाराव हे 1983 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत दादाराव केचे(Dadarao Keche)हे दोन वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दादाराव केचे(Dadarao Keche)यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली दादाराव त्याचे हे नाराज झाले व त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी(vidhan parishad election) देण्यात आली आहे

संजय खोडके(Sanjay Khodke)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षातर्फे संजय खोडके(Sanjay Khodke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे संजय खोडके(Sanjay Khodke) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विदर्भातील मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विदर्भामध्ये पक्ष आणखीन मजबूत होण्यासाठी अजितदादा पवार यांनी संजय खोडके(Sanjay Khodke)यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे

चंद्रकांत रघुवंशी(chandrkant raghuvanshi)
शिवसेना शिंदे गटाकडून एका रिक्त जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी(chandrkant raghuvanshi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे चंद्रकांत रघुवंशी(chandrkant raghuvanshi) हे नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख आहेत 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हापासून ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये बूथ लेवल पासून पक्ष बांधणीचे काम करत होते त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे
तसेच या निवडणुकीसाठी उमेश म्हात्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण या अर्जासोबत अनुमोदक आणि सूचक म्हणून एकही आमदाराची स्वाक्षरी नसल्यामुळे तो बाद झाला आहे ?
पक्षीय बलाबल पाहता विरोधी पक्षाला एकही जागा जिंकता येणार नाही असे चित्र होते त्याचप्रमाणे
आता फक्त पाच उमेदवार असल्यामुळे हि पोटनिवडणूक बिनविरोध होणार?