तिरुपती – तिरुपती मधील वेंकटेश्वरा प्राणी संग्रहालयामध्ये मध्य धुंद
एका व्यक्तीने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली व सेल्फी काढण्याचा
प्रयत्न केला पण हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला
राजस्थान मधून आलेल्या एका युवकाने नशेमध्ये धुंद होऊन सेल्फी
काढण्यासाठी चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली व सेल्फी देखील
काढली पण याचवेळी सिंहाने त्याच्यावर हल्ला केला कसाबसा सुटून तो झाडावर
चढला पण सिंहगर्जना ऐकून तो घाबरला व झाडावरून खाली पडला त्यानंतर सिंहाने
त्याच्यावर हल्ला केला व त्याला जागीच ठार केले यामुळे व्यंकटेश्वरा प्राणीसंग्रहालयात
एकच गोंधळ उडाला प्राणीसंग्रहातील कर्मचाऱ्यांनी आवाज करून सिंहाला बाजूला पळवले
व मयत व्यक्तीला बाहेर काढले पण खूप उशीर झाला होता सिंहाने तेव्हाच त्याचा प्राण घेतला होता
याची माहिती मिळताच पोलीस तिथे आले व पुढील प्रक्रिया पूर्ण केली कधी नशेत तर कधी
काहीतरी खतरनाक काम करायचे म्हणून अनेक जण कधी वाघाच्या सिंहाच्या पिंजऱ्यात जातात
पण ते त्यांच्या जीवावर भेटते एका नशेमुळे मात्र राजस्थानमधील युवकाला आपला जीव गमवावा लागला