- नांदेड-राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि यामुळे संभावित उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये संभावित लढत कशी होऊ शकते त्याविषयी आपण चर्चा करूया
नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात
1)नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ
(Nanded North Assembly Constituency)
2)नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ
(Nanded South Assembly Constituency)
3)किनवट विधानसभा मतदार संघ
(Kinwat Assembly Constituency)
4)भोकर विधानसभा मतदार संघ
(Bhokar Assembly Constituency)
5)हदगाव विधानसभा मतदार संघ
(Hadgaon Assembly Constituency)
६)देगलूर विधानसभा मतदार संघ
(deglur Assembly Constituency)
7)मुखेड विधानसभा मतदार संघ
(Mukhed Vidhan Sabha Constituency)
8)नायगाव विधानसभा मतदार संघ
(Naigaon Assembly Constituency)
9)लोहा विधानसभा मतदार संघ
(Loha Assembly Constituency)
या नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो पूर्वीपासून नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जात होता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै .शंकरराव चव्हाण यांनी नांदेड मधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाच्या गृहमंत्र्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या त्यानंतर त्यांचे सुपुत्र खा .अशोकराव चव्हाण यांनी देखील राज्यामध्ये अनेक मंत्री पद सांभाळली त्यानंतर ते मुख्यमंत्री देखील झाले पण 2019 च्या निवडणुकीनंतर मात्र भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव भारतीय जनता पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि यामुळे जिल्ह्यातील सर्व राजकीय सगळी करणे बदलून गेले याबद्दल दिलेल्या समीकरणा नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये लढत कशी होऊ शकते
1)नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Nanded North Assembly Constituency)
या मतदारसंघां मधून विद्यमान आमदार बालाजी पाटील कल्याणकर(MLA Balaji Patil Kalyankar) हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डी .पी .सावंत यांचा पराभव केला होता डीपी सावंत हे खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिलेले आहे पण 2019 च्या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर(MLA Balaji Patil Kalyankar) यांनी त्यांचा पराभव केला 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर(MLA Balaji Patil Kalyankar) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तसेच काँग्रेस मधून डीपी सावंत व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण हे देखील इच्छुक तसेच विठ्ठलराव डक यांनी देखील विधानसभेसाठी तयारी चालू केली आहे
2)नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Nanded South Assembly Constituency)
या विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे मोहन अण्णा हंबर्डे(Mohan Anna Humbarde)2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहन अण्णा हंबर्डे(Mohan Anna Humbarde)यांना शेवटच्या क्षणी काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली त्यांनी शिवसेनेच्या सौ राजश्रीताई पाटील यांचा पराभव केला तसेच दिलीप कंदकुते हे देखील निवडणुकीमध्ये पराभूत झाले मोहन अण्णा हंबर्डे(Mohan Anna Humbarde)हे खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर मोहन अण्णा हंबर्डे(Mohan Anna Humbarde)हे देखील भाजपामध्ये जातील असा अंदाज व्यक्त केला जात होता पण मोहन अण्णा हंबर्डे(Mohan Anna Humbarde)यांनी काँग्रेसमध्ये राहण्यात पसंत केले काँग्रेस पक्ष त्यांना परत एकदा येथून उमेदवारी देऊ शकते तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे दिलीप कंदकुर्ते ही संभावित उमेदवार असू शकतात तसेच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कन्या सौ प्रणिती ताई देवरे चिखलीकर किंवा चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांची नावे आघाडीवर आहेत तसेच वंचितच्या वतीने फारूक अहमद यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
3)लोहा विधानसभा मतदारसंघ(Loha Assembly Constituency)
या मतदारसंघांमधून विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे(Shyam Sundar Shinde)हे आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत पण यावेळी श्यामसुंदर शिंदे(Shyam Sundar Shinde) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे श्यामसुंदर शिंदे(Shyam Sundar Shinde)हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे दाजी आहेत 2019 च्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे(Shyam Sundar Shinde)यांनी वंचित चे शिवा भाऊंना रंगले व शिवसेना पक्षाचे नेते मुक्तेश्वर धोंडगे यांचा पराभव केला होता श्यामसुंदर शिंदे(Shyam Sundar Shinde)निवडणुकीला कोणत्या पक्षातर्फे उभे राहतील आध्यप स्पष्ट नाही पण प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी भेटेल असा त्यांना विश्वास आहे तसेच या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे एकनाथ दादा पवार व जन सेवा पार्टीचे मनोहर धोंडे हे इच्छुक आहेत तसेच वंचित चे शिवाभाऊ नरंगले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
4)किनवट विधानसभा मतदारसंघ (Kinwat Assembly Constituency)
हेही वाचा-http://MAHARASHTRA VIDANSABHA ELECTIO विधानसभा निवडणूक कधी होणार आचार संहिता कधी पासून? https://sankalptoday.com/maharashtra-vidansabha-election-when-to-be-code-of-conduct-from-when/
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे भीमराव केराम(Bhimrao Keram)हे आहेत 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रदीप नाईक यांचा पराभव केला होता 2024 च्या विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे भिमराव केराम(Bhimrao Keram)असतील अशी शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तसेच याच मतदारसंघामधून आकाश जाधव व ज्योतिबा दादा खराटे विधानसभेसाठी इच्छुक आहेत तसेच भारतीय जनता पार्टी कडून संध्याताई राठोड या सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे
5)भोकर विधानसभा मतदारसंघ(Bhokar Assembly Constituency)
या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे अशोकराव चव्हाण हे होते पण त्यांनी राजीनामा दिला व भाजपामध्ये प्रवेश केला 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण(Srijaya Chavan) यांचे नाव चर्चेत आहे तर महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम हे इच्छुक आहेत तसेच तिरुपती कोंडेकर बाळासाहेब रावणगावकर हे सुद्धा इच्छुक आहेत या मतदारसंघांमधून स्वर्गीय शंकराव चव्हाण त्यानंतर अशोकराव चव्हाण अमिता चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे त्यानंतर आता श्रीजया चव्हाण (Srijaya Chavan)यादेखील याच मतदारसंघातून इच्छुक आहेत
6)मुखेड विधानसभा मतदारसंघ(Mukhed Vidhan Sabha Constituency)
या विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड(Tushar Rathore)हे आहेत 2019 च्या निवडणुकीमध्ये 2014 च्या निवडणुकीमध्ये तुषार राठोड(Tushar Rathore)हे विजयी झालेले आहेत यंदाचे हॅट्रिक करण्यासाठी विधानसभेला उभे राहणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे पण स्थानिक पातळीवर बेटमोगरेकर यांना काँग्रेस मधून मोठा विरोध होताना दिसत आहे मुखेड विधानसभा मतदारसंघ मधून प्राध्यापक यशपाल भिंगे हे सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून बालाजी पाटील खतगावकर यांच्याही नावाची चर्चा आहे
7)देगलूर विधानसभा मतदारसंघ(deglur Assembly Constituency)
हेही वाचा-http://MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा https://sankalptoday.com/millets-consume-whole-grains-in-diet-to-ward-off-disease/
देगलूर विधानसभा मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ आहे येथून आमदार जितेश अंतापुरकर(Jitesh Antapurkar)हे आमदार आहे काही दिवसापूर्वी जीतेश अंतापुरकर(Jitesh Antapurkar)यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे अंतापुरकर अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत भाजपाच्या वतीने त्यांना उमेदवारी मिळणार आहे तर यात मतदारसंघांमध्ये दीपक रामपूरकर व प्राध्यापक उत्तम कांबळे हे काँग्रेस कडून इच्छुक असल्याची चर्चा आहे तसेच अविनाश घाटे यांचे नाव चर्चेत आहे तर सुभाष साबणे यांनी जितेश अंतापुरकर(Jitesh Antapurkar) यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवली होती पण जितेश अंतापुरकर हे भाजपा मध्ये आल्यामुळे सुभाष साबणे हे काँग्रेस कडून उमेदवारी मिळतील अशी चर्चा आहे
8)नायगाव विधानसभा मतदारसंघ(Naigaon Assembly Constituency)
हेहीवाचा –http://नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी? https://sankalptoday.com/ravindra-chavan-candidacy-for-nanded-lok-sabha-by-election/
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार(Rajesh Pawar)हे आहेत त्यांनी 2019 च्या निवडणुकीमध्ये दिवंगत खा .वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला होता याच मतदारसंघांमधून राजेश पवार(Rajesh Pawar)यांना भाजपाची उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे तर काँग्रेसच्या वतीने भास्करराव पाटील खतगावकर किंवा त्यांच्या सुनबाई मीनल ताई खतगावकर यांच्या नावाची चर्चा आहे तसेच वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे जर त्यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते
9)हदगाव विधानसभा मतदारसंघ(Hadgaon Assembly Constituency)
हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे माधवराव जवळगावकर(Madhavrao JavalGaonkar)हे आहेत काँग्रेस पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे तर याच मतदारसंघां मधून माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील यादेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे इच्छुक आहेत आता ही विधानसभेची जागा नेमकी कोणाला सुटणार यावर या दोन नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे तसेच महायुती मधून शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची चर्चा आहे बाबुराव कदम कोहळीकर यांनी 2024 ची लोकसभेची निवडणूक हिंगोली लोकसभा मतदार संघामधून लढविली होती पण त्यांचा पराभव झाला होता आता त्यांनी विधानसभेचे सभेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष वानखेडे तसेच हिंगोली चे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील अष्टीकर या मतदार संघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संभावित लढती ज्याप्रमाणे होऊ शकतात जसे जशी उमेदवारी जाहीर व्हायला सुरुवात होईल बंडखोरी प्रत्येक पक्षामध्ये होणारच हे जवळपास निश्चित मानलं जात आहे याचा प्रभाव विधानसभेत काय पडतो हे निकालांती स्पष्ट होईल
लेखन व संकलन गजानन चव्हाण