आज 25 जून ही तारीख हा दिवस हा भारताच्या इतिहासामधील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे
कारण याच दिवशी 1975 मध्ये आणीबाणी (emergency) त्यावेळच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी जाहीर केली
विरोधी पक्षया दिवसाला काळा दिवस सुद्धा म्हणतात मुळात आणीबाणी काय असते व ती
इंदिरा गांधी यांनी का लावली अशी कुठली परिस्थिती होती की ज्यामुळे आणीबाणी सारखा निर्णय घ्यावा
लागला याविषयी आपण चर्चा करूया
आणीबाणी लागण्याचे कारण (Cause of emergency)
आपल्या देशाच्या संविधानाप्रमाणे जर एखादे बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत हिंसक आंदोलन व देशाची पूर्ण
बिघडलेली आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे देशामध्ये आणीबाणी (emergency) लावता येत संविधानातील अनुच्छेद 352(१) प्रमाणे
आणीबाणीची सुरुवात ही 1971 ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून होती या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला
अभूतपूर्व यश आले आणि काँग्रेस पक्षाने तब्बल 352 जागी विजय संपादित केला व इंदिरा गांधी या देशाच्या
पंतप्रधान झाल्या गरिबी हटाव हा नारा देऊन इंदिरा गांधी यांनी ही निवडणूक लढवली त्याकाळी हा नारा खूप गाजला होता
इंदिरा गांधी या उत्तर प्रदेश मधील रायबरेली येथून निवडणूक जिंकल्या पण त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी अलाहाबाद
उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की ज्यामध्ये इंदिरा गांधी यांच्यावर निवडणुकीदरम्यान सरकारी यंत्रणेचा
दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला याची सुनावणी चालूच होती आणि त्याचवेळी देशांमध्ये गरिबीचे प्रमाण व
महागाई प्रचंड वाढली होती यामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता पण बिहार आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून
मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाली व या आंदोलनाला दडपण्यासाठी या दोन राज्यांमध्ये आंदोलकांवर लाठी हल्ला केला
गेला व इथून या आंदोलनाचा उद्रेक झाला व त्यावेळी या युवकांनी स्वातंत्रता सेनानी जयप्रकाश नारायण यांच्याशी संपर्क केला
व या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावे अशी विनंती केली व येथूनच या आंदोलनामध्ये जे पी सक्रिय झाले जयप्रकाश नारायण(Jayprakash narayan)
स्वातंत्र्य्य सेनानी होते पण त्यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना देशाचे उपपंतप्रधान
होण्याची विनंती देखील केली होती पण जेपींना त्यामध्ये रस नव्हता पण देश हितासाठी या आंदोलनामध्ये सक्रिय व्हायचं जेपी यांनी
ठरवलं तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालीमुंबईमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झाली या
आंदोलनामध्ये एक लाख रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला हे आंदोलन सलग तीन महिने चालले हे सर्व आंदोलन चालू
असताना या आंदोलनामध्ये आणखी एक वळण आले आणि राज नारायण यांनी दाखल केलेली अलाहाबाद उच्च न्यायालयातील
याचिकेचा निकाल आला आणि या याचिकेमध्ये सुनावणी करताना न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी 1971 मधील रायबरेली
लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही रद्द केली व पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक लढविण्यावर सहा वर्षाची बंदी घातली
हा निर्णय 22 जून 1975 ला आला इंदिरा गांधीयांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आणि त्यांनी आपल्या निवासस्थानी
एक सफदर जंग रोड येथे आपल्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली या बैठकीमध्ये पुढे काय करायचे याविषयी चर्चा सुरू झाली
या चर्चेमध्ये नेतृत्व बदल करून दुसरं कोणालातरी पंतप्रधान पदाची सूत्र हातात द्यायची व इंदिरा गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष राहतील
असा ठराव संमत केला पण त्याच वेळी इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी हे त्या बैठकीत आले व इंदिरा गांधी यांना दुसऱ्या खोलीमध्ये
नेऊन त्यांनी काहीतरी समजून सांगितले आणि परत एकदा इंदिरा गांधी व संजय गांधी दोघेही या बैठकीमध्ये येऊन बसले बसल्यानंतर
इंदिरा गांधी यांनी आपला निर्णय बदलला व आपण या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद
मागू असं सांगितलं त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मधून यशवंतराव चव्हाण यांचे सुद्धा नाव पंतप्रधान पदासाठी आघाडीवर होते त्यानंतर
सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयी दाद मागितली गेली व 24 जून 1975 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर कृष्णा अय्यर
यांनी आपला निर्णय दिला व या निर्णयामध्ये त्यांनी अलाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय जशाच्या तसा ठेवला व त्यावर त्यांनी फक्त
इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पदावर राहण्याची सूट दिली यादरम्यान इंदिरा गांधी या लोकसभेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकत होत्या
पण कुठल्याही निर्णयावर त्यांना मतदान करता येणार नाही असा निर्णय न्यायमूर्तींनी दिला आणि इंदिरा गांधी या प्रचंड अडचणीत
सापडल्या संपूर्ण विरोधी पक्ष एक झाला होता पूर्ण देशभरामध्ये आंदोलन उभी राहिली होती आणि जीपी व त्यांच्या सहकाऱ्यांनी
दिल्लीमधील रामलीला मैदानामध्ये एका मेळाव्याचे आयोजन केले व या मेळाव्यामध्ये संपूर्ण विरोधी पक्ष हा एकवटलेला दिसला त्या
मेळाव्यामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी माजी पंतप्रधान चंद्रशेखर आणि इतर मोठ्या नेत्यांचा समावेश होता
या मेळाव्यामध्ये तीन ते चार लाख लोक एका जागी जमले व हा जमलेला जनसमुदाय पाहून इंदिरा गांधी यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली.
याप्रसंगी बोलताना जेपी(Jayprakash narayan) यांनी एक कविता म्हटली की ज्या कवितेचा उल्लेख आज सुद्धा केला जातो सिंहासन खाली करो की जनता आती है
ही ती कविता होती आणित्यानंतर रामलीला मैदानामध्ये एक आंदोलन सुरू झाले आणि 25 जून च्या मध्यरात्री इंदिरा गांधी यांनी थेट त्यावेळचे
राष्ट्रपती फक्रुद्दीन आली अहमद यांची भेट घेतली व त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आणीबाणीच्या (emergency)आदेशावर त्यांची स्वाक्षरी घेतली आणि
अशा पद्धतीने देशामध्ये आणीबाणी लागली भल्या पहाटे इंदिरा गांधी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली व आपल्या कॅबिनेट मधील मंत्र्यांना
आणीबाणी विषयी पूर्ण माहिती दिली व 25 जून 1975 ला सकाळी लोक आपल्या आपल्या दिनक्रम मध्ये असताना सकाळी आठच्या बातम्या
ऐकण्यासाठी त्यांनी रेडिओ चालू केला आणि या रेडिओवर बातमीपत्र देणारे नव्हते तर आज देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या जनतेला संबोधित
करत होत्या याप्रसंगी बोलताना इंदिरा गांधी यांनी सांगितलं की देशाचे राष्ट्रपती यांनी देशांमध्ये आणीबाणी (emergency) जाहीर केली आहे यामुळे सामान्य
माणसाला भीती बाळगण्याची गरज नाही ही आणीबाणी 21 महिने चालेल असे जाहीर केले आणि असं जाहीर करताच देशांमध्ये सगळीकडे
उग्र आंदोलन सुरू झाली
आणीबाणी जाहीर झाली असे सांगितल्याबरोबर रामलीला मैदानामधून जेपी(Jayprakash narayan) व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली तसेच
देशभरामध्ये मुख्य नेतेमंडळीला अटक करण्यास सुरुवात झाली यामध्ये जवळपास 11 लाख लोकांना अटक करण्यात आली
आणीबाणीचे परिणाम (EMERGENCY EFFECTS)
आणीबाणी जाहीर होण्यापूर्वीच 25 जून 1975 च्या मध्यरात्री सर्व वर्तमानपत्रांच्या ऑफिसची लाईट ही बंद करण्यात आली आणि
वर्तमानपत्रां मध्ये कुठलीही बातमी लिहिताना आधी ती पंतप्रधान कार्यालयाला दाखवा लागत होती आणि त्यानंतरच प्रकाशित करता येत होती
तसेच जे विदेशी वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होते त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले
या निर्णयामुळे पत्रकारांच्या लेखणीवर इंदिरा गांधी यांनी लगाम लावली
आणीबाणी लावल्यानंतर संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार हे गोठविण्यात येतात विचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य हे गोठविले जातात
यामुळे संपूर्ण देशामध्ये सगळीकडेच हाहाकार माजला
याच काळामध्ये लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नसबंदीचा निर्णय घेतला गेला आणि 16 ते 70 वर्षापर्यंतच्या पुरुषांची नसबंदी केली गेली
यामध्ये 60 लाख लोकांची नसबंदी केली गेली
महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची धरपकड झाली
शेवटीला 21 मार्च 1977 ला आणीबाणी(emergency)संपली व देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या व या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी व
काँग्रेसचा दारुण पराभव झाला व जनता दलाच्या नेतृत्वाखाली मोरारजी देसाई ही देशाचे पंतप्रधान झाले
एकंदरीत अशा पद्धतीने देशामध्ये आणीबाणी(emergency)लागली व ती संपली पण या आणीबाणी नंतर देशांमध्ये खूप मोठे बदल घडले व एक
नवीन नेतृत्व करणारी फळी या आंदोलनामधून निर्माण झाली. या आंदोलनामधून तयार झालेले नेते हे पुढे देशातील मोठ्या पदावर गेले
यामध्ये प्रामुख्याने अटल बिहारी वाजपेयी मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी जॉर्ज फर्नांडिस नितीश कुमार लालूप्रसाद यादव
राम विलास पासवान गोपीनाथराव मुंढे केशवराव धोंडगे अण्णासाहेब गव्हाणे यासारखे मोठमोठे नेते या आंदोलनामुळे देश स्तरावर
ओळखले गेले तसेच या आंदोलनामध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विरोधी पक्ष व संपूर्ण देश एका जागी
आलेला पाहायला मिळाला आजही त्यावेळच्या विरोधी पक्षातील लोक हे आणीबाणी(emergency)कशी आमच्यावर लादली गेली याचा उल्लेख वारंवार
करतात तर काँग्रेस पक्ष आणीबाणी लावण्याची गरज काय होती याविषयी स्पष्टीकरण देत असतात
मराठवाड्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे येते स्वातंत्रता सेनानी डॉक्टर भाई केशवराव धोंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिसा कायदा अंतर्गत
अटक करण्यात आली या अटक केल्यानंतर तेथील जेल प्रशासनाने केशवराव धोंडगे यांना सांगितले की आपण जर माफीनामा लिहून दिला
तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ त्यावेळेला भाई धोंडगे यांनी सांगितले ते आम्ही मरण पत्करू पण आम्ही माफी मागणार नाही यानंतर
केशवराव धोंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांना 14 महिने कारावा सहन करावा लागला पण त्यांनी माफी मागितली नाही तसेच कंधार
तालुक्यामधून पंढरीनाथ कौशल्य व पंढरीनाथ वंजे या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी आणीबाणीच्या
विरुद्ध घोषणा दिल्या जेव्हा की हे दोघेही मुके होते ज्या वेळेला न्यायालयात त्यांना उभ केले गेले तेव्हा न्यायालयाच्या लक्षात ही गोष्ट आली व
त्यांनी त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले
आणीबाणी(emergency)लावून इंदिरा गांधी यांनी चांगलं केलं की वाईट केलं याविषयी आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा