आज 23 मार्च याच दिवशी भारताचे क्रांतिकारक शहीद भगतसिंगजी राजगुरूजी व सुखदेवजी
यांना ब्रिटिश सरकारने फासावर लटकवले होते आणि इथूनच देशांमध्ये एका नवीन क्रांती सुरुवात
झाली फासावर लटकताना इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम अशा घोषणा देत हसत हसत फासावर चढले
पण ब्रिटिश सरकारने या तिघांना 24 मार्च 1931 ला फाशी देण्याचा आदेश दिला होता पण त्यांना 23 मार्च 1931
रोजी त्यांना फासावर लटकवण्यात आले यामागचे कारण काय आहे शहीद भगतसिंग यांना जशी फाशीची शिक्षा
सुनावली गेली तसं देशांमध्ये क्रांतीचे वातावरण तयार झाले व ब्रिटिश सरकारला भीती होती की जर याचे रूपांतर
बंडा मध्ये झाले तर आपल्याला सावरण कठीण जाईल लोकांचा उद्रेक होईल या भीतीने 24 मार्च च्या जागी 23 मार्चला
या तिघांना फासावर लटकविण्यात आले पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार हा लाहोर जेलमध्ये करण्यात येणार होता
पण अंतिम संस्कार करताना दिसणारा धूर हा क्रांतीकारांमध्ये एक नवी आग उत्पन्न करेल म्हणून लाहोर जेलचे भिंती तोडून त्यांना
नदीकिनारी नेऊन त्यांच्यावर अंतिम संस्कार केला गेला व अर्ध जळालेल्या शरीर तसंच वाहत्या पाण्यात फेकून दिलं यासंदर्भात
मनमथ गुप्ता यांच्या पुस्तकात याचा संदर्भात आढळतो ब्रिटिश सैनिक गेल्यानंतर येथील गावकऱ्यांनी परत एकदा त्यांचा
अंतिम संस्कार केला तर तिघेही फासावर जाताना त्यांनी स्वतः वासाचा दोर हा गळ्यात अडकवला होता खरोखरच प्रत्येक
भारतीय व्यक्तीला या शहीद भगतसिंग जी सुखदेव जी व राजगुरूजी या तिघांबद्दल अभिमान आहे