आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवाला अनेक असाध्य असे रोग होताना
आपण पाहत आहोत.शरीरावर झालेल्या केमिकलचा अति वापरामुळे झालेले परिणाम यामुळे
सध्यासगळेच त्रस्त आहेत उतरत्या वयामध्ये शरीरामध्ये अनेक व्याधी घर करू लागतात आणि आपण जर
या व्याधींचा उपचार करायला गेलो तर ऍलोपॅथी मध्ये सदरील व्याधीचे लक्षणं ही फक्त कमी करण्याची
औषधे आहेत पण त्या व्याधीचा जर समूळ नाश करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही,
आयुर्वेद ही हजारो वर्षांपूर्वीची नैसर्गिक उपचार पद्धती आहे. आपल्याला होणाऱ्या व्याधींवर निसर्गानचे जसे त्रिदोष सिद्धांत,
सप्तधातु सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत इ.नुसार औषध करण्यात आलेली आहेत, किचकट ,असाध्य व्याधींमध्ये त्या
व्याधींना समूळ नाश करण्याची ताकद ही आयुर्वेदात आहे म्हणूनच संपूर्ण जगातील जनता ही आयुर्वेदाच्या उपचार
पद्धतीकडे जायला लागली आहे,
आपण जर असाध्य अशा रोगांचा विचार केला तर हृदयरोग, कॅन्सर, दमा,टीबी यासारख्या रोगांवर आयुर्वेद अत्यंत
चांगल्या पद्धतीने काम करून या रोगांचा समूळ नाश करू शकते.
आयुर्वेदामध्ये मुख्यता: चिकित्सा करताना तीन दोषांचा उल्लेख आहे,वात, पित्त व कफ हे तीन दोष आहेत.
या दोषांचा जर प्रकोप मानवाच्या शरीरात झाला तर व्याधी निर्माण होतात आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये या
त्रिदोषांना संतुलित ठेवण्याचे काम आयुर्वेदामध्ये केले जाते,
सध्या आपण पाहायला गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गुडघेदुखीच्या त्रास असलेली व्यक्तींची संख्या ही जास्त आहे
अगदी 40 वर्षापासूनच गुडघेदुखीच्या त्रास हा सुरू होतो, यामध्ये गुडघ्यामध्ये असह्य अशा वेदना होतात पण नेमकं
गुडघेदुखी होती का? व आयुर्वेदामध्ये त्याची उपचार पद्धती कुठली आहे त्याविषयी नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा
रुग्णालयातील डॉ. आयुर्वेदाचार्य दिनेश राठोड यांनी दिलेली माहिती,
आयुर्वेदामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुखण्याला शूल असे म्हटले जाते शुल म्हणजे वेदना शुल म्हणजे वात दोष
गुडघेदुखीचा त्रास झाला म्हणजे आयुर्वेदा नुसार वाताचाही प्रकोप आलाच, वातदोष म्हणजेच वायुदोष आणि या
संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये नानात्मक आणि एकात्मक दोन प्रकार आहेत. स्त्रोतोवरोध वात आणि धातूक्षय वात.
रस रक्त मांस मेद अस्थी मजा शुक्र सप्तधातूंचा अवरोध हा सप्तधातू शरीरामध्ये व्यवस्थित पुरवठा होत नाहीत
म्हणजे कसं ते आपण समजून घेऊया समजा एक नदी वाहते है आणि त्याला धरण बांधून जर त्या नदीच्या प्रवाहामध्ये
अवरोध तयार केला तर त्या ठिकाणी पाणी साचायला चालू होते तसेच माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा घडतं या सप्तधातू
पैकी कोणत्याही धातूला जर समजा अवरोध झाला तर तो शरीरात साचायला लागतो आणि याचेच रूपांतर व्याधीमध्ये व्हायला लागते
धातूक्षय वात ,:
धकाधकीच्या जीवनामध्ये धातुक्षशय वाताचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याची लक्षणे म्हणजे कमी वयामध्ये
गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास होणे असह्य वेदना होणे हा धातू क्षय व्याधी असू शकते धातूक्षय वात जर आपल्या समजून
घ्यायचा असेल तर आपल्या शरीरामधील सप्तधातू हे मजबूत राहत नाहीत ते कमजोर होतात उदाहरणात एखाद्याच्या
शरीरामध्ये रक्त कमजोर व्हायला लागते एखाद्याच्या शरीरामध्ये मास कमजोर व्हायला लागते, आणि याने 80 प्रकारच्या व्याधी
होऊ शकतात आणि त्यामध्ये एक व्याधी म्हणजे सांधेदुखी आता तुमच्या लक्षात आले असेल की नेमके सांधेदुखी होते कशामुळे
आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप झाला तर सांधेदुखीचा त्रास हा आपल्याला होतो
आयुर्वेदामध्ये सांधेदुखी या दोन्हीपैकी कोणत्या दोषांचे झाले.
सांधेदुखीसाठी आयुर्वेदात उपचार पद्धती:
जेव्हा एखादा रुग्ण सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त होऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा नेमकं त्याची नेमकी कुठली प्रकृती आहे वात
पित्त की कफ सगळ्यात आधी आयुर्वेदिक डॉक्टर हे पाहतात जर रुग्ण हा वातप्रकृतीचा असेल तर त्याला सांधेदुखीचा
त्रास जास्त होतो आणि जर रुग्ण पित्त प्रकृतीचा असेल तर त्याच्या अस्थी कमजोर हयायला लागते, अस्थिधातूचा क्षय व्हायला
लागतो जर रुग्णाचे प्रकृतीही कफ असेल तर त्या रुग्णांमध्ये वजन वाढीचा परिणाम होतो. त्याच्या शरीरावर दिसायला लागतो
आणि वाढलेल्या वजनामुळे त्यांच्या गुडघ्यावर भार पडून गुडघ्याच्या चकत्या झिजन्यास सुरू होतात आणि गुडघेदुखीचा त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो,यामध्ये मुख्यतः रुग्णाचे वजन कमी करणे व त्याला होणाऱ्या त्रासापासून वेदनेपासून मुक्ती देणे काही औषध उपचार करावा लागतो
क्षयामध्ये, पित्त प्रकृती आहे त्यांना उपचार करताना त्यांचे वजन वाढवावे लागते,अस्थि मधील कमजोरी सुद्धा दूर करावी लागते
तरच सांधेदुखीचा त्रासापासून मुक्ती मिळू शकते.
सांधे दुखी होऊ नये म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे,
उतरत्या वयामध्ये सांधेदुखी होऊच नये म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे.
चरक संहितेमध्ये पहिलाच अध्याय हा रसायन आहे यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की उतरत्या वयामध्ये धातुक्षयाने व्याधीचे
प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले जाते उदाहरणास सांगायचं तर चाळीशीच्या नंतर हे प्रमाण अधिक वाढते वयोमानानुसार
प्रत्येक धातू हा हळूहळू क्षीण व्हायला लागतो रुग्णाला स्वतःला असे जाणवायला लागते की आपली रोगप्रतिकारशक्ती
ही अत्यंत कमी होत चाललेली आहे मला पूर्वीसारखे काम होत नाही मला थोडे काम केले की थकवा जाणवायला लागतो
अशा पद्धतीची जाणीव ही उतरत्या वयामध्ये प्रत्येकाला आपोआप व्हायला लागते,
आयुर्वेदामध्ये रसायन या अध्यायामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की उतरत्या वयामध्ये अशा पद्धतीने शरीरामध्ये बदल होणे
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण जर आपल्याला आपले धातू मजबूत ठेवायचे असतील तर आयुर्वेदाच्या रसायन
अध्यायामध्ये काही औषधींचा उल्लेख केला आहे अश्वगंधा, गुळवेल ,शतावरी,कुटकी, पिंपळी, पिंपळी रसायन आचार्
रसायन, औषधींचा उल्लेख आढळतो पण यासाठी आपणास वैद्याचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण की समोरील रुग्णाची
प्रकृती वातज आहे की पित्तज आहे की कफज आहे हे ओळखूनच वेगवेगळ्या प्रकारचे औषधींचा उपयोग करावा लागतो.
सांधेदुखीच्या आजारामध्ये, धातू क्षय होणे यासाठी वैद्याचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे नैसर्गिक पद्धतीनत कॅल्शियम
चे स्तोत्र आहेत यामुळे तुमचा असती धातू बरा होतो .यामध्ये मुख्यतः कवडीचे भस्म ,कपरदीक भस्म, शंख भस्म अशा
पद्धतीच आयुर्वेदात उपचारआहे,ज्यामुळे तुमच्या शरीरामधील अस्थी मजबूत होतील कारण वरील दोन भस्मांमध्ये मोठ्या
प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण आहे थोडक्यात सांगायचे तर आपल्या शरीरामधील कॅल्शियमची कमतरतेची पूर्तता या
दोन भस्मांनी होऊ शकते पण आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच आपण हा औषधोपचार करावा,अस्थि व मज्जा
याच्या मजबुतीसाठी हाडजोडी ही औषधी सुद्धा वापरता येईल, तसेच वरील सर्व व्याधींमध्ये जर पंचकर्म करून घेतले तर
अत्यंत उपयोगी सिद्ध होते, वरील उपचार पद्धतीचा अवलंब करून आपल्या गुडघेदुखी संधिवातामधून मुक्ती मिळवता येते
पण यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपण दुकानात जाऊन कुठलीही मनानं औषधि घेणं
हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते तरी वरील कुठलाही औषधोपचार घेताना डॉक्टरांचा सल्ला हा आपण जरूर
घ्यावा व गुडघेदुखी व सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवावी हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
महत्वाची सूचना वरील लेख हा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी आहे आम्ही कुठल्याही प्रकारचे औषध वापरा असे सांगत
नाहीत वरील औषधे हे आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरावे हा लेख हा माहितीस्तव आहे माहिती डॉक्टर अधिक
माहितीसाठी संपर्क डॉ दिनेश रा राठोड
राजाश्रय आयुर्वेद रुग्णालय पंचकर्म सेंटर लोहा.