डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर इतर देशातील लोकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवायचे जाहीर केले आणि यामध्येच भारताचे जी नागरिक अमेरिकेत बेकायदेशीर राहत होते त्यांना भारतात वापस पाठवलं पण ही पाठवायची पद्धत ही अत्यंत क्रूर होती एखाद्या गुन्हेगाराला पाठवावं तसं त्यांच्या हातामध्ये हातकड्या टाकून व पायामध्ये बेड्या टाकून त्यांना लष्करी विमानाच्या साह्याने भारतात पाठवले

अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत मायदेशी पाठवताना अमेरिकेने व ट्रम्प प्रशासनाने अत्यंत क्रूर अशी वागणूक भारतीयांना दिली आहे हे भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा ते एवढ्या वर्षापासून अमेरिकेत वास्तव्यास होते आणि त्यांना एखाद्या गुन्हेगारा प्रमाणे हातपाय बांधून त्यांना भारतामध्ये पाठवले ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे
नेमकं हे प्रकरण काय आहे ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक घोषणा केल्या आणि या घोषणांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती आम्ही अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या सर्व इतर देशातील नागरिकांना आम्ही त्यांच्या देशात वापस पाठवणार हा निर्णय जाहीर केल्यानंतर जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचे पुढे काय होणार याविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले आणि ठरल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेमधील 105 भारतीयांना शोधून त्यांना भारतामध्ये वापस पाठविण्याचा निर्णय घेतला यामध्ये महत्त्वाची मुद्दा म्हणजे त्यांनी तेथे कमवलेले पैसे संपत्ती याच्यावर कुठल्याही प्रकारचा दावा ह्या भारतीयांना करता आलेला नाही खरं पाहायला गेलं तर अशा पद्धतीने कुठल्याही देशात बेकायदेशीर राहणं हे चुकीचच पण त्यानंतर अमेरिकेकडून क्रूर पणाचा अगदी कळसच गाठला कारण त्यांनी हातामध्ये हातकड्या व पायामध्ये बेड्या टाकून एका लष्करी विमानामध्ये बसवून या भारतीयांना मायदेशी परत पाठवले विशेष म्हणजे त्या विमानामध्ये फक्त एकच टॉयलेट होती आणि विमानामध्ये प्रवाशांची संख्या ही 105 होती खरं पाहिला गेलं तर प्रवासी विमानांमधून सुद्धा ते भारतीयांना मायदेशी पाठवू शकले असते पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अत्यंत विचित्र निर्णय घेत त्यांना आणि लष्कराचे असलेले C17या विमानामध्ये अक्षरशा त्यांना गुराढोरा प्रमाणे कोंबुन भारतामध्ये पाठवले
हे हि वाचा–डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला का बोलवलं नाही ?
भारतीयांमध्ये संतापाची लाट
अमेरिकेने घेतलेल्या या भूमिकेचे पडसाद आज लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पाहायला मिळाले तसेच भारतीयांमध्ये सुद्धा या घटनेमुळे अमेरिकेबद्दल तीव्र नाराजी तयार झाली आहे अशा पद्धतीने भारतीयांचा केलेला अपमान भारतीयांना सहन झालेला नाहीये सोशल मीडियावर काही फोटो हे काही व्हिडिओ येत होते ज्यामध्ये हात व पाय बांधलेले भारतीय पोलीस आणि मिलिटरी च्या सिक्युरिटी मध्ये विमानात बसताना दिसत होते तसे दुसऱ्या फोटोमध्ये काही भारतीयांचे हात हे मागच्या बाजूला बांधण्याची ही फोटो व्हायरल झाले हे पाहून भारताच्या विदेश मंत्रालया बाबतीत नाराजीची भूमिका ही देशांच्या नागरिकाच्या मनात आली. जर अशा पद्धतीने भारतीयांना अमेरिकेत पकडले गेले होते तर मग त्यांना आणण्यासाठी भारताने विमान का पाठवले नाही किंवा अमेरिकेने तशा पद्धतीच्या सूचना भारताला का केल्या नाही कालच लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशामध्ये भारताची वाढलेली ताकद ही काही लोकांना लक्षात येत नाही असे विधान केले होते आज काँग्रेस नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले
डोनाल्ड ट्रम्प असं का वागत आहेत

बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना अमेरिकेने काल वापस पाठवले पण हे वापस पाठवत असताना मिलिटरी चे विमान का वापरले कारण जर आपण प्रवासी विमानांचा जर विचार केला तर त्यामध्ये अमेरिकेतून भारतामध्ये पाठवण्यासाठी 853 डॉलर एवढा प्रतिव्यक्ती खर्च आला असता पण अमेरिकेने स्वतःच्या लष्कराचे विमान पाठवून हेच भारतीय भारतामध्ये पाठविण्यासाठी प्रतिव्यक्ती केलेला खर्च हा 4600 डॉलर एवढा जास्त खर्च म्हणजे प्रवासी विमानापेक्षा लष्करी विमानाने अमेरिकेने प्रति व्यक्ती पाच पट एवढा जास्त खर्च केलेला आहे यामध्ये आपण बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना आपण किती कठोर निर्णय घेतो हे कदाचित दाखवायचे असेल कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी जे इतर देशातील लोक हे बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहतात त्यांना कधी आतंकवादी तर कधी एलियन्स देखील म्हटला आहे
हे हि वाचा–KAILAS MANSAROVAR YATRA कैलासा मानसरोवर यात्रेला भारत व चीन या देशांची सहमती
कोलंबिया देशाने घेतली वेगळी भूमिका
अमेरिकेमध्ये राहणारे बेकायदेशीर कोलंबिया नागरिकांना देखील अमेरिकेने अशाच पद्धतीने लष्कर विमानात बसून कोलंबियाला पाठवले पण कोलंबिया मधील सरकारने हे विमान कोलंबियात उतरू न देण्याचा निर्णय घेतला व त्यांना परवानगी दिली नाही कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष बेट्रो यांनी अमेरिकेला खडसावलं की आमच्या देशाच्या नागरिकांना अशा पद्धतीने वागणूक देऊ नका त्यांना प्रवासी विमानात बसूनच कोलंबियाला पाठवा किंवा आम्ही विमान पाठवतो व तसेच कोलंबीयाने विशेष विमान हे अमेरिकेला पाठवली व आपल्या नागरिकांना देशात आणलं कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष बेट्रो यांच्या या भूमिकेमुळे संतापले व त्यांनी तेथील अधिकाऱ्यांचा विजा रद्द केला व प्रवास बंदी देखील घातली व तसेच कोलंबिया वर अमेरिकेने 25 च्या ऐवजी पन्नास टक्के शुल्क आकारृत याला सुद्धा कोलंबीयाने जशास तसे उत्तर दिले व अमेरिकेवर आम्ही सुद्धा 25% शुल्क लावू असे जाहीर केले
भारतीयांना घेऊन विमान अमृतसर मध्ये उतरले
बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकेचे विमान अमृतसर मधील विमानतळावर उतरले एक मेडिकल टीम पाठवून त्या सर्वांची तपासणी करण्यात आली पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आलेल्या भारतीय नागरिकांशी चर्चा केली यामध्ये 104 भारतीय होते यामध्ये पुरुषांची संख्या 79तर महिलांची संख्या ही 25 व युवकांची संख्या 92 तर लहान मुलांची संख्या ही 12 एवढी होती
या 104 भारतीय मध्ये कोणत्या राज्यातून किती लोक होते ते पाहूया गुजरात 33 हरियाणा 33 आणि पंजाब राज्यातील 30 व चंदिगड 2 उत्तर प्रदेश 2 महाराष्ट्र मधील 3 भारतीयांचा समावेश होता अमेरिकी मधून आलेले हे विमान सरळ अमृतसर विमानतळावर उतरले यावरून देखील विरोधकांनी सरकारवर टीका करायला चालू केले या विमानामध्ये सर्वात जास्त प्रवासी हे गुजरात मध्ये होते तर हे विमान गुजरात मध्ये का उतरून नाही असाही प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला
हे हि वाचा–MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
काही दिवसापूर्वी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे अमेरिकेत गेले असताना तेथील परराष्ट्र मंत्र्याशी त्यांची चर्चा झाली व जे बेकायदेशीर राहणारे भारतीय अमेरिकेतून वापस जाण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली याप्रसंगी बोलताना एस जयशंकर यांनी आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन देखील केले होते व त्या बाबतीत आपण लवकरात लवकर पावलं उचलत असेही सांगितले होते एवढे सांगून देखील अमेरिकेने स्वतःची मनमानी चालूच ठेवली आणि अशा पद्धतीने भारतीयांचा अपमान केला आता नेमकं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलंबिया प्रमाणेच अमेरिकेला झालेल्या घटनेबाबतीत ठणकावून सांगतात का ते पाहावं लागेल चर्चा होऊन देखील अमेरिकेने हे उचललेले पाऊल नक्कीच निषेध करण्यासारखे आहे याबाबतीत जागतिक स्तरावर चर्चा होणे जरुरी आहे आता जे उर्वरित भारतीय बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहतात त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी आता तरी केंद्र सरकार काही हालचाली करतात काय ते आता पहाव लागेल पण निश्चित अमेरिकेने केलेला हा प्रकार निंदनीय आहे एखाद्या देशामध्ये बेकायदेशीर राहणे हे खरोखर चुकीचे आहे पण त्यांना मायदेशी पाठवताना अमेरिकेने वापरलेली ही पद्धत बरोबर नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तरी आपल्या देशाने ठोस पावलं उचलावीत आणि आपल्या नागरिकांना अमेरिकेमधून भारतामध्ये वापस घेऊन यावे
तसेच अमेरिकेने उचललेल्या या पावलावरून भारतामध्ये करून आलेल्या बांगलादेशी पाकिस्तानी व रोहिंग्या यांच्याविरुद्ध असं एखादं कठोर पाऊल उचलणं ही काळाची गरज आहे आपल्या देशाने देखील अशाच पद्धतीचे पाऊल उचलून बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या अ भारतीय ना देशाच्या बाहेर पाठवावे