पालम (अवधूत जाधव)-परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज हटकर समाज आहे
त्यामुळेच महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून महायुती तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला
सध्या प्रचाराला वेग आला असताना विद्यमान खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांनी चाटोरी येथे प्रचार
बोलताना महादेव जानकर यांचा चांगला समाचार घेतला याप्रसंगी बोलताना खासदार जाधव म्हणाले स्वतःला
धनगर समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्यांना केंद्रात व राज्य दोन्ही ठिकाणी सत्ता असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा
का निकाली काढता आला नाही का धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही असा सवाल खासदार जाधव यांनी
महादेव जानकर यांना विचारला आहे
नाराज आहे नाराज आहे असं म्हणत माढा लोकसभा मतदारसंघ मधून शरद पवार यांना भेटून उमेदवारी दाखल
करण्याचा निर्णय फायनल केला व एकाच रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याबरोबर दुसऱ्या दिवशी
परभणी लोकसभा मतदारसंघाचे आठवण का झाली यालाच तुमची एकनिष्ठता म्हणतात का असा सवाल जाधव यांनी केला
आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांमध्ये वेग पकडला आहे पहाव लागेल की जनता कोणाच्या बाजूने कौल देते