महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या शब्दाला सर्वात जास्त महत्त्व होतं त्यांनी जर बोट वर केलं तर अख्खा महाराष्ट्र बंद व्हायचा सिनेमातील नट-नटी
असो की राजकारणातली कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो प्रत्येक जण त्यांना मान देत असंत ते होते हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
आपल्या लेखणीतून भाषणातून आणि व्यंगचित्रातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दाखविण्याचे काम बाळासाहेबांनी केले सामान्यातला सामान्य
शिवसैनिक हा उच्च पदावर नेण्याचा करिष्मा बाळासाहेबांनी केला अनेक जण या प्रवासामध्ये त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले पण बाळासाहेबांच्या
जिव्हारी लागलेली गोष्ट म्हणजे त्यांचे पुतणे ज्यांच्यावर ते सर्वात जास्त प्रेम करत होते ते राज साहेब ठाकरे तारीख होती 9 मार्च 2006 या दिवशी
राज ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला याप्रसंगी बोलताना राज ठाकरे म्हणाले की माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे
पुढे राज ठाकरे यांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून आले तेव्हा
पक्षाला मोठी खिंडार पडेल असे सर्वांना वाटत होते पण राज ठाकरे यांनी कुठल्याही आमदाराला खासदाराला आपल्याबरोबर न घेता स्वतःच्या
हिमतीवर पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला बाळा नांदगावकर सोडले तर दुसरा कुठलाही मोठा नेता राज ठाकरे यांच्याबरोबर आला नाही
राज ठाकरे यांचा पहिला दौरा महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांच्या मनामध्ये धडकी भरणार होता कारण या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांना
प्रचंड समर्थन मिळाले मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते स्वतः उचलल्या चालू केले यामध्ये परराज्यातील
व्यक्ती अमिताभ बच्चन भूमिपुत्रांना नोकरी अशा अनेक आंदोलनामध्ये राज ठाकरे चर्चित राहू लागले मुंबईमध्ये सुद्धा वरील मुद्द्यांमुळे राज ठाकरे यांचा
प्रभाव वाढत होता यानंतर आली ती विधानसभेची निवडणूक ही राज ठाकरे यांची पहिली निवडणूक यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले
व तेरा आमदार निवडून आले राजकारणामध्ये नव्या व्यक्तीवर जनता ही लवकर विश्वास टाकते कारण त्या राजकारण्याविषयी त्यांना जास्ती काही माहिती नसते
एकदा पाहू असं म्हणत जनता मतदान करते पण जर ते राजकारणी नेते हे जनतेच्या विश्वासास पात्र झाले नाही तर त्या पक्षाला परत मतदान करत नाहीत हा
आतापर्यंतचा इतिहास आहे राज ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं राज ठाकरे यांना स्वतःचे आमदार ही सांभाळता आले नाही रमेश वांजोळे यांच्या अकाली
निधनामुळे एक आमदार कमी झाला व राम कदम प्रवीण दरेकर यासारखे आमदार भाजपात गेले दुसऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा फक्त एक आमदार
निवडून आला एक हाती सत्ता द्या असं म्हणणारे राज ठाकरे यांना जनतेने नाकारलं व त्यांच्या एकाच आमदाराला विजयी केले यानंतर आलेल्या लोकसभेच्या पहिल्या
निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर कौतुक केले व नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले
तर माझा व माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील असे राज ठाकरे यांनी जाहीर केले व त्यानंतर राज ठाकरे हे गुजरात दौऱ्यावर सुद्धा गेले नरेंद्र मोदी हे भारताचे
पंतप्रधान झाले पण 2019 च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपाच्या व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जात त्यांना चांगलाच विरोध केला व महाविकास आघाडीने
राज ठाकरे यांना हातोहात उचलले व सबंध महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी त्यांना सभा घ्यायला सांगितले त्याकाळी
राज ठाकरे यांचे एक वाक्य फार गाजले होते लावारे तो व्हिडिओ असे म्हणत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आश्वासनाची ओळख केली व त्यांच्या
कार्यपद्धतीवर कडाडून टीकाही केली पण या टिकेचा फारसा उपयोग झाला नाही कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाले व राज ठाकरे
चांगलेच बॅक फुटला गेले यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राज ठाकरे हे निर्णय स्थितीमध्ये पोहोचू शकले नाही तेथील निवडून आलेल्या
नगरसेविकांनी देखील राज ठाकरे यांची साथ सोडली एक हाती आलेली नाशिक महानगरपालिका ही दुसऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या हातून व गेली
सुरुवातीला आपण कुठल्याही धर्माविषयी बोलणार नाही असं म्हणणारे राज ठाकरे आज रोजी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेत आहेत शिवसेनेच्या फुटी नंतर
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज ठाकरे यांची बऱ्याच वेळेस भेट घेतली व आता लोकसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांना महायुतीत येण्याचा प्रस्ताव देखील
दिला व नवी दिल्ली येथे राज ठाकरे व गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली व मनसे दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार अशा चर्चा प्रसार माध्यमांमध्ये
येऊ लागल्या पण दसऱ्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी आपण व आपला पक्ष मनसे भारतीय जनता पार्टी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत असं राज ठाकरे
यांनी सांगितलं राम मंदिर मध्ये प्रभू रामचंद्राची झालेली प्राणप्रतिष्ठा ही नरेंद्र मोदी नसले तर होऊ शकली नसती असे विधानही राज ठाकरे यांनी केले एकंदरीत
वारंवार आपले विचार आपली कार्यपद्धती व एकाच मुद्द्याला चिटकून राहणे यामुळे राज ठाकरे यांना फारसे यश आलेले दिसते नाही
लोकसभा निवडणुकीमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीचे व मनसेचे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले राज ठाकरे यांच्या भाषणाला कमालीची
गर्दी होते पण या गर्दीचे रूपांतर हे मतपेटीत होताना दिसत नाही कारण मनसे कधीही विकत लोक आणून सभेला बसत नाही बदलणाऱ्या भूमिकेमुळे राज ठाकरे
यांचा ग्राफ खाली आला व बिनधास्त वक्तव्य ते बिनशर्त पाठिंबा असा राज साहेब ठाकरे यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे
बिनधास्त ते बिनशर्त राज ठाकरे यांचा ग्राफ का उतरला
राज ठाकरे आपली भूमिका वारंवार का बदलतात
Add A Comment