हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांना फार महत्व या साडेतीन मुहूर्तापैकी कुठल्याही मुहूर्ताला जर
आपण एखादे कार्य सुरू केले तर येतेस त्यामुळे या साडेतीन मुहूर्तांना खूप महत्त्व आहे
यामध्ये दसरा दिवाळी पाडवा गुढीपाडवा व अक्षय तृतीया या सर्व मुहूर्तांचे खूप महत्त्व आहे
आज 10 मे 2019 म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि आपण सर्वजण अक्षय तृतीयाला थोडं किंवा अधिक
प्रमाणामध्ये सोने विकत घेतोत पण हे सोनं विकत घेत असताना या अक्षय तृतीयाला का सोनं घेतलं पाहिजे
याचं काय महत्त्व आहे याविषयी आपल्याला आज मी माहिती देणार आहे
अक्षय तृतीया का साजरी करतात (Why celebrate Akshaya Tritiya?)
आपण जर पुरातन काळातील गोष्टींचा अभ्यास केला तर अक्षय तृतीयेचा दिवस पवित्र का समजला जातो हे
आधी समजून घ्यायला हवं कारण हिंदू धर्माप्रमाणे अन्य काही धर्मांमध्ये सुद्धा या दिवसाला फार महत्त्व आहे
पौराणिक गतीप्रमाणे याच दिवशी भगवान विष्णूचे अवतार भगवान परशुरामांचा जन्म झाला होता व
स्वर्गलोकांतून गंगा नदी ही या दिवशी पृथ्वीतलावर आली होती तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी महर्षी वेदवासांचाही
जन्म झाला होता भगवान परशुरामाच्या जन्माप्रमाणेच याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा विवाह याच
दिवशी संपन्न झाला होता अशी आख्यायिका आहे गंगा नदीच्या संदर्भामध्ये भगवान भगीरथ यांनी घोर तपश्चर्या
करून गंगा नदी पृथ्वी तलावर आणली होती त्यामुळे सुद्धा या दिवशी गंगा स्नान करणे हे अत्यंत शुभदायी मानले जाते
अक्षय तृतीयेच्या दिवशीगंगा नदीचे स्नान करणे अत्यंत शुभदायी मानले जाते किंवा कुठल्याही नदीचे स्नान करणे
शुभदायी मानले जाते भगवान विष्णू व महालक्ष्मी मातेची पूजा करणे सुद्धा शुभ मानले जाते या दिवशी पिंपळ तुळस
यांची पूजा करणे सुद्धा शुभ फलदायी असते या दिवशी पूजा केल्यामुळे अक्षय म्हणजेच निरंतर भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर राहते
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने का खरेदी करतात (Why buy gold on Akshaya Tritiya?)
हिंदू धर्माच्या मान्यतेप्रमाणे अक्षय तृतीया ज्याप्रमाणे एखादे काम सुरू करण्यासाठी शुभ प्रभात मानली जाते
तसेच या दिवशी केलेली खरेदी ही आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव घेऊन येते जर या दिवशी सोने खरेदी केले तर
अक्षय म्हणजेच निरंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते श्रीमंती नांदते यामुळे तसे पाहायला गेले तर साडेतीन
मुहूर्ताला प्रत्येक मुहूर्ताला कोणीही खरेदी करावे पण अक्षय तृतीया ला सोने खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये
निरंतर पैशाचा ओघ चालू होतो तसेच या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला आहे यामुळे सुद्धा आपण या
दिवशी सोने घ्यायलाच पाहिजे
तसेच अक्षय तृतीया ला दानाची सुद्धा खूप मोठे महत्त्व आहे या दिवशी आपल्याला शक्य असेल ते दान करायला पाहिजे
तर त्याचे फळ हे आपल्याला निरंतर मिळत राहते मुख्यतः या दिवशी सोने तांबे चांदी याचप्रमाणे धान्य दान व अन्नदान केले
तरी ते खूप फलदायी मानले जाते
तसेच एखाद्या गरजू वेक्तीला आपण या दिवशी आवर्जून दान दिले पाहिजे
हा शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी खरेदी करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी सोन्या
सोबत वाहन कपडे दाग दागिने जमीन इत्यादी गोष्टी घेतल्यास आपल्या घरामध्ये सुख शांती आणि धनवैभव येते
शीख धर्मामध्ये अक्षय तृतीयाचे महत्त्व (Significance of Akshaya Tritiya )
याच दिवशी शिखांचे सहावे गुरु हरगोबिंदसिंह यांचा जन्म अक्षय तृतीयाला झाला होता त्यामुळे शीख धर्मामध्ये सुद्धा अक्षय
तृतीयाला खूप महत्त्व आहे
जैन धर्मामध्ये अक्षय तृतीयाचे महत्त्व (Significance of Akshaya Tritiya in Jainism)
जैन धर्मामध्ये अक्षय तृतीया ला खूप महत्त्व आहे कारण जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभ देव यांचा जन्म अक्षय तृतीयेचाच आहे
तसेच जैन धर्माचे 24 वे तीर्थकर भगवान महावीर यांना ज्ञान प्राप्ती याच दिवशी झाली होती म्हणून जैन धर्मामध्ये सुद्धा
अक्षय तृतीया ला फार महत्व आहे
तसेच याच दिवशी लिंगायत धर्माची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर यांचा जन्म सुद्धा अक्षय तृतीयाचाच आहे
या दिवशी तीर्थयात्रा करणे खूप शुभ मानले जाते हरिद्वार रामेश्वरम बद्रीनाथ काशी इत्यादी स्थलांची यात्रा केली तर हे फार पुण्याचे असते
Disclaimer सदरील माहिती ही लोकांची आस्था व अख्यायिकेवर आधारित आहे
Add A Comment