लोकसभा निवडणूक (Loksabha election) चे आता दोन टप्पे राहिलेले आहेत व मराठवाड्यातील सर्व जागी निवडणुका ह्या पार पडल्या आहेत
मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहावयास मिळाली व या लढतीमध्ये कोण विजयी होऊ
शकत याविषयी आपण या लेखामध्ये सविस्तर चर्चा करूया यामध्ये आपण परभणी नांदेड आणि हिंगोली या तीन लोकसभा
मतदारसंघाचा आपण सविस्तर विचार करूया
परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency)
परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency) एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जात असे
कारण या लोकसभा मतदारसंघावर
व या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीचा खूप
मोठा प्रभाव पाहावयास मिळत होता सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये परभणी मधून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार
विजयी झाले होते या जिल्ह्यावर शेकापचा मोठा प्रभाव होता मराठवाडा केसरी कैलासवासी अण्णासाहेब गव्हाणे हे याच
मतदारसंघातून येत होते शेषराव देशमुख ज्ञानोबा हरी गायकवाड यासारखे शेकापच्या नेत्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर
आपली पकड मजबूत ठेवली पण पुढे कालांतराने काँग्रेसचा प्रभाव वाढत गेला व हळूहळू शेका पक्षाचा प्रभाव कमी पडत गेला
त्यानंतरच्या काळामध्ये शेकापचा असणारा बालेकिल्ला हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला कारण या
लोकसभा मतदारसंघांमधून शिवसेना ठरवेल तोच व्यक्ती लोकसभेला निवडून येत होता याच्यामागे मुख्य कारण सांगितलं जातं
ते परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये असणारा मुस्लिम मतदार यामुळे शिवसेनेला येथे विजय मिळवणे अत्यंत सोपे जात होतं
सध्याचे विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) उर्फ बंडु जाधव हे पूर्वी आमदार होते व त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली
व दोनदा ते खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेले पण यंदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर जनता नाराज असल्याचे बोलले जात होते
व मध्यंतरी शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर संजय जाधव(Sanjay Jadhav) व परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील या दोघांनीही उद्धव ठाकरे
यांच्यासोबत राहणं पसंत केलं व उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पक्षामधून संजय जाधव यांना उमेदवारी दिलीही लोकसभेची
निवडणूक (Loksabha Election) संजय जाधव(Sanjay Jadhav) यांना जड जाणार होती कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये परभणी
लोकसभा मतदार संघ हा पिंजून काढला व त्यांचा दांडगा जनसंपर्क या लोकसभा मतदारसंघांमध्ये होता स्वतः अजितदादा पवार (ajit Pawar)
यांनी सुद्धा राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांना उमेदवारी देऊ असे संकेत अनेक वेळा दिले होते व ही जागा 2019 च्या निवडणुकीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस कडेच होती त्यामुळे राजेश विटेकर (Rajesh Vitekar)यांना उमेदवारी मिळेल हे वाटू लागले पण शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांनी खेळलेल्या
एका खेळीमुळे परभणी मधला उमेदवार बदलायची वेळ महायुतीवर आली कारण रासपा चे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढा
लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडी तर्फे देण्याचे ठरले व त्याचा फायदा शरद पवार यांना
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार होता कारण बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे
अशी आखणी शरद पवार यांनी केली पण शेवटच्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांनी महादेव जानकर यांची समजूत काढून
त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले कारण रासपाचा एक आमदार परभणी मध्ये आहे
तर परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये हटकर व धनगर या दोन समाजाचे मतदान हे मोठ्या प्रमाणावर आहे व अशा प्रकारे
महादेव जानकर(Mahadev Jankar) यांची एन्ट्री परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये झाली मराठा आरक्षणाचा लढा चालू असताना महादेव जानकर (Mahadev Jankar)
यांनी घेतलेली भूमिका ही मराठा समाजाला पटली नव्हती त्यामुळे या लोकसभा मतदारसंघां मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा
प्रकारचा संघर्ष निर्माण झाला व जास्त प्राबल्य असलेल्या मुस्लिम समाज व मराठा समाज ( Maratha society)या निवडणुकीमध्ये एक झालेला
पाहायला मिळाला व या दोन समाजातील जास्तीत जास्त मतदान हे संजय जाधव म्हणजेच मशालीला झाले मध्यंतरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी दोन-तीनदा महादेव जानकर
हे माझे लहान भाऊ आहेत अशा प्रकारचे उल्लेख केला पण याचा जास्त प्रभाव हा या मतदारसंघावर दिसून आला नाही
एकंदरीत पाहता ही निवडणूक महादेव जानकर हे आयात केलेले उमेदवार आहेत व त्यांची भूमिका ही मराठा समाजाच्या( Maratha society) विरुद्ध आहे
या कारणांमुळे महादेव जानकर यांना ही निवडणूक मनावर तेवढी सोपी गेलेली नाही दुसरीकडे संजय जाधव यांच्यावर नाराज असून
देखील मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा फायदा संजय जाधव यांना होताना दिसत आहे
हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency)
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच या मतदारसंघांमध्ये कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी काँग्रेस कधी शिवसेना अशा प्रकारचा
कल या मतदारसंघांमध्ये पहावयास मिळतो 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला येथून हेमंत पाटील
हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यापूर्वी या मतदार संघामधून शिवाजी माने सुभाष वानखडे यांनी सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले
होते स्वर्गीय राजीव सातव यांनी सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते गेल्या निवडणुकीमध्ये हेमंत पाटील यांनी विजय मिळवला पण
या लोकसभा मतदारसंघां मध्ये सुद्धा अनेक घटना या फार विचित्र घडल्या शिवसेना शिंदे गट यांच्याकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील
यांना परत एकदा उमेदवारी देण्यात आली ते कामालाही लागले पण भारतीय जनता पार्टीया निर्णयावर नाराज होती त्यांनी केलेला सर्वे मध्ये
या जागून हेमंत पाटील निवडून येणार नाहीत असा दावा भाजपाचा गट करायला लागला त्यामुळे ऐनवेळीला या मतदारसंघातील
लोकसभेचा उमेदवार शिवसेना शिंदे गटाला बदलावा लागला यामागसी कारण असे बोलले जाते की भारतीय जनता पार्टीचे
रामदास पाटील सुमठाणकर हे मागील पाच वर्षापासून लोकसभेची तयारी करत आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे व रामदास पाटील
यांचा विजय या मतदारसंघांमध्ये निश्चित मानला जाऊ लागला यामुळे भाजपाने ही जागा आपल्याकडे राहावी म्हणून अतोनात प्रयत्न केले
पण ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेना सुद्धा ही जागा सोडायला तयार नव्हती महायुती मधील घटक पक्ष असल्यामुळे
शिवसेनेने भाजपाचे ऐकत ऐनवेळीला आपला उमेदवार बदलला व बाबुराव कदम (Baburao Kadam) यांना हेमंत पाटील यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली
या निर्णयानंतर हेमंत पाटील प्रचंड नाराज झाले व त्यांनी थेट मुंबई गाठली येथे जाऊन चर्चा केल्यानंतर हेमंत पाटील यांच्या
पत्नी सौ राजश्रीताई पाटील यांना वाशिम व यवतमाळ मतदार संघामधून लोकसभेची उमेदवारी दिली गेली व तेथील विद्यमान खासदार
भावना गवळी यांचा पत्ता कट केला यानंतर हेमंत पाटील हे वाशिम यवतमाळ मतदारसंघांमध्ये प्रचाराला लागले तर दुसरीकडे महाविकास
आघाडीने मात्र आपला कुठलाही निर्णय न बदलता ही जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे होती व त्यांच्याकडेच राहिली व तिथून नागेश पाटील
आष्टीकर (Nagesh patil Ashtiokar) यांना उमेदवारी ठाकरे गटाने खूप आधी जाहीर केली यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांना प्रचारामध्ये
चांगलीच मुसंडी मारता आली
व याच्या विरुद्ध बाजूला शिवसेनेला मात्र अचानक देऊ केलेल्या बाबुराव कदम यांना प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाला व या दोघांमध्ये
लढत होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व ही लढत तिरंगी झाली
पण याही लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या( Maratha society) नाराजीचा सामना हा शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम यांना करावा लागला
व नाराज झालेला मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने उभा राहिला पाहायला मिळाला तर दुसरीकडे
निर्णय असलेला मुस्लिम मतदार संघ हा सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिलेला या मतदारसंघात पाहायला मिळाला तसेच
डॉक्टर बी डी चव्हाण यांचा सुद्धा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळाला पूर्ण गोष्टींचा विचार
केल्या असता ही निवडणूक बाबुराव कदम यांना अवघड गेली आहे तर महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनाही निवडणूक
सोपी गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
नांदेड लोकसभा मतदारसंघ (Nanded Lok Sabha Constituency)
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो कारण नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून
अनेक वेळा काँग्रेसचेच खासदार निवडून आलेले आहेत व या नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देखील
मिळालेले आहेत स्वर्गीय शंकरराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून येतात त्यांनी देशातील अनेक उच्च पदांवरती होते
व ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार अशोकराव चव्हाण (Ashkorao Chavan) हे सुद्धा या मतदारसंघांमधून लोकसभेवर
निवडून गेलेले आहेत अशोकराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आपण जर मागील दोन निवडणुकांचा जर
अभ्यास केला तर आपल्याला असे दिसते की 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचंड मोठी लाट असताना सुद्धा काँग्रेसनी आपला
नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडून आणण्यामध्ये यश आले व अशोकराव चव्हाण हे लोकसभेवर निवडून गेले अशोकराव चव्हाण
यांचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाला पण 2019 च्या निवडणुकीमध्ये मात्र एक धक्केदायक निकाल
महाराष्ट्राने पाहिला 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अशोकराव चव्हाण (Ashkorao Chavan) यांचे सर्वात मोठे असलेले विरोधक
प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhalikar) यांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यावेळी
प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhalikar) हे लोहा विधानसभा मतदारसंघाचे
आमदार होते चिखलीकर विरुद्ध चव्हाण या सामन्यांमध्ये अशोकराव चव्हाण सहज विजयी होतील असे वाटत होते पण नरेंद्र मोदी
यांची झालेली मोठी सभा व प्रताप पाटील यांचा दांडगा जनसंपर्क यामुळे या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर(Prataprao Patil Chikhalikar) यांनी
अशोकराव चव्हाण (Ashkorao Chavan) यांचा धक्केदायक पराभव केला
पण लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अचानक काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण (Ashkorao Chavan) यांनी काँग्रेसला रामराम करत
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व भारतीय जनता पार्टीने देखील त्यांना लगेच राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी दिली
व अशोकराव चव्हाण राज्यसभेवर निवडून गेले त्यामुळे हा मतदारसंघ आता भाजपाचा बालेकिल्ला झाला असे बोलले जाऊ लागले
कारण नांदेड जिल्ह्याच्या व लोकसभेच्या निवडणुकीवर अशोकराव चव्हाण यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो.
राजकीय वर्तुळामध्ये याही चर्चा होऊ लागल्या की यंदाची लोकसभेची निवडणूक ही अशोकराव चव्हाण हेच लढतील पण
भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhalikar) यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली तसेच
अशोकराव चव्हाण (Ashkorao Chavan) यांच्यासोबत नांदेड मधील डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा राज्यसभेवर संधी मिळाली नांदेड
लोकसभा मतदारसंघांमध्ये आता तीन खासदार झाले होते तसेच दोन आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते यामुळे
ही निवडणूक महायुतीला झोपी जाईल असे बोलले जाऊ लागले पण त्याच वेळेला महाविकास आघाडीने वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan)
यांना उमेदवारी दिली व हा सामना एकतर्फी होईल असे वाटत असताना अत्यंत अटीतटीचा हा सामना पहावयाला मिळाला या
मतदारसंघांमध्ये सुद्धा मुस्लिम मतदारांचा प्रभाव हा मोठा आहे व येथे सुद्धा मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने
उभा असलेला दिसला तसेच या नांदेड लोकसभा मतदारसंघावर सुद्धा मराठा आंदोलनाचा परिणाम दिसला नाराज झालेला
मराठा समाज हा काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने तर काही प्रमाणात महायुतीच्या बाजूने उभा दिसला
तरीपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे ते मुस्लिम मतदारांना
आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत असे काहीही चित्र पहावयास मिळाले तसेचओबीसी मतदार हा भाजपाच्या
बाजूने पहावयास मिळाला वंचितचे अविनाश भोसीकर यांना सुद्धा चांगले मत मिळतील असा अंदाज आहे या मतदारसंघांमध्ये लिंगायत
समाज व बंजारा समाज या दोन समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मतदारसंघांमध्ये देविदास राठोड हे बंजारा नेता आहेत
त्यांचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात येथे पाहावयास मिळतो एकंदरीत नांदेड लोकसभा मतदारसंघाची विचार करता ही निवडणूक ही
प्रताप पाटील चिखलीकर यांना काहीशी सोपी गेल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांनाही
निवडणूक थोडी जड गेल्याची दिसत आहे
हे वरील विश्लेषण हे मी स्वतः अभ्यासा अंती पाहिलेले आहे त्यामुळे काहीजणांना हे विश्लेषण आवडेल तर काही जणांना आवडणार
नाही हा एक अंदाज आहे सत्य परिस्थिती आपल्याला चार जूनला कळेल
Recent News
नांदेड परभणी हिंगोली लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार ?
नांदेड परभणी हिंगोली लोकसभा निवडणुकीत कोणाचे पारडे जाड आहे