संपूर्ण महाराष्ट्राला सध्या विधानसभेचे वेध लागले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या
परीने प्रचाराला सुरुवात देखील केली आहे आणि उमेदवार ठरवण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
हालचालीला वेग आला आहे अनेक योजना या सत्ताधारीत फक्त पक्षांकडून जाहीर होत आहेत यामध्ये
सध्या चर्चा असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना
लाडकी बहीण योजनेप्रमाणे स्वतःचे लाडका मुलगा व लाडकी मुलगी यांना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या
राजकारणा सक्रिय करता येईल याविषयी प्रत्येक पक्षातील महत्वाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत
यामध्ये सर्वच पक्षातील नेत्यांचे समावेश आहे भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेला काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा
आरोप करतात पण याला भारतीय जनता पार्टी सुद्धा अपवाद नाही तर आपण आता पाहूया की कुठल्या
पक्षामधून कोणत्या नेत्याची मुले हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत म्हणजे आपल्याला समजेल की प्रत्येक
राजकीय पक्षांमध्येच घराणेशाही आहे जर नेत्यांचीच मुले ही राजकारणात येणार असतील तर बाकी सामान्य
कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायचा?
काँग्रेस मधील बड्या नेत्यांचे मुलं मुली विधानसभेसाठी इच्छुक
(Sons and daughters of big leaders in Congress are interested in the Legislative Assembly)
काँग्रेस पक्षावर हमेशाच घराणेशाहीचा आरोप केला जातो आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा
आपल्याला घराणेशाहीचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही मतदारसंघावर पाहायला मिळणार आहे
1)माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा कुणाला राऊत हा सध्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये
कामाला लागले आहेत व ते सध्या युवक काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत व युवक काँग्रेस मधूनच ते आपल्या
विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत
2)दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघामधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे
विशाल मुत्तेमवार(Vishal Muttemwar) हेदेखील राजकारणामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत व त्यांनी त्या
पद्धतीने दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघामधून तयारी चालू केली आहे व या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे
उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत
3)सावनेर विधानसभा मतदार संघामधून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी सौ.अनुजाताई केदार(Anujtai Kedar)
या तयारी करत आहेत व तसेच याच मतदारसंघांमधून सुनील केदार यांची कन्या पौर्णिमा केदार या सुद्धा विधानसभेच्या
तयारीला लागलेले आहेत आणि या दोघी इच्छुक असल्यामुळे या दोघींपैकी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देतो
हे आता पहाव लागेल
4)चिमूर विधानसभा मतदार संघामधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी ताई वडेट्टीवार
(Shivani Tai Wadttiwar)या सुद्धा इच्छुक आहेत व त्यांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली आहे
काँग्रेस पक्ष या मतदार संघामधून शिवानी ताई(Shivani Tai Wadttiwar)यांना उमेदवारी देईल की नाही हे
आता पहावे लागेल
5)अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हात्रे हे
करतात पण या वेळेला त्यांच्या कन्या शीतल म्हात्रे(Shital Mahatre)यादेखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत
आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी परत एकदा सिद्धाराम म्हात्रे यांना उमेदवारी देतं की शीतल म्हात्रे यांना उमेदवारी मिळते
हे पाहावे लागेल
काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणारे भारतीय जनता पार्टी देखील या घराणेशाहीपासून वाचलेली दिसत
नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांची मुले मुली हे राजकारणात येताना दिसतात
भाजपाचे बड्या नेत्यांची मुले मुली विधानसभेसाठी इच्छुक
(Sons and daughters of big leaders of BJP are interested in the Legislative Assembly)
1)नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे करत होते
पण त्यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत या बिलोली
मतदार संघामध्ये खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण(Shreejaya Chavan) या चांगल्या कामाला
लागलेले आहेत भोकर मतदार संघ तसा चव्हाण कुटुंबियांचा परंपरागत मतदार संघ आहे
2)परतुर विधानसभा मतदारसंघांमधून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर(Rahul Lonikar) हे
सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत व त्यांनी देखील पक्षश्रेष्ठीकडे विधानसभेसाठी मागणी केल्याचे बोलले जात आहे
3)पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून दिवंगत
आमदार मुक्ताताई टिळक या कसबा पेठ मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होत्या आता त्यांच्या जाण्याने त्यांचा मुलगा
कुणाला टिळक(Kunal Tilk) हा या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी
इच्छुक आहे तसेच
4)तसेच कसबा पेठ विधानसभा मतदार संघामधून पुण्याचे माजी खासदार दिवंगत गिरीशजी बापट यांच्या सुनबाई
स्वरदा बापट(Swarda Bapat) या कसबा पेठ विधानसभा मतदार संघामधून इच्छुक आहेत आता हे पहावे लागेल
की भारतीय जनता पार्टीची पक्षश्रेष्ठी ही कुणाल टिळक यांना उमेदवारी देते की स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळते
पण कुणाल टिळक आणि स्वरदा बापट या दोघांचाही कसबा पेठ विधानसभा मतदार संघावर चांगली पकड आहे
आता या दोघांपैकी कोणाला भाजपा पक्षश्रेष्ठी निवडते हे पहावे लागेल
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून देखील अनेक राजकीय नेत्यांचे मुलं मुली हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत
1)सध्या बारामती विधानसभा मतदारसंघांमधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रतिनिधित्व करतात पण याच
मतदारसंघांमधून त्यांचे पुत्र जय पवार(Jay Pawar)हे सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जात आहे बारामती हा मतदार संघ पवार
घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ आता या ठिकाणी अजितदादा स्वतः उमेदवारी घेतात की जय पवार यांना उमेदवारी
घेतात हे पहावे लागेल
2)माढा विधानसभा मतदार संघामधून आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे(Ranjitsinh Shinde)
व त्यांचे पुतणे धनराज शिंदे(Dhanraj Shinde) हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत व या मतदार संघावर या
दोघांचाही प्रभाव मोठा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जर दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली तर बंडाची
शक्यता की नाकारता येणार नाही कारण हे दोन्ही उमेदवार इच्छुक आहेतआता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे ठरवायचे
की या दोन्ही उमेदवारापैकी तुल्यबळ असलेल्या उमेदवार कोण आहे ते कोणाची निवड करतात की एकाला उमेदवारी
देऊन दुसऱ्याची समजूत काढण्यामधून बबनराव शिंदे यशस्वी होतात का तेही आता पहावे लागेल
3)अहेरी विधानसभा मतदार संघामधून धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम(Baghyshree Atram)
यादेखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा आहेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरे करायला सुरुवात
केली आहे व त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे
4)दिंडोरी विधानसभा मतदारसंघ नाशिक दिंडोरी विधानसभा मतदार संघामधून नरहरी झिरवळ हे विद्यमान
आमदार आहेत त्यांच्याविरुद्ध शरद पवार गटाकडून त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ(Gokul Zirwal) हे इच्छुक आहेत
त्यांनी या संदर्भात शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे आता नरहरी झिरवळ हे गोकुळ झिरवळ(Gokul Zirwal) यांची
समजूत काढतात की
स्वतःच्या जागी गोकुळ झिरवळ(Gokul Zirwal) यांना उमेदवारी देऊन स्वतः माघार घेतात काय ते पहावे लागेल
शरद पवार गटामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख(Salil Deshmukh)हे काटोल
विधानसभा मतदार संघामधून इच्छुक आहेत आणि सध्या चर्चा ही आहे की अनिल जी देशमुख हे नागपूर विधानसभा
मतदारसंघांमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सध्या आहे
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील विद्यमान खासदार संदिपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे पैठण
विधानसभा मतदार संघामधून संदिपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे(Vilas Bhumre)यांना उमेदवारी मिळण्याची
दाट शक्यता आहे कारण संदीपान भुमरे यांनी बऱ्याच वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे
वरील या मतदारसंघांमध्ये राजकीय मंडळीचे पुत्र किंवा कन्या यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी त्यांची
इच्छा आहे पक्षाने जरी या नेत्यांच्या मुला मुलींना उमेदवारी दिली तरीसुद्धा जनता यांना स्वीकारेल की नाही ही
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल पण या पद्धतीने प्रत्येक राजकीय नेत्याची मुले जर राजकारणात
येत असतील तर नव्या लोकांना संधी कधी मिळणार की कार्यकर्ते हे अ जीवन कार्यकर्तेच राहणार नेते बनण्याची त्यांना
संधी कधी मिळणार की नाही हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनाला पडतो
Recent News
कोणत्या राजकीय नेत्यांच्या मुला मुलींची राजकारणात होणार इंट्री?
महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांची मुले राजकारणात येण्यास इच्छुक