महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) आज मतदान आहे रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि निवडणूक आयोग आपल्या तयारीला लागले या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये कोणत्या फॅक्टरचा जास्त प्रभाव या निवडणूकत दिसेल यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण,सोयाबीन(SOYABEAN) आणि जरांगे फॅक्टर या तिन्ही गोष्टींचा निवडणुकीवर काय परिणाम होईल ?
मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांचे आंदोलन
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते
त्यावेळी पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला केला गेला या हल्ल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले त्यानंतर मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी आपले उपोषण सोडले नंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा केला व या दौऱ्या दरम्यान होणाऱ्या सभांमध्ये अभुतपूर्व गर्दी पाहायला मिळाली मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)एवढ्या थांबले नाही तर त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला लाखोंचा जनसमुदाय हा मुंबईच्या दिशेने निघाला पण वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेचा अध्यादेश दिला.
हे हि पाहा-https://youtu.be/y8I9uZtcxPU?si=_vLq7xsFU0Izw_cW
जरांगे पाटील वापस अंतरवाली सराटीला आले त्यानंतर राज्य शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला वेगळे दहा टक्के आरक्षण दिले पण हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नव्हते दरम्यानच्या काळामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली आणि मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा महायुतीला महाराष्ट्रात तसेच विशेष करून मराठवाड्यात पाहायला मिळाला छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता उरलेल्या सर्व ठिकाणी महायुतीला अपयश आले लोकसभेच्या नंतर मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी परत एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले पण या उपोषणाकडे एकही सरकारचा मंत्री फिरकला देखील नाही मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी मराठा समाजातील बांधवांच्या मागणीमुळे आपले उपोषण सोडले व विधानसभा निवडणूकीत उमेदवार देण्याची जाहीर केले बीड जिल्ह्यातील नारायण गड येथेमनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी दसरा मेळावा घेतला याही मेळाव्याने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले विधानसभेची आचारसंहिता लागल्या नंतर मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी शेवटच्या दिवशी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला पण ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे
त्या सर्व नेत्यांना पाडा असा संदेश त्यांनी मराठा बांधवांना दिला प्रचाराच्या दरम्यान माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजबाबतीत एक विचित्र वक्तव्य केले यामध्ये त्यांनी मराठा समाज हा बोटाच्या कांड्यावर मोजणारी इतका समाज आहे या वक्तव्यामुळे मराठा समाज चांगलाच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये कालीचरण महाराज यांनी जरांगे पाटला बाबतीत केले वक्तव्य सुद्धा मराठा समाजाला आवडले नाही त्यामुळे देखील मराठा समाज नाराज आहे आता मराठा समाज नेमकी काय भूमिका घेतो हे आता पहावे लागेल पण मराठा समाजाने भूमिका कुठली घेऊ द्या त्याचा प्रभाव मात्र शंभर टक्के पाहायला मिळणार आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मध्यप्रदेश सरकारने काही वर्षांपूर्वी लाडली बहीण योजना राज्यात लागू केली होती या योजनेमधून राज्यातील प्रत्येक महिलेला प्रति महिना आर्थिक मदत केली जाऊ लागली या पद्धतीच एक योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (MUKHAYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA)ही योजना आणली या योजनेमधून प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली व नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे देखील खात्यावर जमा केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच महायुतीतील प्रत्येक नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (MUKHAYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA)ही किती चांगली योजना आहे
हे पटवून द्यायला सुरुवात केली. महायुतीच्या जाहीरनाम्या मध्ये त्यांनी जर परत महायुती सत्ता आली तर या रकमेमध्ये वाढ करून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देखील दिले तसेच काँग्रेसने व महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी हे योजना बंद पडावी म्हणून कोर्टात याचिका दाखल केल्याचा आरोपही महायुतीच्या वतीने करण्यात आला या आरोपाला महा विकास आघाडीने सकारात्मक उत्तर दिले आणि महाविकास आघाडीने महालक्ष्मी नावाची योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले या योजनेमधून राज्यातील प्रत्येक महिलेला प्रतिमहिना 3000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा केली त्यामुळे आता महिला मतदार नेमकं कोणत्या पक्षाला कोणत्या आघाडीला मतदान करतील हे अद्याप स्पष्ट नाही
पण प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात जास्त चर्चेत राहिली आता राज्यातील महिला मतदार हे ठरवणार महायुती की महाविकास आघाडीची योजना चांगली आहे राज्यातील महिलांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बाबतीत दोन मतप्रवाह पाहायला मिळाले यामध्ये काही महिला या आनंदी आहेत की त्यांच्या हातात पैसे येत आहे तर दुसरीकडे एक वर्ग दीड हजार रुपये महिना दिला आणि खाद्य तेलाचे भाव हे प्रचंड वाढले त्यामुळे देखील महिलांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे आता या दोन मत प्रवाहांचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी दिसणार पण महिला मतदार कोणाबद्दल सकारात्मक आणि कुठल्या बाबतीत नकारात्मक आहेत हे 23 तारखेला कळेल
हे हि पाहा-https://youtu.be/FDnP6KwO_74?si=3V-EyRX_-E1TXtBz
सोयाबीन(SOYABEAN)चे पडलेले दर
सोयाबीन(SOYABEAN) हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील देखील प्रमुख पिकांपैकी एक आहे मराठवाड्या मध्ये सिंचन क्षेत्र कमी असल्यामुळे शेतकरी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना पसंती देतात यामध्ये प्रमुख पीक हे सोयाबीन(SOYABEAN) असते पण यावर्षी सोयाबीन(SOYABEAN) पेरणीच्या नंतर झालेली अतिवृष्टी यानंतर आलेला येलो मोझॅक रोग आणि सोयाबीन(SOYABEAN) काढणीच्या वेळी आलेला अवकाळी पाऊस या कारणांमुळे सोयाबीन(SOYABEAN)चे उत्पन्न हे घडले आणि जेव्हा शेतकऱ्याचे सोयाबीन(SOYABEAN) बाजारात विक्रीसाठी आले तेव्हा सोयाबीन(SOYABEAN)च्या भावामध्ये कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले सध्या 3500 ते 41 पर्यंतचे दर सोयाबीन(SOYABEAN)ला मिळत आहे हे दर पाहता उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही या कारणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे
हे हि वाचा-सोयाबीन च्या पडलेल्या भावाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार ?
या दराकडे पाहून महायुतीने असे जाहीर केले की जर माहिती सत्ता आल्यास आम्ही बेस प्राईस आणि विक्री किंमत यामधील फरक आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू पण यावर बहुतांश शेतकऱ्यांचा विश्वास नाही कारण जेव्हा मिश्र खतावरची सबसिडी बंद करण्यात आली होती तेव्हा देखील खात्यात अनुदान टाकण्याचे जाहीर केले होते पण प्रत्यक्षात असे झाल्याचे पाहायला मिळाले नाही मग आता या गोष्टीवर शेतकऱ्यांनी विश्वास का करावा सोयाबीन(SOYABEAN)चे पडलेले दर हा सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सिद्ध होणार आहे या गोष्टीमुळे नाराज झालेला शेतकरी नेमकं कोणाला मतदान करतो हे पहावे लागेल
हे हि वाचा-नारायण गडा वरील दसरा मेळावा महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदलणार का?
वरील तीन गोष्टींचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात दिसणार आहे प्रत्येक राजकीय पक्षाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण मतदार या तीन गोष्टींचा विचार मतदान करताना करणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे मराठा समाजाची नाराजी सोयाबीन(SOYABEAN) उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आणि वाढलेली महागाई बेरोजगारी यामुळे त्रस्त झालेली जनता आपले मत नेमके कोणाच्या पारड्यात टाकते हे पहावे लागेल मराठा समाज या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शांत असल्याचे पाहायला मिळाले मराठा समाजातील मतदार हे कोणाला मतदान करणार हे स्पष्ट बोलायला तयार नाहीत नेमकं मराठा समाजाच्या मनामध्ये काय चालू आहे
याचे आकलन कोणालाही करता येत नाहीये आता हे पहावे लागेल की मराठवाड्यातील मतदार हा कोणाच्या बाजूने उभा राहतो व महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोणाची सत्ता येते किंवा निवडणुकीनंतर विविध पक्षांच्या एक नवीन आघाडी सत्तेत येते की काय असा अंदाज दिसत आहे मागील पाच वर्षात महाराष्ट्रात झालेली उलथापालथ यामुळे त्यामुळे कोण सत्तेत येईल हे सांगता येणार नाही