गजानन चव्हाण सहसंपादक –महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS)उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होऊ लागली राजकीय नेत्यांनी पक्ष बदलण्याचा सपाटा लावला आहे
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख येत आहे तसं तसं राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे राज्यातील प्रमुख दोन आघाड्यांमध्ये तिकीट वाटपावरून काही जागांसाठी अद्यापही रस्सीखेच चालू आहे अशातच राजकीय नेते मंडळींना सुद्धा पक्ष बदल करण्यासाठी हालचाली चालू झाले आहेत एखाद्या आघाडीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी अनेक राजकीय पुढारी सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत
प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची एक विचारसरणी असते व त्याच विचारसरणीला अनुसरून तो राजकीय पक्ष काम करत असतो पण राजकीय मंडळींना मात्र विचारसरणीची फारशी गरज वाटत नाही ज्या पक्षांमध्ये आपल्याला संधी मिळेल याच पक्षाची विचारसरणी आत्मसात करता येईल असे म्हणत बिनधास्त त्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि यामुळे मात्र ्या राजकीय पुढार्याचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र संभ्रमात असतात की आता साहेब कुठला निर्णय घेतील आणि आता नेमका कोणत्या आघाडीचा प्रचार करायचा कोणत्या चिन्हाचा प्रचार करायचा कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा आणि हातात कोणता झेंडा घ्यायचा
आणि आपसूक त्यांच्या तोंडातून काही बोल निघतात विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
अशीच काही अवस्था जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती पण राजकीय गणित जमलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केले शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्हीही भिन्न विचारसरणी पण तरीही राजकीय स्वार्थ मुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित आले त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंड झाला आणि परत एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये भिन्न विचारसरणी असलेले पक्ष एकत्रित आले त्यामुळे आता राजकीय पक्ष बदलण्यामध्ये जो राजकीय मंडळींनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे या विषयाला नवीनच वेळ लागले आहे

श्रीजया अशोकराव चव्हाण
भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघामधून(BHOKAR ASSEMBLY CONSTITUENCY) माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण(SHREEJAYA CHAVAN) यांना उमेदवारी दिली आपण जर चव्हाण घराण्याचा अभ्यास केला तर असे समजते की कै.शंकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे कट्टर नेते त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री म्हणून देखील काम पाहिले. कै.शंकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाचे(BHOKAR ASSEMBLY CONSTITUENCY) प्रतिनिधित्व करत होते त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील काँग्रेस पक्षात काम करत राज्यातील अनेक मंत्रालयाची काम पाहिली आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले पण लोकसभेच्या आधी त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपाचे कमळ हाती धरले
अशोकराव चव्हाण हे सुद्धा भोकर विधानसभा मतदारसंघाचे(BHOKAR ASSEMBLY CONSTITUENCY) आमदार होते अशोकराव चव्हाण जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या पत्नी अमिताभाभी चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघांमधून विधानसभेची निवडणूक लढवली व त्या विजयी झाल्या त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या मतदारसंघावर काँग्रेस तसेच चव्हाण घराण्याचा प्रभाव दिसून आला पण या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीजया चव्हाण(SHREEJAYA CHAVAN) या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर तेथील जुन्या काँग्रेसची कार्यकर्त्यांच्या मनातही हाच प्रश्न येतोय की कोणता झेंडा घेऊ हाती

(शिवसेना ठाकरे गट)
एकनाथ दादा पवार
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये( LOHA ASSEMBL CONSTITUENCY) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एकनाथ दादा पवार(EAKNATH DADA PAWAR) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे एकनाथ दादा पवार(EAKNATH DADA PAWAR) हे मूळ लोहा तालुक्यातील रहिवाशी असून मागील अनेक वर्षापासून ते पिंपरी चिंचवड येथे नगरसेवक म्हणून निवडून आले होते कामा शोधामध्ये एकनाथ दादा पवार(EAKNATH DADA PAWAR) यांनी पुणे गाठले पिंपरी चिंचवड मध्ये काम करत असताना त्यांनी येथील लोकांचे प्रतिनिधित्व देखील केले भारतीय जनता पार्टीचे ते नगरसेवक होते व देवेंद्र फडवणीस यांच्या निकटवर्तीयां पैकी एक होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी निर्णय भूमिका बजावल्या त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये( LOHA ASSEMBL CONSTITUENCY) काम करायला सुरुवात केली पण अवघ्या काही महिन्यात त्यांच्या लक्षात आले की लोहा विधानसभा मतदार संघामध्ये( LOHA ASSEMBLY CONSTITUENCY)भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मागे टाकून आपण उमेदवारी मिळू शकत नाही
त्यानंतर त्यांनी मराठा आंदोलनाच्या दरम्यान आपला भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देत आंदोलना पाठिंबा देखील दिला नंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले व उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला व महाविकास आघाडीची उमेदवारी ही एकनाथ दादा पवार(EAKNATH DADA PAWAR)यांना मिळाली पण पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गट या पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्याच्या मनात कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडत आहे

प्रतापराव पाटील चिखलीकर
काँग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये त्यांचा पराभव करून दाखविण्याचा करिष्मा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी करून दाखविला प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील तब्बल सहा वेळा पक्ष बदलला आहे
प्रतापराव पाटील चिखलीकर(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) यांची राजकीय सुरुवात ही काँग्रेस पक्षामधून झाली ते शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय पण अशोकराव चव्हाण यांच्याशी काही मतभेदामुळे त्यांनी विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली व ते विजयी झाले नंतर त्यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देखील दिला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिखलीकर(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल असे वाटत होते पण उमेदवारी मिळाली नाही त्यांनी लोकभारती पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविली पण ते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यानंतर चिखलीकर(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पण लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित होते
म्हणून चिखलीकरांनी(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला व ते विधानसभेला शिवसेना पक्षाच्या तिकिटावर निवडून देखील आले नंतर प्रतापराव पाटील चिखलीकर व देवेंद्र फडवणीस यांची चांगलीच मैत्री झाली व देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे तिकीट हे प्रतापराव पाटील चिखलीकर(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) यांना दिले त्याही निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीक(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) र हे विजयी झाले. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला लोकसभेनंतर चिखलीकर यांनी परत आपला मतदारसंघ लोहा विधानसभा मतदारसंघा( LOHA ASSEMBL CONSTITUENCY) त काम करायला सुरुवात केली पण या मतदारसंघांमध्ये काहीसा राजकीय पेच निर्माण झाला व ही
जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला सोडण्यात आली त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकर(PRATAPRAO PATIL CHIKHLIKAR) यांनी अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यांना उमेदवारी देखील घोषित झाली आता लोहा विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांना कमळाचा नाहीतर घडाळीचा प्रचार करावा लागणार आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या तोंडी कोणता झेंडा घेऊ हाती असे म्हणण्याची वेळ आली आहे

जितेश अंतापुरकर
जितेश अंतापुरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जितेश अंतापुरकर हे अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला जितेश अंतापुरकर यांचे वडील दिवंगत रावसाहेब अंतापुरकर काँग्रेस पक्षाचे आमदार होते त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जितेश अंतापुरकर हे विजयी झाले तेही काँग्रेस पक्षाच्या वतीने पण या विधानसभेला मात्र त्यांना हाती कमळ घ्यावे लागले आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये हाच प्रश्न निर्माण झाला आहे की कोणता झेंडा घेऊ हाती
ही राजकीय मंडळी एका झटक्यात पक्ष बदलतात विचारसरणी बदलतात पण कधी सामान्य जनतेचा मतदारांचा विचार त्यांच्या मनात येत नाही किंवा त्यांचे कार्यकर्त्यांनाही ती विश्वासात घेतात की नाही या प्रश्नाचे उत्तर मिळणे जरा कठीणच आहे