आज सकाळी झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू हे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरच्या जवळ
असलेले रामेश्वर तांडा येथे आहे या तांड्यामध्ये व या परिसरातील दांडेगाव वारंगा सिंदगी दिग्रस बु
या परिसरामध्ये भूकंपाची तीव्रता जास्त आहे सकाळी सहा वाजून सहा मिनिटाला पहिला गुड
आवाजमध्ये तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला लगेच 6 वाजून 19 मिनिटाला दुसरा धक्का जाणवला गुड
आवाज व तीव्र धक्के यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले सहा वाजून सहा मिनिटाच्या
भूकंपाची तीव्रता ही ४.२ रिश्टर स्केल तर दुसरा भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ही ३.६स्केल एवढी होती
भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा हा दाखविला आहे तेथे जास्त नुकसान नाही पण दांडेगाव येथे मात्र
घरांना तडे गेले आहेत यामुळे नागरिक मात्र भयभीत झाली आहेत
शासन स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे विभागीय अधिकारी यांनी या परिसराची पाहणी केली कळमनुरीच्या
तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुली विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक यांनी काम पाहिले
भूजल सर्वेक्षण अधिकारी सुद्धा उपस्थित होते