आज दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीच्या
घोषणा करतील व त्यानंतर लगेच देशामध्ये आचारसंहिता लागू होईल
आचारसंहिता ही निवडणूक आयोगाच्या वतीने लावली जाते ही प्रामुख्याने जिथे
निवडणुका आहेत त्या राज्यापुरतं या मतदारसंघापूर्ती त्या लोकसभा मतदारसंघापूर्ती
किंवा त्या ग्रामपंचायती पूर्ती लावली जाते म्हणजेच जिथे निवडणूक आहे
तेथे आचारसंहिता लागते
सगळ्यात पहिली आचारसंहिता 1960 ला लावली
आचारसंहिते मध्ये निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली रक्कम या उमेदवाराला
खर्च करता येते त्यापेक्षा जास्त खर्च करता येत नाही व सदरील खर्चाचे विवरण रोजच्या
रोज निवडणूक आयोगाला द्यावे लागते
यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठलाही शासन निर्णय हा आचारसंहिता लागल्या
नंतर घेता येत नाही पण आश्वासन मात्र देता येते
लाऊड स्पीकर सभेसाठी परवानगी घेणे सुद्धा यादरम्यान लागू असते
धर्म जात याच सारख्या गोष्टी पुढे करून मतदान मागता येत नाही
पैस्याचे आमिष दाखविता येत नाही
या दरम्यान प्रशासकीय अधिकारायची बदली करता येत नाही
प्रचाराची जाहिराती करताना ठरवून दिलेल्या नियमावलीतच जाहिराती करावे लागतात
व त्याचे विवरण हे निवडणूक आयोगाला सादर करावे लागते प्रचारासाठी वापरल्या गेलेल्या
गाड्या यांचे विवरण निवडणूक आयोगाला देऊन परवानगी घेऊन त्यावर स्टिकर चिटकूनच
प्रचार करता येते
एरवी मंत्री हे सरकारी गाड्या वापरतात पण आचारसंहिता लागली की त्या क्षणी त्यांना सरकारी
गाडी सोडावी लागते कारण या गाडीचा उपयोग हा त्यांना प्रचारासाठी करता येत नाही किंवा
आचारसंहिता लागल्यानंतर या गाड्या वापरता येत नाहीत आज लागणारी आचारसंहिता ही
संपूर्ण देशभरात असेल व सर्व ठिकाणी मतदान झाल्यानंतर ती संपेल
आचारसंहिता बंद केल्यास निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करू शकते व दोषी
आढळल्यास काही निवडणूक पूर्ती तर निवडणूक लढवण्यावर बंदी घालू शकते त्यामुळे
सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचा पालन करणे बंधनकारक आहे
Add A Comment