आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये सीएए लागू केला आणि आपल्या मनात प्रश्न पडला असेल की नेमकं हे सी ए ए काय आहे व त्याचा काय परिणाम होईल याविषयी चर्चा करूया सी ए ए याचा अर्थ होतो नागरिकता संशोधन कायदा तर सदरील सीएए मध्ये भारताच्या लगत असलेले पाकिस्तान बांगलादेश व अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये हिंदू’बौद्ध`जैन`शिख ईसाई हे या तीन देशांमध्ये अल्पसंख्यांक आहेत पण मागील काही वर्षांमध्ये यांच्यावर अन्याय झाल्यामुळे ते सरळ भारतात शरणार्थी म्हणून आले आता या शरणार्थ्यांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा बनवला गेला सी ए बी म्हणजे सिटीझन अमेंडमेंट बिल हे बिल 9 डिसेंबर 2019 ला संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपती यांच्याकडे पाठविण्यात आले 12 डिसेंबर 2019 रोजी मा राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षऱ्या केल्या पण ते लागू करण्यासाठी आजचा दिवस उजाडला आता हा कायदा लागू झाल्यामुळे भारताबाहेरील या नागरिकांना भारतात चे नागरिकत्व मिळेल व ते कायमस्वरूपी इथले रहिवासी होतील लोकसभेची निवडणूक पुढे असल्यामुळे या निर्णयावर दावे प्रति दावे होणारच