लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय घडामोडींना सगळीकडेच वेग आला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी
गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या
निवासस्थानी भेट घेतली या भेटी मागचे कारण हे
लोकसभा निवडणूक आहे आता हे बघावं लागणार की या दोघांच्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये
सामील होती का आज दुपारी या दोघा नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली व यामुळे मनसे महायुतीत येणार असं बोललं जाऊ लागला आहे
राज साहेब ठाकरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग हा
मुंबई पुणे नाशिक येथे आहे तसेच महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी
आहे त्याचाच फायदा महायुतीला व्हावा म्हणून .भाजपा
मनसेला बरोबर घेण्याबाबतीत सकारात्मक आहे दु
सरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या
रूपाने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे
आता पहाव लागेल की महायुतीत राज ठाकरे येतात की
नाही व आले तर त्यांना लोकसभेच्या किती जागा
सोडाव्या लागतील कारण अजूनही महायुतीतले सर्व
उमेदवार जाहीर झालेले नाही