बऱ्याच वेळेला आपल्याला स्मरणशक्ती कमी होते आपल्याला डिप्रेशन येते आणि नसांमध्ये देखील कमजोरी दिसून येते ही लक्षणे जेव्हा आपल्या दिसतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता(Vitamin B12 deficiency) देखील असू शकते व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळे काही व्याधी देखील होऊ शकतात
व्हिटॅमिन B12 हे एक आवश्यक विटॅमिन आहे जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. याला कोबॅलामिन असेही म्हणतात. हे विटॅमिन पाण्यात विरघळणारे असून मुख्यतः प्राणिज स्रोतांमध्ये आढळते. आपल्या शरीरात मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी,रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि डीएनए सिंथेसिससाठी हे अत्यंत हे अत्यंत आवश्यक आहे.
Vitamin B12 चे मानवी शरीरातील महत्व

१)मेंदू आणि मज्जासंस्थेचे आरोग्य
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू मेंदूच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)आवश्यकता असते जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)ची कमतरता झाली तर यामुळे स्मरणशक्ती कमी होणे,डिप्रेशन,नसान मधली कमजोरी,वारंवार गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे अशा पद्धतीचे काही लक्षणे दिसतात
२)ऊर्जा निर्माण व थकवा कमी करणे
आपल्या शरीरामध्ये लागणाऱ्या ऊर्जा निर्मितीची प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये लागणाऱ्या ऊर्जा निर्मितीची प्रक्रियेमध्ये व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)अत्यंत महत्त्वाची भूमिका असते जर शरीरात याची कमतरता झाली तर थकवा कमजोरी धाप लागणे श्वास घेताना त्रास होणे अशी काही लक्षणे दिसतात
हे हि वाचा –Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा
३)लाल रक्तपेशींची निर्मिती
आपल्या शरीरामध्ये रक्त निर्मितीची प्रक्रिया पार पडण्यासाठी लाल रक्त पेशींची गरज असते विटामिन बी 12(Vitamin B12)ची कमतरता असल्यास लाल रक्तपेशी लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि ॲनिमिया सारखा आजार होतो तसेच
रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून याची क्षमता देखील कमी होते
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)चे नैसर्गिक स्त्रोत कोणती आहेत
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)सर्वात जास्त हे मासांमध्ये भेटते मांसाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)त्यांच्या आहारातून अगदी सहज मिळते पण शाकाहारी भोजनामध्ये व्हिटॅमिन B12असलेले पदार्थ कमी असतात त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन B12ची कमतरता होऊ शकते कोणत्या पदार्थांमध्ये किती व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)असते
मांस- (सर्व प्रकारचे: चिकन, मटण, बीफ),मासे(सॅल्मन,टुना,सारडिन्स),अंडी,दूध आणि दुग्धजन्य पदार्थ,लिव्हर आणि किडनी,फोर्टिफाईड फूड्स(उदाहरणार्थ: तांदूळ, गहू, तेल, दूध, मीठ, ब्रेड, नाश्ता धान्य)
व्हिटॅमिन B12 ची कमतरता: लक्षणे व परिणाम(Vitamin B12 deficiency: symptoms and consequences)
१)न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका
न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो पाठीचा कणा मेंदू यामध्ये समस्या निर्माण होतात व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)च्या कमतरतेमुळे नसांवर परिणाम होतो यामुळे हातपाय सुन्न होणे,मुंग्या येणे,चालताना अडखळणे इ.लक्षणे दिसून येतात.
२)मानसिक स्वास्थ्यावर परिणाम
विटामिन b12 च्या कमतरतेमुळे आपले मानसिक आरोग्य देखील धोक्यात येते यामध्ये डिप्रेशन चिडचिड एखादी गोष्ट लक्षात न राहणे
हे हि वाचा –Summer Food-उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे अमृतच!
३. अॅनिमिया
कमतरतेमुळे मॅक्रोसाइटिक अॅनिमिया होतो.यामध्ये शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
४. गर्भवती महिलांसाठी धोकादायक
गर्भवती महिलांमध्ये B12 ची कमतरता असल्यास गर्भातील बाळाच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन B12 रोज आपण किती घेतले पाहिजे
१)नवजात बालक(0ते6 महिने)- 0.4 µg
२)बालक (7-12 महिने)- 0.5 µg
३)लहान मुले (1-3 वर्षे)- 0.9 µg
४)मुले (४-९ वर्षे)-| 1.2 µg
५)किशोरवयीन (9-13 वर्षे)-1.8 µg
६)प्रौढ (14 वर्षे व अधिक)-2.4 µg
७)गरोदर महिला-2.6 µg
८)स्तनपान करणाऱ्या महिला-2.8 µg
व्हिटॅमिन B12 ची कमतरता कोणत्या लोकांमध्ये जास्त आढळते?(Which people are most likely to have Vitamin B12 deficiency?)
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)ची कमतरता हि शाकाहारी आणि शुद्ध शाकाहारी व्यक्ती मध्ये जास्त जाणवते
साठ वर्षावरील लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)कमतरता जास्त आढळते
पचन संस्थेचे विकार असणारे रुग्णांना मध्ये व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)दिसतेदीर्घकाळ मेटफॉर्मिन किंवा अॅसिड ब्लॉकर्स घेणारे रुग्ण
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)चाचणी कशी व कधी केली जाते?
वर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला एखादी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)चाचणी घेण्याचा सल्ला देतात यासाठी रक्ताची तपासणी केली जाते या चाचणीला सिरम व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)चाचणी म्हणतात जर रक्तामध्ये व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)ची पातळी ही 200pg/ml यापेक्षा कमी असेल तर व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)ची कमतरता झाली असे निदान केले जाते
उपचार
व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)असलेल्या काही गोळ्या किंवा इंजेक्शन देखील घेण्याचा सल्ला देतात जर व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)ची कमतरता ही खूप जास्त असेल तर डॉक्टर आठवड्याला एकदा इंजेक्शन घ्यायचा सल्ला देखील देऊ शकतात ?
तसेच शाकाहारी व्यक्तींनी B12 फोर्टिफाईड खाद्यपदार्थ (उदाहरणार्थ: तांदूळ, गहू, तेल, दूध, मीठ, ब्रेड, नाश्ता धान्य) नियमित खाणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)चे फायदे
ऊर्जा वाढवतो
इम्यून सिस्टम मजबूत करतो,मानसिक आरोग्य सुधारतो,हृदयविकाराचा धोका कमी करतो,त्वचा, केस आणि नखांना आरोग्यदायी ठेवतो
वरील सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची व्हिटॅमिन आहे जर आपल्या शरीरामध्ये विटामिनची मात्रा ही वाढली तर घाबरण्याचे कुठलेही कारण नाही कारण व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)हे पाण्यात विरघळणारे असल्यामुळे लघवी वाटे ते बाहेर फेकले जाते आपण व्हिटॅमिन B12वरचा एखादा डोस जरी घेतला तरीसुद्धा त्याची कुठलीही दुष्परिणाम हे आपल्याला दिसत नाही व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण व्हिटॅमिन B12 (Vitamin B12)कमतरतेमुळे सर्व प्रकारच्या समस्या आहेत आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात
नोट-या लेखा मध्ये व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे आणि ती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार म्हणून नाही. वैद्यकीय स्थितीबद्दल तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा किंवा इतर पात्र आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्या. या लेखा मध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टीमुळे व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा तो घेण्यास उशीर करू नका. चर्चा केलेल्या कोणत्याही सूचना, उत्पादने किंवा प्रक्रियांच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी किंवा परिणामांसाठी या सामग्रीचे निर्माते जबाबदार नाहीत.